Home Blog Page 1110

सामान्य जनतेला वीज दरवाढीचा “शॉक” दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन;रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळेंचा इशारा

पुणे-वीजदरवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा येथे आमदार रवींद्र धंगेकर आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला .सरकारने केलेल्या या वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टी, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक, रास्ता पेठ येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड, मुकुंद किर्दत, अशोक हरनावल, विशाल धनवड़े, कनव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.शेखर धावडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार व्यक्त केला. “तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा, तिघाडी सरकारचा धिक्कार असो, महागाई जोमात जनता कोमात, जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी” अशा घोषणांनी संपूर्ण रास्ता पेठ परिसर दुमदुमला होता.

यावेळी आंदोलकांनी असे म्हटले कि,’ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस – पवार – शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस – पवार – शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५% वाढ केली आहे.

देशातील जनता अभूतपूर्व अशा महागाईचा सामना करत आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गीय वर्गाचं जीवन कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील जनतेला महागाईतून दिलासा देणं राज्य सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. परंतू जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, परंतू वीज उत्पादन करणाऱ्या अडाणी, अंबानी यांचे खिसे भरले पाहिजेत हेच फडणवीस – शिंदे – पवार सरकारचं धोरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल.
— प्रशांत सुदामराव जगताप

काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी

प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई-अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली. मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. अशा काँग्रेसने 5 गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. उपाध्ये म्हणाले की, नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाही, हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले. केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल.
गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही पुन्हा एकदा जनतेच्या फसवणुकीसाठी मोहब्बत की दुकान सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. गरीब, युवक, महिला, शेतकरी या चारच जाती देशात असून त्यांच्या विकासाकरिता भाजप कटिबद्ध असल्याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिली आहे. गरीबी हटाव नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली, देश मात्र अधिकाधिक गरीब होत गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात मात्र कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला, असेही ते म्हणाले.
श्री. उपाध्ये म्हणाले की, पंतप्रधान मोदी केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेली प्रत्येक गॅरंटी पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. देशातील 25 कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली गेली असून जगाने याची दखल घेतली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. कलम 370 रद्द करणे, राम मंदिर उभारणी, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण, अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्यांच्या गँरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करून काँग्रेस पुन्हा देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहे.
काँग्रेसच्या प्रत्येक घोषणेतील पोकळपणा जनतेस माहीत आहे, याची जाणीव असूनही मोदी यांची नक्कल करताना काँग्रेसने आपली अक्कल एवढी गहाण टाकली, की मोदी मंदिरात गेले की यांचे नेते मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, मोदींनी गंगास्नान केले की यांचे नेते डुबकी मारतात, मोदी यांनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते देशात पदभ्रमणासाठी बाहेर पडतात. अशा नक्कल करण्याच्या हतबलपणामुळेच आता काँग्रेसने पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिल्या आहेत. अशा पाच पंचवीस फसवणुकांतून जनता यापूर्वीही गेलेली असल्याने, आता नक्कल देखील कामाला येणार नाही, अशी खिल्ली श्री. उपाध्ये यांनी उडवली.

वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका भाजपाला अनुकूल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरोधात.

मुंबई, दि. ४ एप्रिल
लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका दुर्दैवी असून ती भाजपाला अनुकूल ठरणारी आहे, असे काँग्रेस नेते माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे.

डॉ. भालचंद्र मुणगेकर गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते, ते पुढे म्हणाले की, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून भाजपाच्या भूमिकेवर टीका केली होती. भाजपा संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे अशी भूमिका ते मांडत होते परंतु प्रत्यक्षात लढण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी भाजपला अनुकुल भूमिका घेतली. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा केली परंतु शेवटी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला. वंचित आघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४४ लाख मते पडली होती पण त्यात एमआयएमच्या मतांचा मोठा हिस्सा त्यात होता. विधानसभा निवडणुकीत एमआयएम सोबत नसल्याने वंचितच्या मतांमध्ये घसरण होत ही मते २१ लाखापर्यंत खाली आली. विधानसभा व लोकसभेत वंचितचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस आघाडीचा ९ जागांवर पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत १६ जागांवर पराभव झाला परंतु वंचितमुळे भाजपाच्या एकाही उमेदवाराचा पराभव झालेला नाही. यावरून वंचितची भूमिका ही भाजपाला फायदेशीर अशीच ठरलेली आहे. यावेळी जागा वाटपाच्या सुरुवातीलाच त्यांनी प्रत्येक पक्षाला १२ जागा द्याव्यात यापासून सुरुवात केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी साततत्याने टीकात्मक विधाने करूनही काँग्रेस पक्षाने त्यांना अत्यंत सन्मानाने १७ मार्च रोजीच्या शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेला निमंत्रीत केले. पण त्यासभेत त्यांनी केलेल्या विधानावरून त्यांची भूमिका साशंक आहे हे स्पष्ट झाले होते. प्रकाश आंबेडकरांची एकूण भूमिका पाहता त्यांना खरेच महाविकास आघाडीबरोबर आघाडी करायची होती का, असा प्रश्न उपस्थित होतो.

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून बनवलेले संविधानच मान्य नाही. सरसंघचालक गोलवलकर यांनी संविधानचा ‘गोधडी’ असा उल्लेख केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी असून लोकशाही, संविधान व स्वांतत्र्य वाचवण्यासाठी दलित, वंचित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला, मागासवर्गीय या सर्व समाज घटकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून इंडिया आघाडीला मतदान करावे असे आवाहन डॉ. मुणगेकर यांनी केले आहे.

एमआयटी एडीटी तर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण

पणजी,गोवा: एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाची महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग(मॅनेट) आणि  द नव्हेल कनेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बोगमॅलो बीच रिसाॅर्ट येथे आयोजित फ्यूचर स्किल्स मेरीटाइम (एफएसएम) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सागर रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  
या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत, आमदार कॅप्टन वेंजी विगास, शिपिंगचे महासंचालक शाम जगन्नाथन, डाॅ.संकल्प शुक्ला, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कॅप्टन प्रेरित मिश्रा, डाॅ.राजीव काशिकर, डाॅ.श्रीकांत गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.   
सागरी क्षेत्रातील अलौकिक कार्याचे कौतुक करण्याच्या उद्देशाने मॅनेट या संस्थेतर्फे ‘सागर रत्न पुरस्कार’ ची स्थापना करण्यात आली. सागरी सुरक्षा, या क्षेत्रातील संशोधन आणि नावीन्य यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये कॅप्टन विपन तलवार(उद्योग क्षेत्र), कॅप्टन पंकज नायक, कॅप्टन चिन्ना रुपाजू आणि कॅप्टन कुणाल कात्याल (नेव्हीमधील भरती), कॅप्टन अंशुल राजवंशी(सीएसआर कार्य), कॅप्टन महेंद्र भसीन(सागरी सुरक्षा), कॅप्टन दिनेश जयराम, मनोज गांधी(सागरी उद्योग) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर कॅप्टन डॉ. शशांक जहागीरदार यांना ‘मेरीटाइम पर्सोना ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासह सागरी क्षेत्रातील महिला सक्षमीकरणासाठी कॅप्टन करण कोचर यांना सन्मानित करण्यात आले.
तर सागरी क्षेत्रातील या महत्वपूर्ण कार्यक्रमाची सांगता कॅप्टन विपन तलवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून करण्यात आली.

नवी मालिका ‘जय जय शनिदेव’ लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

                  सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. आजवर पौराणिक, ऐतिहासिक, थरारक, इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेत. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे. ‘जय जय शनिदेव’ असे या मालिकेचे नाव आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता ‘शनिदेव’ यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. या मालिकेत काय पाहायला मिळेल आणि मालिकेचे स्वरूप कसे असेल, हेअजून गुलदस्त्यात आहे. मालिकेतील कलाकार अजून उघड केलेले नसले तरी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यावर मिळालेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहे, हे कळतं आहे.

                 शनिदेव यांच्यावर आधारित मालिका पहिल्यांदाच दूरदर्शनवर पाहता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहे. प्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे. शनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुख, शांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करते. शनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. लवकरच तो सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. मालिकेत कोण कलाकार असतील, मालिकेचा सारांश काय असेल; हे पुढे समजेलच. त्यासाठी सोनी मराठी पाहत राहा. मालिकेबद्दलची पुढील माहिती सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होईल.

शहरात पुरेसे पाणी पुरवठ्याचे नियोजन करा-आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी; महापालिका आयुक्तांना दिले पत्र

पुणे : पाण्यापासून पुणेकर वंचित राहता कामा नयेत. यासाठी शहरात सुरळीत आणि पुरेसे पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे बुधवारी पत्राद्वारे केली.

पुण्यातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांमधून ओरड होत आहे. याची दखल घेवून आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली. ते म्हणाले, यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी जलसंकट कोसळले आहे. अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. जनतेला पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचा आरडाओरडा सुरू आहे. पण, सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहचत नाही, असे दिसून येत आहे. असेच चित्र पुण्यातही आहे.

पाणी मिळत नसल्याने पुणे शहरात आणि उपनगरात अनेक ठिकाणी नागरिक चिंतित आहे. पाण्यासाठी आरडाओरडा करीत आहेत. पाण्यावाचून होणारे नागरिकांचे हाल, त्यांच्या व्यथा शहरातील वृत्तपत्रात उमटत आहेत. पण, तरीही अद्याप पाण्याचे योग्य नियोजन झाले नसल्याचे आणि पाणी नागरिकांना मिळत नसल्याचेच दिसून येत आहे, असे सांगून आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, पालिकेने पाण्याचे योग्य नियोजन करून त्याबाबतचा आराखडा पुणेकरांसाठी जाहीर करावा. शहर व उपनगरातील सर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर भर द्यावा. पालिकेत समाविष्ट झालेल्या अनेक गावांमध्ये जलवाहिन्या नाहीत. काही ठिकाणी जलवाहिन्या असूनही पाणी नाही. अशा ठिकाणी टँकरच्या माध्यमातून दररोज पाणी पोचवावे.

पाणी टंचाईच्या काळात शहरात कोठे-कोठे पाण्याची नासाडी होत आहे, यावरही पालिकेने बारकाईने लक्ष ठेवावे. वाहने धुण्यापासून ते बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यव होत आहे, अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. याबाबतही पालिकेने पावले उचलावीत, असे आमदार रवींद्र धंगेकर सांगितले.

मेधा कुलकर्णींनी संस्कृतमधून घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ!

आज राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी(Medha kulkarni) यांनी संस्कृत भाषेमधून राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर त्यांनी आपल्या भावनाही सोशल मीडियावरील पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.मेधा कुलकर्णी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘मला कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, आज सभागृहाचे आदरणीय अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत मला राज्यसभेची खासदार म्हणून संस्कृतमध्ये शपथ घेण्याचा मान मिळाला. राज्यसभा सदस्य म्हणून मी आज संस्कृत भाषेतून शपथ घेताना खूप भारावून गेले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ही शपथ दिली.’याचबरोबर ‘मी अतिशय कृतज्ञ आहे, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, संघ पदाधिकारी ज्यांनी मला ही संधी दिली, विश्वास दाखवला. तसेच माझ्यावर प्रेम करणार्‍या सर्व हितचिंतकांची आणि नागरिकांचीही मी ऋणी आहे, ज्यांचे प्रोत्साहन कायम मला मिळत आले आहे,’ असंही कुलकर्णी म्हणाल्या आहेत.तसेच ‘आज ही शपथ घेताना अनेक दिग्गजांच्या आवाजाचे ध्वनी माझ्या मनात घूमत होते , ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने, प्रतिभेने आणि वक्तृत्वाने या सभागृहावर आपली छाप पाडली आणि म्हणूनच या वास्तूत येऊन मी भारावून गेले. माझ्यामधील क्षमतांचा पूर्णांशाने वापर करून आपल्या प्रिय भारताच्या या अत्युच्च सभागृहात उत्तम कामगिरी करून मातृभूमीच्या वैभवशाली परंपरेत, लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन, असे वचन सर्वांसमक्ष देते आहे. जय हिंद!’ अशा शब्दांमध्ये मेधा कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

मोदी सरकारमुळे गोरगरीबांच्या सहभागातून विकसित भारताकडे वाटचाल -प्रवीण दरेकर

मुंबई- मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी गोरगरिब, वंचितांचा विकास करून विकसित भारत संकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने निर्धारपूर्वक वाटचाल केली आहे. सरकारी योजनांच्या निधी वाटपातील भ्रष्टाचार थांबवून गोरगरिब, गरजू वर्गांपर्यंत योजनांचे लाभ 100 टक्के पोहचविल्याने सुमारे 25 कोटी भारतीय दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आ.प्रवीण दरेकर यांनी बुधवारी केले. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.दरेकर बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. गरजेनुसार आर्थिक धोरणात केलेले बदल आणि राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे आज देशाची अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकाची बनली आहे असेही त्यांनी सांगितले.
श्री.दरेकर यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी, देशाच्या अर्थव्यवस्थेचे 2014 पर्यंतचे चित्र आणि गेल्या 10 वर्षांत अर्थव्यवस्थेची झालेली घोडदौड, पायाभूत सुविधांचा 2014 पासून झालेला विकास याचा लेखाजोखा आकडेवारीसह सादर केला. ते म्हणाले की, 4 कोटी गरजूंना पक्की घरे, 80 कोटी जनतेला मोफत अन्न धान्य, 14 कोटी कुटुंबांच्या घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी, 10 कोटी गॅस कनेक्शन, 12 कोटी स्वच्छतागृहांची बांधणी, सौभाग्य योजनेमुळे ग्रामीण भागात 100 टक्के विद्युतीकरण, कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी 78 लाख फेरीवाल्यांना 10 हजार कोटींचे कर्ज, सरकारी निधीच्या वाटपात होणारी गळती थांबवून लाभार्थ्यांपर्यंत 100 टक्के पोचवणे ही मोदी सरकारच्या 10 वर्षांतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. 51 कोटी पेक्षा अधिक नागरिकांची जनधन बँक खाती सुरु केल्याने एका पैशाचीही गळती न होता सरकारी योजनांचे अनुदान, अर्थसाह्य थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. गेल्या 10 वर्षांत 34 लाख कोटी रु. लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत जमा झाले आहेत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिल्यामुळे 2016 पासून गेल्या 8 वर्षांत 26 हजार 500 कोटी एवढ्या रकमेचे व्यवहार युपीआय द्वारे झाले आहेत.
यूपीए सरकारच्या कारभाराची तुलना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारशी करत आज देशात घडलेले परिवर्तन दर्शवणारी आकडेवारीही आ.दरेकर यांनी यावेळी सादर केली. आ.दरेकर यांनी सांगितले की, 2014 साली एलपीजी गॅस सिलेंडर्स वर सरकारकडून मिळणारी सबसिडी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजने अंतर्गत थेट बँक खात्यात जमा करणे बंद केले होते. मोदी सरकारच्या काळात 2022 पर्यंत गरीब कुटुंबांची 73,000 कोटींची बचत डीबीटी मुळे झाली. 2014 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केवळ 55 टक्के गावे रस्त्यांनी जोडली गेली होती. 2023 पर्यंत 99 टक्के गावे ही रस्त्यांनी जोडली गेली. 2014 साली माफक दरात औषधे पुरवणारी केवळ 80 जन औषधी केंद्रे देशात होती. तीच आजमितीला 10 हजार केंद्रे आहेत. 2014 साली ग्रामीण भागात सरासरी 12.30 तास वीज पुरवठा होत असे, आज तोच साडे बावीस तास होत आहे.
प्रत्येक घटकापर्यंत सरकारी योजनांचे लाभ पोहोचावेत याला प्राधान्य देत त्या दिशेने प्रयत्न करण्यात आल्याचे आ.दरेकर म्हणाले. देश विकास हेच मोदी सरकारच्या सत्तेचे ध्येय असल्याने त्याच दिशेने विकास कार्ये झाली. त्यामुळेच देशाचा विकसीत, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने प्रवास गतीने सुरु आहे. आगामी पाच वर्षांमध्ये सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहीलेल्यांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा संकल्प मोदी सरकारचा आहे, असेही ते म्हणाले.

शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. ३ : शासकीय तंत्रनिकेतन पुणे या संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, मिलिंद धोंगडे, संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉ. वासुदेव जावरे, अणुविद्युत व दूरसंचार विभागप्रमुख सुनिलदत्त प्रभुणे, नियामक मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.

या समारंभात स्थापत्य, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्या शाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात आल्या.

यावेळी श्री. दराडे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमधील संधी, पर्यावरण बदल, नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मानचिन्हे, पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री. पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध !

आमच्या मुलांना खाजगी इंग्रजी शाळात शिक्षण घेवू द्या : पालकांची मागणी
आप पालक युनियन तर्फे चाफेकर वस्तीत आरटीई कायदा बदल प्रतीची होळी!
पुणे -राज्य शासनाने शिक्षणात कायद्यात सुधारणा करून ‘खाजगी शाळांच्या परिसरात जर सरकारी अथवा अनुदानित शाळा असल्यास त्यांनी २५ टक्के राखीव मोफत प्रवेश करण्याची गरज नाही’ असा आदेश काढला आहे. या आदेशामुळे पुणे शहरातील वस्तीतील मुलांना खाजगी इंग्रजी शाळात प्रवेश मिळणार नसल्याने आप पालक युनियन च्या नेतृत्वात चाफेकर वस्ती , गणेश खिंड रोड , शिवाजीनगर येथे आरटीई कायदा प्रतीची होळी करण्यात आली.
नवीन शिक्षण धोरणात पूर्व प्राथमिक शाळेपासूनच दहावीपर्यंत शिक्षण हे दर्जेदार आणि सर्वांना परवडणारे असावे व त्याची जबाबदारी सरकारवर असेल असे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये इंग्रजीची सोय तसेच त्याचा दर्जा सुधारणे यावर लक्ष द्यायला हवे.या शाळा उत्तम करा मग आमच्या मुलांना आम्ही या सरकारी शाळात घालू. आमची मुले वेगळ्या सरकारी शाळात आणि श्रीमंत पालकांची मुले उत्तम इंग्रजी शाळात हा भेदभाव सरकारने करू नये असे आवाहन पालक श्रीकांत भिसे यांनी केले.
या नव्या बदलामुळे सरकारी , अनुदानित शाळा या नोंदणी मध्ये घेतल्याने उपलब्ध पटसंख्या ७७००० दाखवली जात असली तरी यातील ६२००० पट यापूर्वी पण उपलब्ध होता व दरवर्षी रिक्त राहत होता. ही वाढीव पटसंख्या केवळ फुगवटा असून पालकांनी या शाळा आधीच नाकारल्या आहेत. जनतेला आरक्षणाचे गाजर दाखवल्यामुळे या वेळेस ओबीसी , एससी , एसटी , आर्थिक दुर्बल तसेच मराठा समाजाला पण या जागा उपलब्ध असतील पण खाजगी शाळा मध्ये या मुलांना प्रवेश मिळणार नाही . पुण्यात सर्वच वसाहती परिसरात मोडकळीस आलेल्या , कमी पटसंख्येच्या पालिकेच्या शाळा आहेत, त्यामुळे खाजगी शाळात जागा रिक्त राहतील व त्याने शिक्षण हक्क कायदा भंग होईल असे या वेळेस आप पालक युनियन व आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत यांनी संगितले.

या आरटीई आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी,गणेश खेंगरे,नामदेव वाघमारे,नितीन गस्ती,राजू वाघ, अंकुश शेटके, सागर किंजकस्कर,ऊमर शेख,नितीन गायकवाड, सुनिल सकपाळ, रवि जमादार,ऋषिकेश भिसे,नितीन जाधव,सोहम वाघमारे,प्रमिला भिसे,वैशाली भिसे,प्रियांका जमादार,खुशबु तिवारी,आरती तिवारी,स्वाती रासगे,निलम आवळे,रूपाली जमादार,प्रणिता पुजारी,प्राजक्ता पुजारी,दिपा परदेशी,नम्रता शिंदे रवि कांबळे,सुशिल तिवारी, आश्विनी वाघ,सिमा वाघमारे, ज्योती बहादुर, प्रजाप्रताप भाभी, निलम तिवारी,दीपक भकवाड,सुभाष काळे इत्यादी स्थानिक पालक सहभागी झाले होते.

देशातील अघोषित हुकमशाही, दडपशाही हद्दपार करण्यासाठीची ही लढाई-खासदार सुप्रिया सुळे

पुणे- देशातील अघोषित हुकमशाही, दडपशाही हद्दपार करण्यासाठीची ही लढाई आहे , त्यामुळे हि निवडणूक महतवाची आहे , वंचित बहुजन आघाडीने मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्याबद्दल आभारी आहे असे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सर्वाच्च न्यायालय आयकर विभाग, ईडी, सीबीआय यांचा गैरवापर तसेच निवडणुकीची प्रक्रिया यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . ही बाब नागरिकांसाठी वेदनादायी व चिंताजनक आहे . आणीबाणी देशात लागू नाही परंतु तशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात समाजात सुरु आहे . ही बाब लाेकशाही देशासाठी घातक विषय आहे . दडपशाहीच्या दिशेने पाऊले टाकली जातात का? अशी सातत्याने काळजी सरकार घेत असलेल्या काही निर्णयातून होत आहे. देशाचे संविधानासाठी ही चिंताजनक बाब असून त्याच्या विराेधात आमची लढाई आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले आहे .सुळे म्हणाल्या, बारामती लाेकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी सदर पक्ष व पक्षाचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांची आभारी आहे . महाविकास आघाडी मधील पक्षात अद्याप राज्यातील उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे . देशातील हुकमशाही, दडपशाही हद्दपार करण्यासाठीची ही लढाई आहे . त्यामुळे राज्याच्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही लढाई अाहे, त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहे .शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ईव्हीवर निवडणुक घेण्याएेवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्याची मागणी केली याबाबत सुळे म्हणाल्या,काेणतीही निवडणुक ही पारदर्शक झाली पाहिजे, काेणती दडपशाही, दमदाटी न करता निवडणुक प्रक्रिया पार पडणे महत्वाचे आहे . जे मतदारराजाच्या मनात अाहे तशाप्रकारे निवडणुक झाली पाहिजे. सर्वाच्च न्यायालयाने देशाचे हित पाहिले नेहमी पाहिलेले आहे . देशात काॅपी करुन पास हाेण्यात काय मजा आहे . मेहनत करुन देशाची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात येत नाही. काॅपी करुन पास हाेण्यासाठी आम्ही राजकारणात येत नाही. समाजात सातत्याने अस्वस्थता दिसत आहे . लाेकांना सतत धमक्या येत आहे ही चुकीची बाब आहे .

 युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

चंद्रपूर, दि. 3 :  लोकसभा निवडणूक 2024 करीता 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे व नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘माय व्होट इज माय फ्युचर : पावर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स, पोस्टर्स मेकींग व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाहीमध्ये मतदानाला अत्यंत महत्व आहे. देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी तसेच दिशा देण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदान करायलाच हवे. याचाच एक भाग म्हणून स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. 18 वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये रिल्स, पोस्टर व मिम्सचे विशेष आकर्षण असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांकरीता विशेष रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. रिल्स स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला प्रथम बक्षीस 15 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 10 हजार तर तृतीय बक्षीस 5 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये आहे. तसेच मिम्स स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार तर तृतीय बक्षीस 2 हजार रुपये देण्यात येणार आहे.

मतदान करण्याबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविणे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी स्वतः बनविलेले रिल्स, पोस्टर्स व मिम्स् 12 एप्रिल 2024 पर्यंत अपलोड करून पाठवावे. सदर लिंक जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

आरटीओच्या भ्रष्ट कारभारावर कारवाई करण्यासाठी युवासेनेचे निवेदन

पुणे- – पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुरंदर तालुक्यातील दिवे पासिंग सेंटर येथील गैरकारभाराबाबत युवासेनेच्या वतीने संजीव प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन देण्यात आले. दिवे विभागात फिटनेसच्या नावाखाली प्रत्येक पासिंग करीता तीन हजार रूपये व पुणे विभागातून वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड गाडयांचे चालक, मालक यांच्याकडून दरमहा चार हजार रूपये हप्ता वसुली केली जात आहे. पुणे विभागात वाहतूक करणाऱ्या किमान बारा हजार वाहनाद्वारे दरमहा कोटयावधीं रुपयांची लूट होत असल्याची तक्रार युवा सेनेचे पुणे शहराध्य सनी गवते यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी प्रसाद जठार, देविकाताई घोसरे, सागर दळवी, सागर गायकवाड, सोनू पाटील, बाबासाहेब कोरे, डॉ अमोल डुमणे, गिरीश गायकवाड, सौरभ ढेबे, शेहजिनताई सय्यद, जुनेराताई सय्यद, सुभाष जंगम, संतोष मुसळे, प्रथमेश आडकर, कुणाल झेंडे, आकाश दोडमणी, विनायक नाईक, गणेश घोलप, नितीन सुसलादे, अविनाश पाटसकर, आदिनाथ फडतरे, अंकित अहिरे, अभिजीत ढमढेरे, सुमित जाधव, अनिल जाधव, प्रवीण गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सनी गवते म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील दिवे पासिंग सेंटरच्या भ्रष्ट्राचाराबाबत पुण्यातील अनेक संघटना आणि नागरिकांनी युवासेनेकडे तक्रार करत भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे दिले. या सर्व प्रकारास प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधी पाठिशी घालत आहेत असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आज युवासेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हा सर्व प्रकार येत्या ४ दिवसात थांबला नाही व त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास युवासेनेच्यावतीने या सर्व पुराव्यानिशी न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. तसेच आचारसंहितेचे पालन करत निवडणुकीनंतर प्रचंड मोठे जनआंदोलन उभारून शिवसेना स्टाईलने हा भ्रस्ट कारभार थांबविण्यात येणार असल्याचे गवते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या ५ न्याय २५ गॅरंटींचा राज्यात घरोघरी जाऊन प्रचार करणार: नाना पटोले

जनतेचा इंडिया आघाडीवर वाढता विश्वास, भाजपाला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार.

पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न.

मुंबई, दि. ३ एप्रिल
खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना न्याय देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला, यातूनच काँग्रेस पक्षाने ५ न्याय व २५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. महिला, युवा, कामगार, शेतकरी, हिस्सेदारी न्याय असा संकल्प जाहीर केला असून राज्यात घरोघरी जाऊन हा संदेश पोहचवला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, ‘गॅरंटी’ हा शब्दही राहुल गांधी यांनी आधी प्रचारात वापरला, कर्नाटक विधानभा निवडणुकीवेळी काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्यावर जनतेने विश्वास टाकला व सत्ता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे तसेच तेलंगणातील जनतेनेही काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास टाकला. आता देशभरातील जनतेसाठी काँग्रेसने ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी, एमएसपीचा कायदा, जीएसटीमुक्त शेती, तरुणांसाठी ३० लाख रिक्त जागा भरणे, शिक्षित तरुणांना प्रशिक्षण व वर्षाला १ लाख रुपये, गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देण्याची गॅरंटी देण्यात आली आहे. भाजपाचा अपप्रचार खोडून काढणे व काँग्रेसच्या गॅरंटीचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.

भिवंडी, सांगली व मुंबईतील जागांसाठी काँग्रेस आजही आग्रही आहे. यासाठी सामोपचाराने व चर्चेतून मार्ग काढला जाईल. भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच इंडिया आघाडीचा निर्धार आहे त्यासाठी सर्व मित्र पक्षांनी काम केले पाहिजे. जनतेनेच ही निवडणुक हातात घेतली असून इंडिया आघाडीवर जनतेचा विश्वास वाढलेला आहे असेही नाना पटोले म्हणाले.

संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई.
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, माजी खासदार संजय निरुपम यांचे स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होते पण त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केले असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रचार समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, पब्लिसिटी कमिटीचे अध्यक्ष विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज बंटी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते व समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

सर्व कायदे धाब्यावर बसवून गडकरी व भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर…

नागपूरचे भाजपा उमेदवार नितीन गडकरींकडून आचार संहितेचे उल्लंघन, कारवाई करा: अतुल लोंढे.

मुंबई, दि. ३ एप्रिल
भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊ नितीन गडकरी व भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की, निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करु नये असे निवडणुक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भारतीय जनता पक्ष व उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला आहे. दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत शाळकरी मुलांना सहभागी केले होते. हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे. शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या प्राचार्यांनाही निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे. निवडणुक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असेही लोंढे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या आधी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका” परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र गडकरी यांना नागपुरच्या गल्लीबोळात फिरावे लागच आहेत, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.