Home Blog Page 1072

तापमान 42 अंशांवर असतानाही उरणमध्ये बारणे पोचले 50 गावांपर्यंत

उरण, दि. 27 एप्रिल – कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारातील उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याचे आज (शनिवारी) पहायला मिळाले. रणरणत्या उन्हात बारणे यांनी उरण तालुक्यातील तब्बल पन्नास गावांपर्यंत जाऊन मतदारांशी संपर्क साधला.

खासदार बारणे यांनी उष्णतेच्या लाटेची पर्वा न करता उरण तालुक्याचा प्रचार दौरा केला. त्यांच्या समवेत आमदार महेश बालदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भार्गव पाटील, तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर तसेच कौशिक शहा, जयवीन कोळी, जितेंद्र घरत, महेश कडू, शशी पाटील गोपीनाथ म्हात्रे, दीपक ठाकूर, संदेश म्हात्रे, संदेश ठाकूर, समद भोंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रणरणत्या उन्हात उघड्या विजय रथावर उभे राहून खासदार बारणे मतदारांना नमस्कार करून व हात उंचावून अभिवादन करत होते. उन्हापासून रक्षणासाठी त्यांनी धनुष्यबाण चिन्ह असलेली भगवी टोपी परिधान केली होती. खासदार बारणे यांचा उत्साह पाहून अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साहही दुणावला. प्रचार फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी झाडांच्या सावलीला व आडोशाला उभे राहून लोक बारणे यांची वाट पाहत होते. फटाके वाजवून, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत प्रत्येक गावात बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रचार फेरीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी ग्रामस्थांकडून थंड पाणी, सरबत, ताक यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना थोडासा थंडावा मिळत होता.

उरण तालुक्यातील मोरा येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली. आमदार बंगला, गणपती चौक, करंजा, मुळेखंड, तेलीपडा, द्रोणागिरी नोड, बोकडविरा, फुंडे, डोंगरी, पाणजे, सोनारी, करळ, जसरखार, नवघर, भेंडखळ, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवळणे, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठीजुई, कळंबुसरे, चिरनेर, विंधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, शिव समर्थ संग्रहालय, जासई, गव्हाण, कोपर, शेलगर, न्हावा, नवा खाडी, डेल्टा, कोपर तला, बिकानेर सेक्टर 17, ठाकूर रेसिडेन्सी, भूमिपूजन भवन, बामण, डोंगरी गाव, सेक्टर 21 भाजप कार्यालय मार्गे करंजाडे सेक्टर 24 येथे प्रचार फेरीची सांगता झाली.

धार्मिक कलह लावणारे सत्तेवर नकोत : डॉ.कुमार सप्तर्षी

‘वेध :भारतीय लोकशाहीचा ‘ व्याख्यान सत्राला प्रतिसाद-हिंदू- मुस्लीम संबंधांची वीण कायम राहील : अशोक वानखेडे

पुणे :
पुणे सिव्हिल सोसायटी ‘ आयोजित ‘वेध :भारतीय लोकशाहीचा ‘ व्याख्यान सत्राला शनिवारी सायंकाळी चांगला  प्रतिसाद मिळाला.ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे प्रमुख भाषण झाले. युवक क्रांती दलाचे संस्थापक  डॉ.कुमार सप्तर्षी अध्यक्ष स्थानी होते.   कोंढव्यातील नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
सिटी लॉन्स(कोंढवा) येथे  झालेल्या या व्याख्यान सत्राचे आयोजन अली इनामदार, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त  मिलिंद गायकवाड, अनीस अहमद, युनूस तांबटकर , जांबुवंत मनोहर यांनी केले. २७ एप्रिल रोजी सायंकाळी  हे व्याख्यान सत्र झाले. मिलिंद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अनीस अहमद यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. जांबुवंत मनोहर यांनी सूत्र संचालन केले.
माजी आमदार महादेव बाबर,राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,डॉ.प्रवीण सप्तर्षी,उमेश चव्हाण, संजय आल्हाट, दत्ता पाकिरे,सुदर्शन चखाले आदी उपस्थित होते.
अशोक वानखेडे म्हणाले, ‘हिंदू मुस्लिम समुदायामध्ये सातत्याने भांडणे, दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न केले गेले. या कट कारस्थानांना कोणी बळी पडत नाही, हे देशाचे भाग्य आहे.हिंदू- मुस्लीम संबंधांची वीण घटट् असून ती बिघडविण्याचे संबंध यशस्वी होणार नाहीत.

 ‘संविधान सर्वोच्च आहे आणि तेच सातत्याने पुढे आणले पाहिजे. या निवडणुकीत हुकूमशाही ला बाजूला केलें पाहिजे, अन्यथा संविधान जाईल,मनुस्मृती येईल. गुलामगिरी आणि वर्ण व्यवस्था पुन्हा येवू घातली आहे.नरेंद्र मोदी यांच्या काळात पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी झाली. कॉंग्रेसचा जाहीरनामा इंग्रजीत असल्याने पंतप्रधानांना समजत नसावा, असा टोलाही वानखेडे यांनी लावला.
देशाला रसातळाला नेण्याचे काम मोदी यांच्या कार्यकाळात झाल्याने या निवडणुकीत परिवर्तन करून दाखवावे, असे आवाहन वानखेडे यांनी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘देशात जनताच सर्वोच्च आहे. लोकप्रतिनिधी सर्वोच्च नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय शहाणपणाचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे. संघ परिवाराला नरेंद्र मोदी हवे असले तरी जनतेला नको आहेत. व्यापारी व्यक्ती सत्तेवर आल्यावर प्रजा भिकारी होते.   मोदी यांनी प्रत्येक निर्णयात , परदेश दौऱ्यात अदानींचे भले केले. मग ,हे पंतप्रधान आहेत की सेल्समन ? असा सवाल डॉ. सप्तर्षी यांनी विचारला.
 पुण्यात ज्या पक्षाचा खासदार असतो, त्या पक्षाची सत्ता देशात येते. हे पुणेकरांनी लक्षात घेऊन भाजप विरोधी   मतदान केले पाहिजे. अन्यथा आपले सर्वांचे भवितव्य धोक्यात येईल. माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म असतो. पण, राजकारणात धर्म आणून भाजपाने वाट लावली आहे. खरा हिंदू धर्म सहिष्णू आहे, सत्याला मानणारा आहे. ही प्रतिमा आपण बिघडू देता कामा नये, असे आवाहन डॉ. सप्तर्षी यांनी केले.

‘मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा’ : गायक शान यांचे आवाहन

मुंबई, दि.२८: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून 29- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभेच्या 177- वांद्रे पश्चिम मतदारसंघांतर्गत मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत आज सकाळी आर. व्ही. टेक्निकल स्कूल, रामकृष्ण मार्ग, खार जिमखाना येथून ‘व्होट टू व्होट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भागवत गावंडे, प्राचार्या नेहा जगतयानी, स्वीपच्या नोडल अधिकारी मेधा कांबळे नायब तहसिलदार निखिल घाडगे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

गायक श्री. शान म्हणाले की, आपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 20 मे 2024 रोजी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असल्यास ते एक दिवस पुढे ढकलावे. मी सुद्धा मतदानाच्या दिवशी मुंबईतच राहणार असल्याचे गायक श्री. शान यांनी सांगितले.

रॅलीत गायक श्री. शान यांच्यासह सहभागी नागरिकांनी ‘आपलं मत आपला अधिकार’, ‘बुढे हो या जवान- सभी करे मतदान’, ‘माय व्होट- माय फ्यूचर’, ‘आपका व्होट आपकी ताकत आपका मत आपका अधिकार’ आदी घोषणाही दिल्या. या रॅलीत नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

00000

विद्यार्थी साहाय्यक समिती विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतून करते समाजात ऑक्सिजन पेरण्याचे काम 

पुणे : “समाजात चांगल्या अर्थाने बदल घडण्यासाठी समिती कार्यरत आहे. गरजू, होतकरू विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतून आम्ही समाजात ऑक्सिजन पेरतो. समितीच्या मदतीने घडलेले विद्यार्थी, समितीशी जोडलेले कार्यकर्ते याच विचारातून काम करतात. रोश कंपनीने सीएसआरमध्ये समितीला दिलेली ही देणगी महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक विचारातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी त्यांनी लावलेला हातभार आनंददायी आहे. देणगीच्या माध्यमातून रोश कंपनी समितीशी जोडली गेली असून, आपल्यातील हे नाते दीर्घकाळ राहील,” असे उद्गार विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी काढले.
सामाजिक उत्तरदायित्व योजनेखाली (सीएसआर) रोश कंपनीने विद्यार्थी साहाय्यक समितीला २४ लाख ६० हजारांची देणगी दिली. त्याचा धनादेश शनिवारी झालेल्या कार्यकर्ता मंडळाच्या बैठकीत सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रतापराव पवार बोलत होते. कंपनीचे इंडिया हेड श्री. राजा, सीएसआर प्रतिनिधी कृष्णपाल सिंग, ज्ञानेश्वर घुगे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. 
देणगीमागची भावना व्यक्त करताना श्री. राजा म्हणाले, “केवळ पैसे देणे एवढाच आमचा यामागचा उद्देश नाही, तर त्यातून समाजात परिवर्तन झाले पाहिजे, असा आमचा उद्देश असतो. समितीचे काम खूप चांगले आहे. विद्यार्थ्यांना घडवताना त्यांना उद्योजकतेचे धडे देण्याचे आपले प्रयत्न बदलत्या काळाशी सुसंगत आहेत. या कामाला आर्थिक मदत तर करूच, पण  थेट या कामातही मदत करायला आम्हाला आवडेल.” कृष्णपाल सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.

‘आधी ठाण्याचा, मग नांदेडचा, आता बारामतीचा नवरा केला तरी BJP ला विकास जन्माला घालता आला नाही’

ज्या माणसाने घरातल्या मंगळसुत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही , त्याने १० वर्षात देशभरातील मंगळसूत्रे धोक्यात आणली ..तो इतरांवर खोटे आरोप करतोय …

मोदी- शहा वर घणाघाती टीकास्त्र

सासवड :भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही. म्हणून त्यांनी आधी ठाण्याचा नवरा केला, त्यानंतर नांदेडचा नवरा केला, आता बारामतीचा ही नवरा केला. मात्र, तरीही भाजपला विकास जन्माला घालता आला नसल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अजित पवार बारामतीचा विकास केला असल्याचा दावा करत आहेत. मात्र, शरद पवार यांना बारामती ते सर्व निर्माण केले नसते तर तुम्ही आजही राजदूत मोटर सायकल वरून दूध विकत बसला असता, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे याच विजयी होतील असा दावा देखील संजय राऊत यांनी केला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका महिन्यामध्ये 27 वेळा महाराष्ट्रात आले आहेत. कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. महाराष्ट्र दिल्ली उठवून टाकेल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान गेल्या दहा वर्षापासून रोज खोटे बोलत असल्याचे देखील ते म्हणाले. खोटे बोलणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदीच पाहिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील पक्ष फोडायचे आणि लुट गुजरात न्यायची, हा उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुरू केला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मी शिवसेना फडणवीस गट म्हणतो. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट म्हणतो, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील दोन पक्ष सोडले. मात्र, त्यामुळे काय वाकड झाले? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अस्तित्व आजही कायम असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

मोदींच्या सभेला अजितदादांची राष्ट्रवादी ताकदीने मैदानात उतरणार, रॅलीव्दारे शक्तिप्रदर्शन: दीपक मानकर यांची माहिती

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा उद्या २९ एप्रिल रोजी रेसकोर्स, पुणे येथे होणार आहे. महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच बारामती , मावळ आणि शिरुर या लोकसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी पंतप्रधानांची ही सभा होत आहे. सभेची जय्यत तयारी भाजपाने केली आहे. दरम्यान, महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठी ताकद लावण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होणाऱ्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार आहे. हजारो कार्यकर्त्यांसह भव्य रॅलीव्दारे शक्तिप्रदर्शन करत सभेला जाणार आहोत.

पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभेच्या नियोजनासाठी नारायण पेठ येथील गुप्ते मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी बैठक झाली.या बैठकीबाबत माहिती देताना दीपक मानकर म्हणाले, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे.काल झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या समोर आपण मोदींजीच्या सभेला हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे .दीपक मानकर म्हणाले, नारायण पेठेत नदीपात्रालगत भिडे पुलापासून दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह भव्य रॅलीव्दारे रेसकोर्स मैदानावर पोहोचणार आहोत.

अबकी बार 400 पार अशक्य :भाजपचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही-छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने खळबळ

पवार कुटुंबीयांच्या मतभेदामुळे दु:खीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही केले कौतुक

अबकी बार 400 पार अशक्य आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी लोकांमध्ये सहानभूती आहे असे खळबळजनक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच एनडीएचा मार्गही यंदा फार कठीण असून बारामतीमध्ये होणारी लढत दुर्दैवी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ”2014 आणि 2019 सारखा भाजपचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. त्यांनी दावा केलाय की, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ असंही म्हणाले की, एनडीएचा मार्गही यंदा फार कठीण आहे”, असे भुजबळ म्हणालेछगन भुजबळांनी बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या लढतीवरही ही लढत दुर्दैवी असल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले की, ”माझ्यासाठी हा थोडा भावूक क्षण आहे. जे कुटुंबीय मागची इतकी वर्षे एकत्र लढले ते आता वेगळे झाले आहेत. आता जे सुरू आहे ते काही लोकांना अजिबात आवडलेलं नाही. चूक कोणाची आहे, ती गोष्ट वेगळी परंतु हे जे आता सुरू आहे ते नसते झाले तर बरे झाले असते”, अशी खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली.याशिवाय ”नाशिकबाबत देखील भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ”भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच माझे नाव नाशिकसाठी सुचवले होते. त्याप्रमाणे मी मनाची तयारी केली होती. पण इतर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होत असताना नाशिकचा निर्णय मात्र होत नव्हता. त्यामुळे मी अखेर माघार घेतली. कारण मी उमेदवारीसाठी रडत बसणारा नाही. मी महानगरपालिकेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पहिल्यांदा उमेदवारी मागितली होती. त्यानंतर माझ्यावर कधीही निवडणुकीची उमेदवारी मागण्याची वेळ आली नाही. त्यामुळे या पातळीवर येणं, मला पसंत नव्हतं, म्हणून मी माघार घेतली” असे छगन भुजबळ म्हणाले.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले, ”पतंप्रधान मोदींच्या क्षमतेवर लोकांना विश्वास आहे आणि लोकांना असं वाटतं की, त्यांनी तिसऱ्यांदा भारताचं नेतृत्व करावे. त्यामुळे मतदार यावेळीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा एक मजबूत सरकार निवडून आणतील”, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.

मतदारांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ सुविधा

पुणे, दि. २८: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदारांच्या सोयीसाठी १ ते १३ मे या कालावधीत ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ (मतदान केंद्राविषयी जाणून घ्या) कक्ष सुविधेद्वारे मतदारांना मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे; या सुविधेचा शहरातील अधिकाधिक मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

या कक्षासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आहे. सुचेता पानसरे यांची ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी प्राधिकरण, अमर पंडीत ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड, अण्णा बोदडे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी, अंकुश जाधव, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी, राजेश आगळे, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी, सिताराम बहुरे, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी, अजिंक्य येळे, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव आणि उमेश ढाकणे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, कासारवाडी याप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढविण्याच्याअनुषंगाने या कक्षाची १ मे पासून स्थापना करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही कक्ष सुरु राहणार असून या कक्षाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा व येत्या मतदानाच्यावेळी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

सुनेत्रा पवार बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानात आणि लगावला विजयाचा षटकार…!

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ह्या आंबेगाव मध्ये प्रचार दौऱ्यावर असताना लेक विस्टा सोसायटीमध्ये रविवार असल्यामुळे सर्व नागरिक क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते. त्याचवेळी सुनेत्रा पवार प्रचारासाठी तेथे पोहोचल्या असता सर्व नागरिकांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्यांनी नागरिकांच्या आग्रहाला मान देत चक्क बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरल्या व विजयाचे चौकार व षटकार लगावले. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव मधील प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी खेळाडूंशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला..!

आज रविवार असल्यामुळे सकाळी लवकर उमेदवार सौ सुनेत्रा पवार यांनी प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. आंबेगाव परिसरातील प्रतिष्ठित अशी मानली जाणारी विंडसर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मैदानावर खेळाडू सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व विजयाचे षटकार लगावले. यावेळी मैदानावर क्रिकेट प्रेमी कडून महायुतीचा विजय असो तसेच सुनेत्रा वहिनी आगे बढो हम तुम्हारे साथ है. अशा घोषणा देत सर्व खेळाडू महायुतीच्या सोबत असल्याचा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार सौ सुनेत्रा पवार यांनी खेळाडूंशी आपुलकीचा संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व लवकरच त्या अडचणी सोडवल्या जातील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीची वज्रमूठ घट्ट; सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार : सुनेत्रा पवार

पुणे :लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ अधिक घट्ट झाली आहे. सर्वजण एकदिलाने काम करत आहेत. यापुढील काळात सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.

सुनेत्रा पवार यांनी आज खडकवासला मतदारसंघातील वारजे, बावधन आणि कोथरुड भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेट देत नागरीकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचं आश्वासन दिले. या दौऱ्यात खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, दिलीप बराटे,प्रमोद हिंदुराव, बाबा धुमाळ, राजाभाऊ बराटे, किरण दगडे पाटील, ॲड. मंदार जोशी, मिलिंद वालवडकर, दिलीप वेडे पाटील, गणेश वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, शंकर केमसे, सागर कडू, सुरेंद्र कंधारे, सुर्यकांत भुंडे, अर्चिता जोशी, किर्ती पानसरे, अर्चना चंदनशिवे, शैलेश वेडे पाटील, वैभव मुरकुटे, शंतनू नारके आदी मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रत्येक भागात फिरताना काही ना काही समस्या आहेतच. या समस्यांचा मी आढावा घेवून त्या सोडवण्यावर माझा भर असणार आहेत. त्याचवेळी सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
आपल्या सर्वांनाच अजितदादांच्या कामाची पद्धत माहिती आहे. दादा जे काम हाती घेतात ते पूर्णत्वासच नेतात. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सर्व समस्यांचा निपटारा होईल याबद्दल कोणीही मनात शंका बाळगू नये असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले. तसेच येत्या ७ मे रोजी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केले.

देशाचं नेतृत्व कोणाची हाती द्यायचं हे ठरवणारी ही निवडणुक आहे. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा संधी मिळणार आहे. त्यांना साथ देणारा खासदार सुनेत्रावहिनींच्या रुपात आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन करावे अशा सुचना आमदार भीमराव तापकीर यांनी यावेळी केले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आजच्या दौऱ्यात विविध सोसायट्यांनाही भेटी दिल्या. ठिकठिकाणी सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

पीसीसीओई मध्ये राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेला प्रारंभ

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५ पुरुष संघ व २० महिला संघांचा सहभाग

पिंपरी, पुणे (दि. २८ एप्रिल २०२४) – महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटना व विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ एप्रिल या कालावधीत १७ वी वरीष्ठ गट (पुरुष व महिला) राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन पीसीसीओई मैदानावर करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५ पुरुष संघ व २० महिला संघानी सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र अँमॅच्युअर नेटबॉल संघटनेचे सचिव डॉ. ललित जीवानी, पुणे जिल्हा नेटबॉल संघटनेचे सचिव मानसिंग वाबळे, विठ्ठलशेठ सोमाजी काळभोर चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष हरिश्चंद्र काळभोर, सचिव गोरख भालेकर, कोषाध्यक्ष चेतन काळभोर, साहिर सिकीलकर आदी उपस्थित होते.
प्रथमच पीसीसीओईला राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. स्पर्धा साखळी व बाद पद्धतीत होणार आहेत. पहिल्या दिवशीच्या साखळी सामन्यात पुणे, गोंदिया, शाहूनगर, भंडारा पुरुष संघानी पाहिले सामने जिंकून पुढे आगेकूच केली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी आयोजकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व स्पर्धेचे आयोजन पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी केले.

यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या शुभम थिटेचा पीसीसीओई मध्ये सत्कार

पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२४) पीसीसीओईचा माजी विद्यार्थी शुभम भगवान थिटे याने यूपीएससी परीक्षेत मिळविलेले उल्लेखनीय यश कौतुकास्पद आहे. त्याचा पीसीईटी व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो असे पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले.
पीसीसीओईचा २०१८ च्या मेकॅनिकल विभागाचा माजी विद्यार्थी शुभम थिटे याने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. त्याचा सत्कार काळभोर यांच्या हस्ते ट्रस्ट कार्यालयात शुक्रवारी करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी काळभोर यांनी सांगितले की, ३३ वर्षापूर्वी स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील कॅम्पस मध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन अशा विविध शाखांमध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर उच्च व आधुनिक शिक्षण देण्याची व्यवस्था आहे. तसेच रावेत यथील कॅम्पस मध्ये केजी टू पीएचडी पर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तळेगाव येथील एनएमआयटी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन देखील पीसीईटी करीत आहे. पुणे मुंबई महामार्ग लगत वडगाव मावळ जवळील साते येथे पिंपरी चिंचवड विद्यापीठ संकुलात मागीलवर्षी पासून सुरू झालेल्या अभियांत्रिकी, व्यवस्थापन सह विविध शाखांमधून सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. पीसीईटी च्या सर्वच कॅम्पस मध्ये आधुनिक तंत्रज्ञान युक्त उच्च दर्जाच्या प्रयोगशाळांसह उच्च विद्या विभूषित प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास कार्य तत्पर आहेत. नेहमीच्या शैक्षणिक अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षा व तसेच इतर उच्च शिक्षणा साठीच्या परीक्षा तयारी देखील येथे करवून घेतली जाते. या साठी स्टडी सर्कल नावाने स्वतंत्र क्लब देखील बनविन्यात आला आहे. महाविद्यालयातून आत्तापर्यंत ३ माजी विद्यर्थ्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी एमपीएससी मध्ये यश मिळवले आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी व्यवस्थापन नेहमीच प्रोत्साहन देत असते.

डीजीएफटीने कांदा निर्यातबंदी उठवल्याच नोटिफिकेशन काढलेच नाही – डॉ. अमोल कोल्हे

महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, डॉ. अमोल कोल्हेंचा महायुतीच्या नेत्यांना थेट सवाल

जुन्नर – डीजीएफटीने कांदा निर्यातबंदी उठवलायचे कोणतेही नोटीफिकेशन काढलेले नाही. याचाच अर्थ कांदा निर्यात बंदी उठलेलीच नाही. कांदा निर्यातबंदीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं पाप केल्याची घणाघाती टीका शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याच उत्तर द्यावं, असं थेट सवाल डॉ, अमोल कोल्हे यांनी केलाय.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदी बद्दल केलेल्या
गुजरातच्या कांद्याची निर्यातबंदी ज्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांच भल केलं. आणि त्यानंतर महाराष्ट्रात रोष निर्माण झाल्यावर, त्यामुळं घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोट ट्विट करावं लागतं असेल तर, फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी, महायुतीच्या उमेदवारांनी याच उत्तर द्याव,  महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करण्याची असले तर महाराष्ट्राने का तुम्हाला साथ द्यावी, याच उत्तर द्यावं, असं थेट सवाल डॉ, अमोल कोल्हे यांनी केलाय.

सार्वजनिक वाहतूक सक्षम व सुरक्षित करण्याला प्राधान्य-जितेंद्र पाटील  

‘बस अँड कार ऑपरेटर्स’च्या वतीने बस चालक-मालकांचा वार्षिक स्नेहमेळावा

पुणे : “देशातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांद्वारे होते. पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, वाहतूक जनजागृती, कायद्याची कठोर अंमलबजावणी यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नाला ‘प्रवास ४.०’सारखे कार्यक्रम पूरक आहेत,” असे प्रतिपादन सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.बस अँड कार ओनर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीओसीआय), पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड बस अँड कार ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील सर्वात मोठे वाहतूक प्रदर्शन असलेल्या ‘प्रवास ४.०’च्या माहिती पुस्तिकेचे अनावरण, तसेच वाहतूक सुरक्षा जनजागृतीपर ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. ‘प्रवास ४.०’ हे महाप्रदर्शन यंदा २९ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे.

बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड येथे झालेल्या या कार्यक्रमात बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड, अभिनेता देवदत्त नागे, सहायक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, ‘बीओसीआय’चे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, चेअरमन जगदेव सिंह खालसा, महासचिव अल्लाह बक्ष अफजल, खजिनदार हर्ष कोटक, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे, संयोजक किरण देसाई, तुषार जगताप, बालकलाकार हर्षित देसाई यांच्यासह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

जितेंद्र पाटील म्हणाले की, महामार्ग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यातून होणाऱ्या अपघातांना रोखण्याचे आव्हान आहे. खासगी वाहनांची संख्या वाढत असताना सार्वजनिक वाहतुकीवर अधिक भर दिला, तर वाहतूक कोंडी, प्रदूषण यावरही नियंत्रण आणता येईल. त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. स्मार्ट पोलिसिंग, आयटीएमएस प्रणाली अमलात आणली जात आहे.”

प्रसन्न पटवर्धन म्हणाले, “देशातील सर्वाधिक ८० टक्के प्रवासी वाहतूक सेवा देणारे आपले क्षेत्र आहे. जगभर बदल होताहेत, तंत्रज्ञान अंतर्भूत होत आहे. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीला चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, कर सवलत, चांगल्या पायाभूत सुविधा व दर्जा देण्याची आवश्यकता आहे. खासगी बस वाहतूक सेवेकडून लोकांना अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपण सुरक्षेच्या बाबतीत तडजोड न करता उत्तम सेवा द्यावी.”

हनुमंतराव गायकवाड म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात चांगली व सुरक्षित सेवा दिली, तर ग्राहक नेहमीच समाधानी असतो. सुरक्षित प्रवासाला लोकांचे प्राधान्य असते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक जितकी सुरक्षित व आरामदायी होईल, तितका चांगला प्रतिसाद प्रवासी देतील. वाहतूकदारानी नावीन्यतेचा, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून चांगली सेवा देण्यावर भर दिला पाहिजे.”

देवदत्त नागे म्हणाले, “रस्ते सुरक्षेचा मुद्दा अतिशय महत्वाचा असून, त्याबाबत जनजागृती करणारी ध्वनिफीत आहे. सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत रस्ते सुरक्षेची माहिती पोहोचवायला हवी. प्रवासादरम्यान सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व बाबी आपण पाळल्या पाहिजेत.” हर्षित देसाई याने यावेळी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.

जगदीश सिंह खालसा यांनीही विचार मांडले. राजन जुनवणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. मेघना एरंडे यांनी सूत्रसंचालन केले. किरण देसाई यांनी आभार मानले.

आंबेडकरी जनता आघाडीच्या पाठीमागे उभी राहिल

– नेत्यांपेक्षा संविधान वाचवणे महत्वाचे– टेक्सास गायकवाड यांचे मत

पुणे

वंचितमुळे मागील निवडणुकीत भाजपला ताकत मिळाली, हे आंबेडकरी जनतेला समजले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता व अनुयायी वंचितच्या सभांना गर्दी करतील. मात्र, देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी राहिल आणि आघाडीच्याच उमेदवारांना मतदान करतील, असा विश्वास आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व, प्रबुद्ध साहित्यिक, भीमपुत्र, भारतीय रक्षक आघाडी प्रमुख टेक्सास गायकवाड यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टेक्सास गायकवाड बोलत होते. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, सरचिटणीस अजित दरेकर, सरचिटणीस वीरेंद्र किराड,संजय बालगुडे,राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रशांत सुरसे, राज अंबिके आदि उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, आज देश आणि देशाचे संविधान धोक्यात आहे, अशा वेळी कट्टर आंबेडकरवादी शांत बसत नाही. त्यामुळे मी भारतीय रक्षक आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आलोय. मोदी यांच्या हाती देण्याची सत्ता गेली, आता हा माणूसदेशाचे वाटोळे करणार, हे मी ओळखले होते, त्यामुळे मी मोदींचीसत्ता आल्यावर 2014 मध्येच काळा दिवस साजरा केला. भारताचे हिटलर मोदी आहेत, तर अमित शहा गोबेल्स आहेत. या दोघांनी कोट्यावधी रुपये खर्च करून राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून बदनाम केले. मोदी यांच्या कारभारामुळे देश अडचणीत आहे. त्यामुळे मोदी शहांना या निवडणुकीत मतदारांनी घडा शिकवला पाहिजे. आजचा काळ पक्ष वाचवण्याचा नाही तर संविधान वाचवण्याचा आहे. दहा वर्षानंतर भाजपने राहुल गांधी यांचे महत्व ओळखले. आज ते म्हणत आहेत, ही लढाई गावकी भावकीची नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.

आंबेडकरी जनतेने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अ‍ॅड प्रकाश आंबेडकर, बेहेन  मायावती यांचा बहुमान राखावा. मात्र त्यासोबतच संविधानाचाही विचार करावा. नेत्यांच्या मनापेक्षा संविधान व बाबासाहेबांचा मान महत्वाचा आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितमुळे भाजपला मदत झाली. हे आंबेडकरी जनतेला कळाले आहे. रामदास आठवले हे जातीयवादी व मनुवादी पक्षासोबत असल्याचेही आंबेडकरी जनतेला पटत नाही. त्यामुळे आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकर आणि आठवलेंच्या सभांना जातील. मात्र, पक्षाचा अभिनिवेष बाजूला ठेवून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करेल.

आंबेडकरी विचाराच्या पक्षांनी आपला पक्ष ग्रामपंचायत, पंचायत समिती इथपासून वाढवण्यास सुरूवात करावी. मात्र, लोकसभेला जातीयवादी व संविधान संपवणार्‍या शक्तीला रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीला साथ द्यावी. राहुल गांधींना आंबेडकरी जनतेने समजून घेतले पाहिजे, असेही टेक्सास गायकवाड म्हणाले.

प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.