Home Blog Page 1069

मावळ मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर ‘मोदी की नजर’

मावळात महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाची नोंद घेणार ‘टीम नमो’

लोकसभा निवडणुकीतील कामावर मिळणार पुढे संधी; महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ

पिंपरी, 30 एप्रिल – ‘अब की बार, चार सौ पार’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक -एक जागा महत्त्वाची असल्याने सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते विजयासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत बारकाईने माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या गोपनीय अहवालाच्या आधारे पुढील संधी मिळणार असल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मताधिक्य मिळवून देण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र दिसत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विक्रमी मताधिक्य मिळावे यासाठी दिल्लीहून आलेले हे पथक विशेष प्रयत्न करणार आहे.

चार श्रेण्यांमध्ये मूल्यांकन

बारणे यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे व जीव तोडून काम करीत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामांची नोंद या पथकामार्फत घेतली जाणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामगिरीची चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये आपले नाव राहावे यासाठी स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.

ब्लॅक लिस्ट : धोक्याची घंटा

महायुतीच्या घटकांमध्ये काही कार्यकर्ते वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षांपोटी प्रचारापासून अलिप्त राहत आहेत किंवा विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष माहिती घेऊन अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे चौथ्या श्रेणीत अर्थात ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये असणार आहेत.

त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. महायुतीच्या वतीने यापुढे ब्लॅक लिस्ट मधील कोणत्याही व्यक्तीला संधी देण्यात येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही,  जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार

ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर

जुन्नर :  माझा आत्मा हा अस्वस्थ आहे, पण स्वतःसाठी नाही. तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. असे सडेतोड प्रत्त्युत्तर जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना दिल.

शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर मध्ये जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार ऍड. राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे,  बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चोधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार,अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, आमच्यावरचे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही. जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलतात. एक आत्मा भटकत आहे असं तुम्ही म्हणाले, त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, अस मोदी म्हणाल्याच सांगत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.

पवार म्हणाले की, पंतप्रधान काल म्हणाले ईडी चा मी एक टक्का ही वापर करत नाही. जे चांगलं काम करतात त्यांचा विरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय.

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या मोदींना शरद पवारांनी सुनावले खडेबोल:राहुल गांधींवर टीका करतात. शहाजादे क्या करेंगे? म्हणताना मोदींना कायतरी वाटायला हवं, अस शरद पवार म्हणाले. राहुल गांधींच्या तीन पिढ्या देशासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी झटल्या आहेत. अधुनिकेतवर देश पुढं जावा, यासाठी लढा उभारणाऱ्या राजीव गांधींची हत्या झाली. वडील आणि आज्जींनी देशासाठी बलिदान दिलं. त्या राहुल गांधींना म्हणतात शहाजादे काय करणार? कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली, जनतेचे प्रश्न जाणून घेतले. पण याबाबत बोलण्याऐवजी मोदी काहीही बोलतायेत. खोट्या गोष्टी सांगतआहेत. चुकीच्या पद्धतीने टीका टिपणी करत असतील. तर अशांच्या हातातून सत्ता काढून घेणं गरजेचं आहे.

नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती; मोदी प्रधानमंत्री कमी आणि प्रचारमंत्रीच जास्त: : नाना पटोले

मुंबई, दि. ३० एप्रिल २०२४

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र व स्त्रीधन हिसकावून घेऊन मुस्लीमांना देणार अशी विधाने पंतप्रधानांना शोभत नाहीत. सातत्याने खोटे बोलत महाराष्ट्रभर फिरणारे नरेंद्र मोदीच खरे भटकते आत्मा आहेत. मोदींनी कोणती पदवी घेतली हे माहित नाही पण त्यांना जाहिरनामा वाचता येत नसेल तर काँग्रेस त्यांना समजवून सांगेल. काँग्रेसबद्दल सातत्याने खोटे बोलून नरेंद्र मोदींनी जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करु नये, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सर्वे करणार असल्याचे म्हटले आहे. याआधीही एससी, एसटी समाजाचे आर्थिक, सामाजिक सर्वे करण्यात आले आहेत, त्यावेळी मंगलसुत्र, स्त्रीधन हिरावून घेण्याचा प्रश्न उपस्थित झाला नाही आताच का झाला. संपत्ती करावरूनही मोदी जनतेना चुकीची माहिती देत आहेत. संपत्ती कराबद्दल वाजपेयी सरकारने चर्चा केली होती आणि मोदी यांचे अर्थमंत्री अरुण जेटली, जयंत सिन्हा आणि निर्मला सितारामन यांनीच संपत्ती कर आणण्याचे सुतोवाच केले होते. १० वर्षात सत्तेत असताना मोदींनी काय केले ते सांगावे, देशाची संपत्ती विकून देश चालवला, रुपयाची घसरण झाली तो प्रति डॉलर ९० रुपयांवर गेला. शेतकऱ्यांना फसवले, महागाई, बेरोजगारी वाढवली त्याबद्दल नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत फक्त धार्मिक मुद्द्यावर बोलून समाजात तेढ निर्माण करत आहेत.

महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच आहेत, त्यांना चैनच पडत नाही, १० वर्ष ते फक्त प्रचारच करत आहेत. दिवसभर सारखे कपडे बदलून फोटोसेशन करणे, कधी समुद्राच्या खाली तर कधी हवेत. असा पंतप्रधान देशाने याआधी पाहिला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर नाहक टीका करून वेळ वाया घालवू नये. काँग्रेसने देश टिकवला, सांभाळला म्हणून शिंदे आज मुख्यमंत्री होऊ शकले पण मोदी सत्तेत आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणे बदलली, जीएसटी लावून जनतेला लुटले व मित्रांचे खिशे भरले. काँग्रेसने शेवटच्या माणसाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आणि भाजपा तर या घटकला पुन्हा विकासाच्या बाहेर फेकत आहे. कांदा निर्यातबंदी उठवलेली नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही, पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत त्यावर सरकारने बोलले पाहिजे. पुण्यात एमपीएससीच्या मुलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष घातले पाहिजे. राज्यात पाणी नाही, दुष्काळ पडला आहे त्याकडे मुख्यमंत्री व सरकारने लक्ष देण्याची गरज असताना खोके-बोके सरकार एकत्र येऊन सत्तेची मलई खाण्यात व्यस्त आहे.

देवेंद्र फडणवीसांनी कोणताही शाप दिला तरी तो लागत नाही, त्यामुळे सत्यानाथ होईल या त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्याचे काय झाले त्यावर बोला, राज्यातील उद्योग गुजरातला पाठवले त्यावर बोला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काळीमा फासणाऱ्या फडणवीस यांना शाप देण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

तळपत्या उन्हात सावली,या झाडाची लाभली…

तशीच तमाम जनतेची साथ,’घड्याळा”पाठी एकवटली..!

भर दुपारी रखरखत्या उन्हात महायुतीच्या उमेदवार सूनेत्रावाहिनी पवार यांनी वटवृक्षाचे छायेत घेतली प्रचारसभा…!

बारामती-सोनवडी या गावात एका भल्यामोठ्या वटवृक्षाच्या छायेत सौ सुनेत्रा पवार यांनी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधला .बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील आजच्या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी सावंतवाडी गावापासून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची माहिती देऊन केला. यावेळी
सावंतवाडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले व सन्मान केला. त्यानंतरमताधिक्याचीही ग्वाही दिली यावेळी माहितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दुपारच्या वेळी येणाऱ्या काळात आपला हा भाग केद्रसरकरच्या माध्यमातून पाणी टंचाईमुक्त करण्याचा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.

काँग्रेस संधी मिळताच तुमची संपत्ती हिरावून घेईल:पंतप्रधान मोदींनी पुन्हा दाखवली भीती

माळशिरस-काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती हिसकावून घेईल असे संपत्ती हिसकवणारे सरकार तुम्हाला सत्तेवर हवे का?, असा सवाल माळशिरसमध्ये देखील बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. इथले मोठे नेते कृषीमंत्री असताना ऊसाचा FRP 200 रुपये होता, असा टोला नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला आहे. 60 वर्षांत यांना जे जमले नाही ते आम्ही 10 वर्षांत करुन दाखवले, असे म्हणताना अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण केले, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. हायव्होल्टेज लढतीसाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली. 60 वर्षांत काँग्रेस जे करू शकले नाही ते आम्ही करून दाखवले. 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केले असे मोदींनी सांगितले.15 वर्षांपूर्वी एक मोठा नेता निवडणूक लढवण्यास आले होते. इथे दुष्काळाने प्रभावित क्षेत्रात पाणी पोहोचवू, अशी शपथ त्यांनी तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने घेतली होती. त्यांनी पाणी दिले का ? आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. आज त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

विकासित भारतासाठी मी मत मागायला आलो आहे. मी वेळेत येतो, दूरवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, त्यामुळे मला क्षमा करा. काही राजकीय नेत्यांनी सभेला उशीरा येण्याची फॅशन केली होती. काही लोक अजूनही येत आहेत, त्यांची मी माफी मागतो. पण, मला पुढील सभेसाठी जायचे असल्याने मी वेळेत आलो आहे, मला माफ करा, या शब्दांत मोदींनी उशिरा येणाऱ्या लोकांची माफी मागितली.

मराठवाडा, विदर्भाला पाण्यासाठी यांनी त्रासवले आहे. काँग्रेसला जनतेने 60 वर्षे राज्य करण्याची संधी दिली. मात्र, काँग्रेस शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोणी पोचवू शकली नाही. जवळपास 100 योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. त्यातील 26 योजना महाराष्ट्रातील होत्या. एवढा मोठा धोका त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. सर्वांना पणी देण्याची माझी योजना आहे. सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मी संपूर्ण ताकद लावली आहे. आतापर्यंत 36 योजना पूर्ण झाल्या आहेत. नीळवंडे धरण आम्ही पूर्ण केले आहे, गोसे खुर्दसाठी काम चालू आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ हे दोन दिवस वॉक-इन रिक्रुटमेंट मोहीम आयोजित करणार

पुणे:  भारतामध्ये एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी एक आघाडीची खाजगी कंपनी टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ रोजी पिंपरीतील हॉटेल कॅरिअडमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैद्राबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या हैद्राबाद आणि पुणे फॅसिलिटीमध्ये एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैद्राबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या हैद्राबाद आणि पुणे फॅसिलिटीमध्ये एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैद्राबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देते. सर्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक सेवासुविधा उत्पादने विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञान व अनुभवाचा वापर करता यावा यासाठी पूरक वातावरण पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.

जागतिक पातळीवरील आघाडीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आंतरराष्ट्रीय पुरवठा शृंखलेतील एक अविभाज्य सहयोगी आहे. आघाडीच्या डिफेन्स ओईएम कंपन्यांसाठी ही कंपनी ग्लोबल सिंगल सोर्स प्रोव्हायडर आहे.

‘टेकफेस्ट’मुळे विद्यार्थ्यांतील तांत्रिक कौशल्य, कलागुणांना वाव- प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

‘सूर्यदत्त’मध्ये दोन दिवसीय ‘टेकफेस्ट-२०२४’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए विभागातर्फे आयोजित टेकफेस्ट-२०२४ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रगत तंत्रज्ञान, नवोन्मेषाचे दर्शन घडले. सामाजिक सुधारणेसाठी प्रगत तंत्रज्ञान आणि नवकल्पना या विषयावरील विविध कार्यक्रमांचे या दोन दिवसीय परिषदेत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वेळेचे व्यवस्थापन, योग्य संगणन साधने आणि त्याचे ऍप्लिकेशन यांसारख्या महत्त्वाच्या व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रांवर विचारमंथन झाले.

‘टेकफेस्ट’मध्ये ‘मिस्टर अँड मिसेस टेक्नोक्रॅट’, ‘माईंड स्वीपर’, ‘बॅटल विथ कोड’ आणि ‘गेम ग्लायडर’ या प्रमुख चार कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तांत्रिक, तार्किक आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे, पाठ्यक्रम व अवांतर स्वरूपाची प्रश्नमंजुषा स्पर्धा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट स्पर्धा, दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी इनोव्हेशन आदी गोष्टींचा यामध्ये समावेश होता. पुण्यातील विविध शिक्षण संस्थांतील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी टेकफेस्टमध्ये सहभाग घेतला.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या ‘टेकफेस्ट’चे उद्घाटन सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या संचालक प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांच्या हस्ते झाले. प्रसंगी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, निमंत्रित पाहुणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या स्पर्धांतून विद्यार्थ्यांमधील प्रोग्रामिंग स्किल्सचे मूल्यांकन झाले. शिक्षक, विद्यार्थी यांच्यातील समन्वय आणि व्यवस्थापनाचा पाठिंबा, त्यातून झालेले सूक्ष्म नियोजन आणि कठोर परिश्रम यातून ‘टेकफेस्ट’ यशस्वी झाले. यामध्ये झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाचे संयोजन संबंधित विभागातील तज्ज्ञ प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या टीमने केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. भविष्यातील शिक्षण क्षेत्रात अंतर्भूत होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमतेविषयी त्यांनी त्यांचा दृष्टीकोन व महत्वपूर्ण आयाम सांगितले.

क्लेव्हर ग्राउंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ पाथरे, मुख्य कार्यपालन अधिकारी स्वप्नील दाभोलकर, अमित श्रीवास्तव आणि डॉ. रजनीश मिश्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिगत तसेच सांघिक बक्षीस देण्यात आले. रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. डॉ. विद्या गवेकर आणि प्रा. मेघा माने यांच्यासह एमसीए विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या टीमने परिषदेच्या यशस्वी संयोजनात योगदान दिले.
विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य विकसित व्हावीत, प्रगत तंत्रज्ञान, नवकल्पना निर्मितीसाठी चालना मिळावी, याकरिता सूर्यदत्त संस्थेत सातत्याने विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन केले जाते. ‘टेकफेस्ट’मुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानातील प्रवाह समजून घेता आले. अनेकांनी नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांच्यातील नवोन्मेषाचा दृष्टीकोन प्रगल्भ होत जातो. ‘सूर्यदत्त’मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देतानाच त्यांच्यातील कलागुणांना, कौशल्याना वाव देण्यावर भर दिला जातो.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

 पंतप्रधान मोदींसाठीच्या पगडीने वेधले लक्ष !

‘पगडी निर्मिती ठरली रोमांचक क्षण’ :गिरीश मुरुडकर 
पुणे :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील रेसकोर्स येथे सभेला संबोधित करताना परिधान केलेली  खास ‘दिग्विजय पगडी’ लक्षवेधी ठरली.’पाहताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केली होती आणि ही निर्मिती प्रक्रिया आमच्यासाठी रोमांचक क्षण ठरली’अशा भावना मुरडकर झेंडेवाले यांच्यातर्फे गिरीश मुरुडकर यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली. 
महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी या पगडी निर्मितीची जबाबदारी मुरुडकर  झेंडेवाले यांना दिली होती.त्यानुसार गिरीश मुरुडकर,अनुराधा मुरूडकर आणि यश मुरुडकर यांनी ही अनोखी निर्मिती  साकारली होती.पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आजवर विविध पगडी घालून स्वागत करण्यात आले असून यंदाची पगडीही चर्चेचा विषय ठरली . 
याबाबत माहिती देताना गिरीश मुरुडकर म्हणाले, ‘ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी  तुळजाभवानीची प्रतिमा होती. दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचाची संकल्पना यातून प्रतीत होत होती. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आणि ती लक्षवेधी ठरली.उन्हाळा लक्षात घेऊन सुसह्य ठरणारी बांधणी करण्यात आली होती.अशा कलात्मक आणि जबाबदारीच्या निर्मितीसाठी किमान १५ दिवस विविध संकल्पना,साहित्य यावर काम सुरु असते.’
मुरलीधर मोहोळ  म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले गेले. पण दिग्विजय  पगडी निश्चितच विशेष ठरली. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी  मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी होती.’

बापटांच्या सुनबाईं.. दिसल्या सुत्रसंचालकाच्या भूमिकेत….

पुणे-पुण्याचा पाणी प्रश्न असो कि कसब्याचा पाणी प्रश्न असू द्यात पाण्याच्या प्रश्नावर सदैव जागृत असणारे खासदार म्हणून ज्यांची ओळख होती,असे भाजपाचे निष्ठावंत तत्कालीन खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचे नाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवारीसाठी नेहमी घेतले जात होते.त्या स्वरदा बापट काल माजी महापौर आणि लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महायुतीचे अन्य उमेदवार यांच्या साठी PM मोदींच्या सभेचे सूत्र संचालन करताना दिसल्या.

गिरीश बापट यांच्यासह योगेश गोगावले,विजय काळे,सुहास कुलकर्णी अशा जुन्या भाजपच्या रथी महारथींची नावे कुणाला माहितीत नाहीत.भाजपचा घडत्या काळात टाक्याचे घाव सोसलेल्या अनेकांना कालचे मोदींचे भाषण कसे वाटले ? हा प्रश्न औत्सुक्याचा वाटणार आहे.पण मोदींच्या भाषणात स्वतः मोदींनी स्वतःचे नाव अनेकदा उच्चारले हे राजकीय समीक्षकांच्या ऐकण्यातून सुटले तर नवलच.तुमच्या घरातील ७० वर्षाच्या पुढील ज्येष्ठांच्या औषधांची काळजी मोदी घेईल.मोदी हे करेल,मोदी ते आहे ना ? अशी अनेक आणि काही बॉलीवूड स्टाईलची वाक्ये प्रेक्षक आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करत होती मात्र यावर यांना ग ची बाधा तर झाली नाही ना ? ‘ अशी शंका काहींना चाटून जात होती. भाजप पार्टीच्या पेक्षा मोदींच्या नावाचा गवगवा या सभेत जास्त होत होता.यामुळे पार्टी पेक्षा मोदी यांना जास्त वयक्तिक सापेक्ष जास्त महत्व प्राप्त झाल्याचे जणू अधोरेखित होत होते.

दळवी हॉस्पिटलला ‘पीपलफाय’तर्फे रुग्णवाहिका भेट

पुणे: पीपलफाय कंपनीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या दळवी हॉस्पिटलला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. आठ लाख रुपयांच्या देणगीतून अत्याधुनिक आरोग्यसुविधांनी सुसज्ज अशी ही रुग्णवाहिका नुकतीच दळवी हॉस्पिटलकडे सुपूर्द करण्यात आली.
सासवड रस्त्यावरील दळवी हॉस्पिटल आसपासच्या भागात आरोग्यसुविधा देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. परंतु, या भागातील गोरगरीब रुग्णांना वेळ व पुरेशा वाहतूक सांध्यांच्या अभावी वैद्यकीय सेवा मिळण्यात विलंब होत होता. या रुग्णवाहिकेमुळे गरजूंना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. परिणामी, वैद्यकीय सेवा सुलभ होईल आणि रुग्णांचे जीव वाचतील.
‘पीपलफाय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व राउंड टेबल इंडियाचे सदस्य राजेश भारतीय म्हणाले, “मानवतेसाठी कार्यरत पीपलफायच्या सामाजिक सेवा विभागाने पुन्हा एकदा समाजात बदल घडविण्याचे उदाहरण घालून दिले आहे. दळवी हॉस्पिटल रुग्णवाहिका भेट करत समाजाप्रती असलेली करुणा व कटिबद्धता दाखवून दिली आहे. या उपक्रमामुळे आरोग्यसेवा सुधारण्यावर व समाजातील रुग्णांचे जीव वाचवण्यावर प्रभाव पडेल.”

लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी नागरिकांनी कर्तव्ये पार पाडावीत
लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांचे प्रतिपादन

पुणेभारतीय संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानात दिलेली कर्तव्ये पार पाडली तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन जनरल ऑफिसर, कमांडिंग इन चिफ दक्षिण कमांड लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी केले.

भारतीय लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीच व ‘माणिकचंद ग्रुप’च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल-बालन आणि दक्षिण महाराष्ट्र व गोवा उप विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल विक्रांत नाईक हे यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अजय कुमार सिंग म्हणाले की, ‘‘संविधान उद्यान चौकाचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे. जगात भारताचे संविधान विशेष असे आहे. ज्यांनी संविधानाची कल्पना मांडली आणि ते तयार केले हे अत्यंत महत्त्वाचे काम होते. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. बदल्यात परिस्थितीनुसार त्यात बदल झाले हेही महत्वाचे आहे. या संविधानात आपल्याला मुलभूत असे अधिकार दिले असून त्यात आपल्या कर्तव्यांचा समावेश आहे. प्रत्येक नागरिकाने आपले मुलभूत अधिकार समजून घेतले पाहिजेत आणि त्याचबरोबर आपली कर्तव्येही पार पाडली पाहिजेत. असे केले तर २०४७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.’’

भारतीय सैन्य आणि प्रामुख्याने साऊथ कमांड यांच्याकडून पुणेकरांसाठी हे संविधान उद्यान उद्यान विशेष अशी भेट आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्या समजतील. तसेच संविधान उद्यानासारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असून त्यासाठी सिंग यांनी पुनीत बालन यांचे आभारही व्यक्त केले.

‘‘आपला देश ज्या संविधानावर चालतो. त्याचे भारतातील पहिले संविधान उद्यान भारतीय लष्करासमवेत तयार करताना हातभार लागला याचा मनापासून आनंद होतो. या संविधानातील मुलभूत अधिकार आणि आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ नेहमीच अग्रेसर राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने मी देतो.’’

  • पुनीत बालन
    अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
    ————————————————-
    काय आहे संविधान उद्यानात?
    लष्कर भागात असलेल्या या संविधान उद्यानात भारतीय ससंदेच्या प्रतिकृत्तीवर राजचिन्ह असलेली तीन सिंहांची प्रतिकृती असून त्यावर संविधान लावण्यात आले आहे. तसेच उद्यानाच्या परिसरात संविधानातील नागरिकांची अकरा कर्तव्ये यांची माहितीही देण्यात आली आहे.

मावळचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांची माध्यम कक्षाला भेट

पुणे,: मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत श्री. राजशेखर यांनी समाधान व्यक्त केले.

निवडणूक निरीक्षक श्री.राजशेखर यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

निवडणूक निरीक्षकांनी सीव्हिजील कक्षालाही भेट देऊन नागरिकांच्या तक्ररी संदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली.

कोविशील्ड लसीमुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका:ब्रिटीश कोर्टात कंपनीने मान्य केले

ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने कबूल केले आहे की त्यांच्या कोविड-19 लसीचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात. ब्रिटिश मीडिया टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, ॲस्ट्राजेनेकावर त्यांच्या लसीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. इतर अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागले.AstraZeneca लस भारतात Covishield म्हणून ओळखली जाते. ब्रिटीश उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, कंपनीने मान्य केले की त्यांच्या कोरोना लसीमुळे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम किंवा टीटीएस होऊ शकतो.असे वृत्त भारतातील अनेक माध्यमांनी दिले आहे .

या वृत्तात असेही म्हटले आहेकी,’ या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही असतो. कंपनीविरुद्ध 51 प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. पीडितांनी AstraZeneca कडून सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.AstraZeneca ने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आपली लस विकसित केली आहे. कंपनीने सुनावणीदरम्यान कबूल केले की त्यांच्या लसीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि इतरांना गंभीर आजार झाला, तर त्यांना मोठा दंड होऊ शकतो.

वास्तविक, एप्रिल २०२१ मध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीला ही लस मिळाली होती. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्रावही झाला. अहवालानुसार, डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला सांगितले की ते स्कॉटला वाचवू शकणार नाहीत.

कंपनीने कायदेशीर कागदपत्रांमध्ये दुष्परिणाम मान्य केले
गेल्या वर्षी स्कॉटने ॲस्ट्राझेनेकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मे 2023 मध्ये, स्कॉटच्या आरोपांना प्रतिसाद म्हणून, कंपनीने दावा केला की त्यांच्या लसीमुळे TTS होऊ शकत नाही. मात्र, या वर्षी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टात सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये कंपनीने हा दावा मागे घेतला.AstraZeneca ने लिहिले की काही प्रकरणांमध्ये त्यांच्या लसीमुळे TTS होऊ शकते. मात्र, कंपनीकडे सध्या या लसीमध्ये हा आजार कशामुळे होतो याची माहिती उपलब्ध नाही. ही कागदपत्रे समोर आल्यानंतर स्कॉटच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड लसीमध्ये त्रुटी आहेत आणि तिच्या प्रभावीतेबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती.

शास्त्रज्ञांनी मार्च 2021 मध्ये लस-प्रेरित इम्यून थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (VITT) हा नवीन रोग ओळखला. पीडितांशी संबंधित वकिलांनी दावा केला आहे की VITT हा TTS चा उपसंच आहे. मात्र, ॲस्ट्राझेनेकाने हे नाकारले.AstraZeneca म्हणाले, “ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे किंवा गंभीर आजारांनी ग्रासले आहे त्यांच्यासाठी आम्ही दुःखी आहोत. रुग्णांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. आमचे नियामक अधिकारी सर्व औषधे आणि लसींच्या सुरक्षित वापरासाठी सर्व मानकांचे पालन करतात.”कंपनीने पुढे म्हटले आहे की, “विविध देशांतील क्लिनिकल चाचण्या आणि डेटाने हे सिद्ध केले आहे की आमची लस सुरक्षा मानकांची पूर्तता करते. जगभरातील नियामकांनी हे देखील मान्य केले आहे की लसीचे फायदे त्याच्या दुर्मिळ दुष्परिणामांपेक्षा कितीतरी जास्त आहेत.”

AstraZeneca ने 6 दशलक्ष लोकांचे प्राण वाचवले
कंपनीने असाही दावा केला आहे की एप्रिल 2021 मध्येच त्यांनी उत्पादनाच्या माहितीमध्ये काही प्रकरणांमध्ये टीटीएसचा धोका समाविष्ट केला होता. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, कोरोना महामारीच्या काळात ॲस्ट्राझेनेका लस लागू केल्यानंतर पहिल्याच वर्षात जवळपास ६० लाख लोकांचे प्राण वाचवले आहेत.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने असेही म्हटले होते की ही लस 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे. याच्या प्रक्षेपणाच्या वेळी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा ब्रिटिश विज्ञानाचा मोठा विजय असल्याचे म्हटले होते.

AstraZeneca लस ब्रिटनमध्ये वापरली जात नाही
विशेष म्हणजे ही लस आता ब्रिटनमध्ये वापरली जाणार नाही. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांना ही लस बाजारात आणल्यानंतर काही महिन्यांनी त्याचा धोका लक्षात आला होता. यानंतर, 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीचा दुसरा डोस द्यावा, अशी सूचना करण्यात आली. कारण AstraZeneca लसीमुळे होणारी हानी कोरोनाच्या धोक्यापेक्षा जास्त होती.

मेडिसिन्स हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी (MHRA) नुसार, ब्रिटनमध्ये 81 प्रकरणे आहेत ज्यात लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. MHRA नुसार, साइड इफेक्ट्स झालेल्या प्रत्येक पाच लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

वृत्तानुसार, माहितीच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सरकारने फेब्रुवारीमध्ये ब्रिटनमध्ये 163 लोकांना नुकसानभरपाई दिली होती. यापैकी १५८ जणांना ॲस्ट्राझेनेका लस मिळाली होती.

‘अनुवेध’ मधून कथक नृत्याचे  विलोभनीय दर्शन !

पुणे :आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त ‘मनीषा नृत्यालय’च्या वतीने  आयोजित  ‘अनुवेध ‘ या कथक नृत्य सादरीकरणाला सोमवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे यांच्या शिष्यांनी आपापल्या विद्यार्थीनींसमवेत विलोभनीय  नृत्य सादर केले तसेच  मनीषा साठे यांनीही नृत्यरचना सादर करून  आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाचा आनंद द्विगुणित केला ! एकूण १३५ नृत्यांगनांनी या सादरीकरणात सहभाग घेतला. 


 हा कार्यक्रम दि.२९ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे सायंकाळी ६ वाजता झाला.ज्येष्ठ लेखक आणि कला समीक्षक आशीष मोहन खोकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शांभवी दांडेकर,शिल्पा दातार,मंजिरी कारुळकर,पद्मश्री जोशी,पूर्वा शाह,मानसी गदो ,तेजस्विनी साठे, माधुरी आपटे,गौरी स्वकुळ,ईशा काथवटे,अदिती कुलकर्णी,पायल गोखले,वल्लरी आपटे,मिथिला भिडे,मधुरा आफळे यांनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी  कार्यक्रमात नृत्य सादर केले.ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे यांनी एक श्लोकी रामायणावर आधारित एक नृत्यरचना  सादर केली . त्यांच्या शिष्यांनी झपताल,रास नृत्य,चतरंग,देवी अभंग,पदन्यास,बंदिश,संयुज,गज झंपा  ताल,चांद्रयान पोवाडा,अभिसारिका बंदिश,कथक जेंबे,श्याम छबी,तराणा  आदी सादरीकरणे प्रभावीपणे सादर केली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.संपूर्ण नाट्यगृह नृत्यरसिकांनी भरले होते. 

सूत्रसंचालन वल्लरी आपटे यांनी केले.  तर नृत्य कार्यक्रमाचे निवेदन अदिती कुलकर्णी यांनी केले.यावेळी मनिषा साठे यांच्या सर्व शिष्यांनी त्यांचा  सत्कारही केला .अजय पराडे, शमा भाटे, अतुल उपाध्ये, अजय धोंगडे, केदार पंडित, रवींद्र दुर्वे ,नितीन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.  

*नृत्यातून प्रकटावेत नवोन्मेष ! :मनीषा साठे*

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आयोजित ‘अनुवेध’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे म्हणाल्या,’
शिष्यांनी नृत्य सादर करताना वा नृत्य रचना करताना, पूर्वी स्वतः वा दुसऱ्याने केलेल्या रचना वा विचारांची पुनरावृत्ती करू नये, तर प्रत्येक वेळी नवनवीन विचार , कथा, संकल्पना व नृत्य रचना नाविन्यपूर्ण सादर करावी अशी माझी अपेक्षा असते, आणि या कसोटीमध्ये या वर्षीही माझ्या शिष्या   यशस्वी झाल्या.नृत्यातून नवोन्मेष प्रकटावेत आणि त्यासाठी परिश्रम घ्यावेत.देशाला आणि पुण्याला नृत्याची उज्वल परंपरा आहे,ही परंपरा पुढे नेण्यासाठी योगदान द्यावे’.  

ज्येष्ठ कला समीक्षक आशीष खोकर म्हणाले,’आज ज्या नृत्यांगनांनी नृत्य सादर केले ते अतिशय उत्तम तयारीचे होते.कथक नृत्याचा दिल्ली हा गड नसून खऱ्या अर्थाने पुणे हाच नृत्याचा गड आणि धरोहर आहे.पुणे हे संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर जगाला भरतनाट्यम आणि कथक नृत्याच्या दृष्टीने सतत प्रेरणा देणारे शहर आहे, आणि यात अर्थातच नृत्य गुरूंचा वाटा, त्यांचं ज्ञान आणि परिश्रम महत्वाचे आहे,

मोदींना मजमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून महाराष्ट्राची आत्मा-जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मजमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवार यांच्याकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीपूर्वी आणि नंतर वेगवेगळे अनुभव आपण घेतले आहेत. पण, यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी साम-दाम-दंड भेद वापरून सत्तेवर यायचे ठरवले आहे. त्यांचा भारतभर फिरणारा अश्वमेधाचा वारू हा महाराष्ट्राता शरद पवार यांनी अडवला आहे. त्यामुळे रात्रंदिवस पंतप्रधान मोदी शरद पवार यांच्यावर टीका करतात.

जयंत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर केवळ पवार साहेबांवरच बोलणे त्यांच्यावर टीका करणे, याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची भाषणे ऐकली. मात्र, विरोधकांवर नाहक टीका करण्याचे काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केले नव्हते. मोदींचा 400 पारचा नारा आता बंद झाला आहे. आता भाजप 200 पारही जाणार नाही. मोदी आणि शहा यांनी मराठी माणसाने तयार केलेले दोन पक्ष फोडले. याची शिक्षा मराठी माणूस त्यांना मतदानातून देणार आहे. अमित शहा यांनी गुजरातमध्ये केलेले एक काम सांगावे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले होते ?

मी जे काही बोलेल ते कोणी व्यक्तिगत घेऊ नये असे सुरुवातीलाच सांगून मोदी म्हणाले, ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांचा आत्मा भटकत असतो. ज्याचे स्वत:चे काम होत नाही ते दुसऱ्याचेही काम बिघडवतात. महाराष्ट्र अशाच एका अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय. 45 वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेकडे ओढला गेला. यानंतर अनेक मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. हा आत्मा केवळ विरोधकांचा नव्हे, तर आपल्या पक्षालाही अस्थिर करतो. आता कुटुंबातही असेच करत आहे. 1995 मध्ये राज्यातील शिवसेना- भाजपच्या सरकारलाही या आत्म्याने अस्थिर करण्याचे काम केले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा इतका मोठा अपमान केला, जे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. आज तर हा आत्मा देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ करत आहे. त्यामुळे अशा भटकत्या आत्म्यापासून देशाला वाचवा, असे आवाहन मोदींनी केले.