पुणे : विश्वबंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन या संस्थाच्या वतीने बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित पहिल्या विश्वबंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गझलकार मीना शिंदे यांची, तर स्वागताध्यपदी पंचविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मधुश्री ओव्हाळ यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
प्रकाश रोकडे म्हणाले, “येत्या २ जून २०२४ रोजी दिवसभर हा काव्यमहोत्सव नवी पेठेतील पत्रकार भवनाच्या सभागृहात होणार आहे. बंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या अध्यक्षा मीना शिंदे यांच्या ‘दीवान-ए-मीना’ या गझल संग्रहाची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हा १७१ मराठी गझलांचा संग्रह गझल विश्वातील एक अभिनव ग्रंथ ठरला आहे. यापूर्वी त्यांचा ‘स्पंदन’ हा कविता संग्रह, हृद्गत हा गझलसंग्रह प्रकाशित झाला असून गझल रुपेरी आणि कातर वेळी या सीडीही प्रसिद्ध आहेत.”
‘महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मुख्य निमंत्रक ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, मुख्य संयोजक प्रा. प्रशांत रोकडे आणि डॉ. बंडोपंत कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
विश्वबंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी मीना शिंदे,तर स्वागताध्यक्षपदी मधुश्री ओव्हाळ यांची निवड
मोदी बलात्काऱ्यासाठी मते मागताहेत:त्यांनी त्याला भारतातून पळून जाण्यास मदत केली, ही मोदींची गॅरंटी आहे
बेंगळुरू-पंतप्रधान बलात्काऱ्यासाठी मते मागत असल्याचा आरोप आज येथे राहुल गांधी यांनी केला. त्यांनी बलात्काऱ्याला भारतातून पळून जाण्यास मदत केली. ही मोदींची गॅरंटी आहे काय ? असा सवाल हि त्यांनी केला .राहुल गांधी यांनी आज गुरुवार, 2 मे रोजी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे जाहीर सभेला संबोधित केले. कर्नाटकात भाजप आणि जेडीएस यांची युती आहे. जेडीएस खासदार आणि एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना गौडा यांच्यावर बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे.
आम्ही महालक्ष्मीबद्दल बोलत असतानाच देशाचे पंतप्रधान चिडतात असेही राहुल म्हणाले. कारण त्यांच्या अब्जाधीश मित्रांना पैसे मिळत नाहीत.
राहुल यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- आम्ही पहिली रोजगार हमी योजना राबवणार आहोत. तुम्हाला एका वर्षासाठी नोकरी मिळेल, तुमच्या खात्यात दरमहा 8500 रुपये जातील, तुमच्याकडे वर्षभरात 1 लाख रुपये असतील. भारतातील सर्व पदवीधरांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे.
- त्यांनी (भाजप सरकारने) तुम्हाला बेरोजगारी दिली, आम्ही तुम्हाला शिकाऊ शिक्षणाचा अधिकार आणि जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण देणार आहोत.
- आमचे सरकार तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार देणार आहे. सध्या तुम्हाला युथ फंडात दरमहा 3,000 रुपये मिळतात.
प्रज्वलवर बलात्काराचा आरोप
26 एप्रिल 2024 रोजी कर्नाटकातील हसन लोकसभा जागेवर मतदान झाले होते. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा 33 वर्षीय नातू प्रज्वल येथून निवडणूक लढवत आहे. मतदानापूर्वी 200 हून अधिक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिला रडत होत्या आणि वाचवण्याची विनंती करत होत्या आणि प्रज्वल हा व्हिडिओ शूट करत होता.
भाजप नेते देवराज गौडा यांनी दावा केला की प्रज्वलच्या पेन ड्राईव्हमध्ये 2900 हून अधिक अश्लील व्हिडिओ आहेत. सध्या प्रज्वल परदेशात आहे. मतदानानंतर ते जर्मनीला रवाना झाल्याचे बोलले जात आहे.
व्हायरल व्हिडिओबाबत रेवन्ना यांच्या घरातील मोलकरणीने एचडी रेवन्ना (67) आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना (33) यांच्याविरुद्ध 28 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की एचडी रेवन्ना पत्नी घरी नसताना तिला आणि इतर महिला कर्मचाऱ्यांना खोलीत बोलावत असे.
शरयू, राधा, लाभाची विजयी सलामी
सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने एसबीए कप सुपर – ५०० बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : शरयू रांजणे, राधा गाडगीळ, लाभा मराठे यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विजयी सलामी दिली.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत शरयू रांजणेने दुस-या मानांकित हृदया साळवीला २१-५, २१-५ असा पराभवाचा धक्का दिला. पीयूषा फडकेने श्रावणीने पासलकरवर २१-१४, २१-१६ अशी, तर सिद्धी जगदाळेने सुरभी अखाडेवर २१-८, २१-९ अशी मात केली. राधा गाडगीळने अदिती गिरीवर २१-५, २१-९ असा, लाभा मराठेने शौनक वेंकटेशवर २१-४, २१-१२ असा, शर्वरी सुरवसेने जैश्ना पुनियावर २१-६, २१-७ असा विजय मिळवला.
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या सलामीच्या लढतीत अक्षर झोपेने जयंत झाडेला १३-२१, २१-७, २१-१८ असा, ईशान भटने सिद्धार्थ पानिस्करवर १६-२१, २१-८ २१-१९, समित पंतने आदित्य दहाडवर २२-२०, २१-१५ वत्सल तिवारीने रुद्रा सोनावणेवर २१-४, २१-८ असा विजय मिळवला.
पहिल्या फेरीचे निकाल – ११ वर्षांखालील मुली – ओवी वायळ वि. वि. शनया पालिवाल २१-१७, १३-२१, २१-१७, तेजस्वी दरेकर वि. वि. स्वरा वायळ २१-७, २१-८, रनैषा शाह वि. वि. काश्वी काळे २१-१०, २१-४, राजलक्ष्मी थेउरकर वि. वि. अद्विका बेलखेडे २१-११, २१-८, पूर्वा हांडे वि. वि. शर्वी काळे २१-५, २१-७, शुभ्रा मासळेकर वि. वि. आस्था अगरवाल २१-१३, १७-२१, २७-२५, निधी गायकवाड वि. वि. आराध्या डोंगरे २१-६, २१-२, शनया राजवाडे वि. वि. पूर्वी सक्सेना २१-१३, २१-१०.
११ वर्षांखालील मुले – ईशान हेलवडे वि. वि. स्वरांश मनू २१-१२, २१-१३, वरद आठल्ये वि. वि. रणवीर सूर्यवंशी २१-१६, २१-१०, तनीष अनपट वि. वि. अथर्व जगदाळे १५-२१, २१-१९, २१-१२, वेदांत मोरे वि. वि. भाविन गिडवाणी २१-५, २१-३, आगम अचलिया वि. वि. शंतनू चिरपुटकर २१-६, २१-८, अरहम अचलिया वि. वि. साहीर भाटिया २१-५, २१-११, चिन्मय गोसावी वि. वि. निश्चय संदीप २१-४, २१-१०, कृष्णा सावंत वि. वि. श्रीयश सोनावणे १७-२१, २१-१६, २१-१९, कबीर तांबे वि. वि. अथर्व शिंदे २३-२१, २१-१९, ईशान रॉय वि. वि. निहार मुंदळे २१-४, २१-८, अर्निश काटोरे वि. वि. दिग्विजयसिंह रांजणे २१-१५, २१-१८, अमन वर्मा वि. वि. निशाद पाटील २१-६, २१-१०, अर्चित खांदेशे वि. वि. विहान गांगल २१-१०, २१-१०.
१३ वर्षांखालील मुले – आरोही देसाई वि. वि. माही छावलानी २१-१३, २१-१८, अन्वय समग वि. वि. अनूज भोसले २१-१६, २१-१२, स्मित थोकल वि. वि. बुरहानुद्दीन अत्तरवाला २१-८, २१-१७, कियांश शर्मा वि. वि. अद्विक बाफना २१-३, २१-११, अभिनव भोंडवे वि. वि. यश हांडे २१-१०, २४-२२, अयान त्रिवेदी वि. वि. आरोह गोगटे २१-१२, १७-२१, २१-१८, रितेश सावरवाला वि. वि. सन्मित सहस्त्रबुद्धे २१-१६, २१-१६, विस्मय म्हस्के वि. वि. अदित कानेटकर २१-११, २१-११, शौर्य खरात वि. वि. आनंद खरचे २१-४, २१-७, खूष दीक्षित वि. वि. ओम केने २१-११, २१-१८, अर्णव पाटील वि. वि. ईशान ठकार २१-१०, २१-५.
१३ वर्षांखालील मुली – मुद्रा मोहिते वि. वि. तेजस्वी दरेकर २१-१५, २१-१९, निधी गायकवाड वि. वि. अदिती चौधरी २१-९, २१-४, आरोही देसाई वि. वि. माही छावलानी २१-१३, २१-१८.
१५ वर्षांखालील मुले – विघ्नेश सुतार वि. वि. स्पंदन वाडके १६-२१, २१-१३, २१-१४, आरुष सापळे वि. वि. अरहम बरडिया २१-८, २१-१०, वरुण हवालदार वि. वि. अर्चित कुरुलकर २१-१४, १८-२१, २८-२६, नील गोएल वि. वि. शौनक वेंकटेश २१-४, २१-५, माधव कामत वि. वि. चिराय नारकर २१-८, २१-४, नयन भामरे वि. वि. रेयांश थोरवे २१-११, २१-८, दिव्यान कौशिक वि. वि. पलष वर्मा २३-२१, २१-१५, जयंत झाडे पुढे चाल वि. ईशान अलूर, प्रथमेश जगदाळे वि. वि. ताहेर अत्तरवाला २२-२०, १९-२१, २१-१७, आर्यन भोसले वि. वि. रिहान हन्सदा २२-२०, १०-२१, २१-१५, आरुष वकील वि. वि. वेदांत ओगळे २२-२०, २१-१६.
लोकांच्या प्रश्नांची सोडवणुक करणं ही जबाबदारी; जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणार : सुनेत्रा पवार
पुणे : माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणुक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली.
सुनेत्रा पवार यांनी पुरंदर-हवेली मतदारसंघातील वडकी, देवाची उरुळी, हांडेवाडी, होळकरवाडी, अवताडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी आदी भागांचा दौरा केला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, मोनिका हरगुडे, गणेश ढोरे, संदिप हरपळे, स्नेहल दगडे, स्वाती ठोंबरे, प्रशांत मोडक, प्रशांत भाडळे, आकाश बहुले, राहुल चोरघडे, प्रजित हरपळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणुक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणुक करण्यावर आपला भर असेल असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ घट झाल्याचं आपण पाहतो. ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला अधिकाधिक मतदान करुन आपल्या हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आजच्या दौऱ्यादरम्यान, नागरीकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नागरीकांच्या अडचणी समजून घेवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महावितरणच्या उत्कृष्ट ५६ जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव
वीजग्राहकांचे तत्पर समाधान हीच सेवेची खरी पावती – मुख्य अभियंता राजेंद्र पवार
पुणे, दि. ०२ मे २०२४: ‘सुरळीत वीजपुरवठा व विविध ग्राहक सेवेचे कर्तव्य चोखपणे बजावताना वीजग्राहकांचे तत्पर समाधान करणे हीच खरी महावितरणच्या सेवेची पावती आहे. वीजक्षेत्रात काल केलेल्या कामगिरीवर आज तगू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी कायम सजग व सज्ज राहावे’ असे आवाहन असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. १) केले.
महावितरणच्या पुणे परिमंडलातील सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या उत्कृष्ट १२ यंत्रचालक व ४४ तांत्रिक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री युवराज जरग, संजीव राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्थापत्य विभागातील तीन उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
पुणे परिमंडलातील विभागनिहाय उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे– रोहिदास मेमाने, प्रवीण जगताप, श्रीनिवास दुधभाते, नागेश बाबर (बंडगार्डन विभाग), बाळकृष्ण चव्हाण, दीपक सैंदाणे, गोरखनाथ खोचे, नंदकिशोर गायकवाड (नगररोड विभाग), भगवान अहिरे, रत्नाकर पांचाळ, दिगंबर गजेले, मधु हरी पवार (पदमावती विभाग), सुरेश सोनवणे, दीपक गायकवाड, साधना कोवे, प्रमोद भाकरे, (पर्वती विभाग), विवेक पाटील, विलास हिरवे, अमोल कोकरे, लक्ष्मण गायकवाड, भाग्यश्री मडावी (रास्तापेठ विभाग), अतुल ढवळे, संभाजी थोरवे, खलील तांबोळी, प्रशांत बनसोड, नीलेश आरुडे, गंगाराम विरणक (मंचर विभाग), गणेश भोईटे, नामदेव मोरे, प्रवीण कापडे, मुस्तफा शेख, किशोर वाळूंजकर (मुळशी विभाग), योगेश पावडे, गणेश कदम, अनिल पाटील, पंकज येवले, काशिनाथ सरोगदे, पंढरीनाथ सवाणे, चंद्रभान ढवळे (राजगुरूनगर विभाग), हणमंत शिंदे, अजित मस्के, विठ्ठल गणगे, विलास चव्हाण (भोसरी विभाग), भगवान मोरे, दीपक शेंडगे, श्रावण कांबळे, सुग्रीव ढेकणे (कोथरूड विभाग), अजय सोनवणे, वेंकटरायप्पा देवराजू, आवेज मुजावर, सुरेश कुऱ्हाडे (पिंपरी विभाग), निवृत्ती लोहार, सुनील कुमेरिया, सचिन वराडे, रूपाली कांबळे, दीपक रसाळ (शिवाजीनगर विभाग) आणि शैलेंद्र भालेराव, सुजित विभुते, हरिश्चंद्र गुंजाळ (स्थापत्य)
हिटलरशाही असती तर मोदी मते मागायला आले असते का – रामदास आठवले
सर्वसामान्यांना सामाजिक न्यायांबरोबरच आर्थिक न्याय देण्यासाठी मोदी प्रयत्नशील – आठवले
संविधान बदलणार हा विरोधकांचा विषारी अपप्रचार – रामदास आठवले
ज्याच्या नशिबात नाही हारणे, त्याचं नाव आहे श्रीरंग बारणे
पिंपरी, 2 मे – डोळ्यासमोर पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांकडून गचाळ व विषारी प्रचार करण्यात येत आहे. संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, असा विषारी अपप्रचार ते करीत आहेत. हिटलरशाही असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागायला आले असते का, असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर होते. आपल्या खास शैलीत काव्यरचना सादर करीत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, अजीज शेख, सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे, युवा सेनेचे नेते विश्वजीत बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सुजाता पालांडे, आरपीआयच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कमल कांबळे तसेच सुनील कांबळे, राजेंद्र कांबळे, सम्राट जकाते, सुजित कांबळे, दयानंद वाघमारे, मदन नाईक, अनुराग भागवत, मोहन म्हस्के, अनिल सरवदे, ख्वाजाभाई शेख, शादाब पठाण, सिकंदर सूर्यवंशी, विनोद चांदमारे, अनुराधा गोरखे, राजेश पिल्ले, सुरेश निकाळजे, राजेंद्र तरस, अण्णा वायदंडे, शीतल शिंदे फजल शेख, नारायण बहिरवाडे, संदीप वाघेरे, बाळासाहेब ओव्हाळ, स्वप्नील कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते.

विरोधकांवर हल्लाबोल
रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान व डॉ. आंबेडकर यांचा नीतांत आदर करतात. त्यामुळे राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसा प्रयत्न कोणी केला तर आम्ही तो हाणून पाडू. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे हजारो तरुण बलिदानासाठी तयार आहेत. समाजात गैरसमज पसरवण्या व्यतिरिक्त विरोधकांकडे काहीही नाही. नरेंद्र मोदी हे खमके नेते आहेत आणि त्यांच्याबरोबर माझ्यासारखा पठ्ठ्या आहे. त्यामुळे विरोधकांचे बारा वाजणार आहेत. महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण तसेच आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देखील दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मोदींना हटवणे सोपे नाही.
सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्यायही
सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीचा विचार करून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. सामाजिक न्यायाबरोबरच आर्थिक न्यायही देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. मोदी हे गरीब ओबीसी कुटुंबातील आहेत. मोदी हे हिंदू असले तरी सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत, असे आठवले यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या विविध योजना पण लोकहिताच्या निर्णयांची यावेळी त्यांनी माहिती दिली.
आठवले यांची काव्यमैफल
आपल्या भाषणात यमक जुळवून कविता सादर करण्याच्या खास शैलीसाठी रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. या सभेतही त्यांनी अशाच शिघ्र कविता सादर करीत टाळ्या मिळवल्या. ‘ज्याच्या नशिबात नाही हारणे, त्याचं नाव आहे श्रीरंग बारणे’, ‘नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी आहेत अनेक कारणे, मग का निवडून येणार नाहीत बारणे?’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत चमकणारा तारा, काँग्रेस आणि इंडी आघाडीचे वाजणार बारा’, ‘श्रीरंग आप्पा माणूस आहे साधा भोळा, म्हणून विरोधकांच्या पोटात उठतोय गोळा’, ‘घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे आण, निवडून द्या श्रीरंग आप्पांचे धनुष्यबाण’ अशा रचना सादर करीत आठवले यांनी टाळ्या मिळवल्या.
खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांच्या आढावा सादर केला. मेट्रो, अमृत भारत रेल्वे स्टेशन, पासपोर्ट कार्यालय, अटल सेतू, मिसिंग लिंक, जेएनपीटीसाठी आठ पदरी रस्ता अशा विविध विकास प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली.
आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे तसेच शंकर जगताप, चंद्रकांता सोनकांबळे, सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब भागवत, कुणाल वाव्हळकर, संदीप वाघेरे, अजित शेख, सदाशिव खाडे, अमित गोरखे, कमल कांबळे, प्रदीपकुमार बेंद्रे आदींची यावेळी भाषणे झाली. विनोद चांदमारे यांनी सूत्रसंचालन केले.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकमधील डुबेरे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नाशिकमधील डुबेरे या जन्म स्थानी “बर्वे वाड्यात” त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुतळ्याचे अनावरण लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर व चितळे बंधू मिठाईवालेचे श्रीकृष्ण चितळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, नारायणशेठ वाजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था, डुबेरे, नवाब शादाब अली, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उमेश देशमुख, चंद्रशेखर बर्वे, निखिल बर्वे, सुहास बर्वे, समस्त बर्वे परिवार यावेळी उपस्थित होते.
मोहन शेटे म्हणाले, बाजीराव पेशवे यांनी वीस वर्षाच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या. पालखेडची लढाई जगातील मोठ्या लढायांमध्ये महत्वपूर्ण मनाली जाते. त्या लढाईचे उचित स्मारक आगामी वर्षात प्रतिष्ठान तर्फे उभारण्यात येईल. असेही शेटे यांनी सांगितले.
भूषण गोखले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा वारसा पुढे नेण्याचे काम बाजीराव पेशवे यांनी केले.
कुंदनकुमार साठे म्हणाले, थोरले बाजीराव पेशवे म्हणजे तेजस्वी सूर्य होते. त्यांचा खरा इतिहास सगळ्यांना माहित असायला हवा. पुढच्या वर्षी पर्यंंत बाजीराव पेशवे यांचे तैलचित्र महाराष्ट्र विधान भवन येथे लावणारच असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
चंद्रशेखर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. निखिल बर्वे यांनी आभार मानले.

खडकीकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून आता दुहेरी वाहतूक
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांना यश : पुणे शहर वाहतूक शाखेने काढले आदेश
पुणे : जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खडकीकडे जाणारा रस्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आता दुहेरी वाहतूक सुरू होणार आहे. मागील तीन वर्षापासून सुरू असलेले मेट्रोचे काम तसेच रस्ता रुंदीकरणामुळे हा मार्ग एकेरी करावा लागला होता. यामुळे खडकी मुख्य बाजार येथे अडचण निर्माण होत होती. ती अडचण आता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नातून दूर झाली आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मधल्या काळामध्ये नागरिकांशी बोलून, स्थानिक वाहतूक पोलीस यांना विश्वासात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दुचाकी आणि तीनचाकी यांच्यासाठी शिरोळे यांनी दुहेरी करून घेतला होता. तरीही खडकीच्या मुख्य बाजार परिसरात खूप मोठी अडचण सर्वच नागरिकांना आणि तेथील व्यापाऱ्यांना सहन करावी लागत होती.
मात्र, आता चर्च चौक ते बोपोडी चौक आणि बोपोडी चौक ते खडकी बाजार मार्ग हा होळकर पुलापर्यंत एल्फिस्टन रस्त्यावर आता दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे. तसेच, चर्च चौक ते आयुध चौक दरम्यान जनरल थोरात मार्गावर दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येत आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण कामाची गती देखील वाढविण्यास प्रयत्न केले जात आहेत. आता वरील मार्ग वाहतुकीस दुहेरी खुले झाल्याने खडकी बाजारातली व्यापारी, नागरिक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.
ते पुढे म्हणाले, मेट्रोचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे आणि आता लवकरच जय हिंद टॉकीजविषयी न्यायालयाने मार्ग सुकर केल्याने रस्ता लवकरच पूर्ण होईल. स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून विकास कामांना यश मिळत आहे. मागील ५ वर्षात खडकी भागात ५ कोटी रुपये आणि बोपोडी भागात ६ कोटी रुपये विकासकामांसाठी मंजूर करून घेतले असून त्यानुसार अनेक कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस
उद्योजक पुनीत बालन यांच्याहस्ते चावी प्रदान
पुणे – ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने शिखर शिंगणापूर (ता. माण, जि. सातारा) येथील वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत श्री ज्ञानमंदिर शाळेला स्कूल बस देण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते स्कूल बसची चावी संस्थेकडे देण्यात आली.
‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे राज्यभरच नाही तर देशभरात विविध क्षेत्रात मोठे सामाजिक कार्य आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा झेंडा अगदी काश्मीरपर्यंत डौलाने फडकत आहे. यामध्ये शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रिडा, सामाजिक कार्याचा समावेश आहे. पोलिस विभाग आणि लष्करासोबतही त्यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचे कर्तव्य निभावले आहे. त्याचाच भाग म्हणून शिखर शिंगणापूर येथेही वेद विज्ञान महाविद्यापीठ संचलीत सुरु असलेल्या श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून ४१ आसन क्षमता असलेली स्कूल बस देण्यात आली. दुष्काळी भाग असलेल्या शिखर शिंगणापूर परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना या स्कूल बसचा उपयोग होईल आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे अपेक्स मेंबर राजय शास्तारे, आदित्य जोशी, अमोल येवले आणि महेश सोनी यांच्यासह संस्थेचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
‘‘समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे सर्वांत मोठे साधन आहे. दुष्काळी आणि ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना केवळ प्रवासाच्या सुविधेअभावी या शिक्षणापासून वंचित रहावं लागू नये, या भावनेतून श्री ज्ञानमंदिर शाळेसाठी ही स्कूल बस देण्यात आली. या शैक्षणिक कार्यास हातभार लावता आला, याचं मनापासून समाधान आहे.’’
पुनीत बालन
(अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन)
निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी
पुणे: पुणे लोकसभेसाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी पुणे कँटोंमेन्ट विधानसभा मतदारसंघातील एकाच ठिकाणी पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या १४ ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली.यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, समन्वयक अधिकारी निवेदिता देशमुख तसेच सर्व केंद्राचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
एकाच इमारतीत पाच केंद्र असल्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या प्रवेशाचे व निर्गमनाचे योग्य नियोजन करावे, मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी स्त्री व पुरुष मतदारांसाठी वेगवेगळ्या रांगा असाव्यात, मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केंद्राची सर्व प्रवेशद्वार खुले ठेवावेत, मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा पुरवाव्यात, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, रॅम्पची सोय करावी, पिण्याचे पाणी, मंडप व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी श्री. लोलयेकर यांनी केल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात ७० ठिकाणी २७४ केंद्र असल्याचे सांगून सर्व ठिकाणच्या अधिकाऱ्यांना वाहतूक व्यवस्थापन तसेच सुविधा केंद्राविषयी योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्ष स्थापन
पुणे, दि. २: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना माहितीसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. जुन्नर विधानसभा मतदारसंघात स्वप्नील दप्तरे ८६६८९८७०५९, सचिन देशपांडे ८७९६७ ०९८४८, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रियांका हुले ९३७३७६६४८३, शुभम गाडेकर ७९७२२१०१६६, खेड आळंदी मतदारसंघात मयूर तनपुरे ८३०८२१२९९०, दत्तात्रय गारगोटे ९०७५३०५६२०, शिरूर विधानसभा मतदारसंघात सदाशिव सावंत ७०२०८७५५४५, जिजा अहिर ९९२१६७२११९, ज्ञानेश्वर अजबे ९११९५४१२६३, महेश आढाव ९३७२१३५१५१,आकाश डोईफोडे ९९७५५६८१८१, प्रणव पारगे ८६०५१४०१२३, हडपसर विधानसभा मतदारसंघात सपना रहाटे ७७४१९०७३५६, राजश्री जाधव ८६०५५८२२६५, भोसरी विधानसभा मतदारसंघात वैभव बर्डे ८४४६५१६८६४, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघात बालाजी सरवदे ९४२१४२३२९५, सखाराम लवाटे ९६६५९५३२०० (रात्री ८ ते सकाळी ६), रेश्मा जाधव ८०८०९४९६९८, सुशीला झगडे ७७०९३९६८१५ ( सकाळी ६ ते दुपारी १), शोभा भोसले ८८०५४६५८१८, रेणुका नांदळे ७७०९२७०३८८ ( दुपारी १ ते रात्री ८), इंदापूर विधानसभा मतदारसंघात इम्रान जमादार ९८९०१७६१५६, अशोक चोरमले ९४०४७३४२६४, बारामती विधानसभा मतदारसंघात सचिन निकम ८६६८२७८७१८, अभिजीत स्वामी ९७६५९०१०२०, पुरंदर विधानसभा मतदारसंघात ओंकार कदम ७७५८८३३३७८,आलोक भगवान ७४४८१४९१४४, भोर विधानसभा मतदारसंघात प्रमोद खोपडे ९०९६३५३१०३, शितल सणस (वेल्हा) ९३०७०८३०८२, अनुज नवले (मुळशी) ८३९०१०५११३, खडकवासला विधानसभा मतदारसंघात वैभव मोटे ८०५५४४५१९१ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात विशाल ओहळ ७३८७९९८२३२, सुमित दळवी ९२८४९६२०४०, चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनिल कुदळे ९९२२५३५२३४, अमर कांबळे ९५२७५१४८०५, पिंपरी विधानसभा मतदारसंघात रोहित परदेशी ७७०९५१०७२३, अक्षय गडदे ९१३०५३०६७३ हे मतदार कक्षात मतदारांना माहिती देतील.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात रवी जाधव ७४४७७२१२१२, प्रतीक चव्हाण ९१७०७८०७०७, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात गोकुळ गायकवाड ९६२३८९३८३९, पकिता पवार ९९२१८८१२३४, कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुधीर सणस ८९९९३७०६८०, पर्वती विधानसभा मतदारसंघात ओंकार माने ९३५९९२९५४५, ऋषी जाधव ७८८७९०४६००, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात टी.एस. पांगारे, अमोल बनकर व बाळासाहेब चव्हाण ८७९२१८६६८४ तर कसबा विधानसभा मतदारसंघात वैभव जंगम यांच्याशी ८८८८३६५३६० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
आजवर ताईंना दिली आता लोक वहिनींना संधी देतील -दीपक मानकर
पुण्याच्या कॉंग्रेस भवनाचा बदललेला चेहरा कॉंग्रेसचे परंपरागत मतदार देखील स्वीकारणार नाहीत .
अजितदादांच्या नेतृत्वाचाच विजय निश्चित होईल
पुणे- बारामती लोकसभा मतदार संघात ७ तारखेला मतदान आहे , या निवडणुकीत या मतदार संघाकडे देशाचे लक्ष लागून आहे, येथे चुरशीची निवडणूक होईल असे मानले जात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी ,आजवर लोकांनी ताईंना संधी दिलेली आहे आता लोक वहिनींना संधी देतील असे विधान केलेआहे. लोकांना पवारांच्या घरगुती मतभेदाच्या संदर्भात काही रस निश्चित नाही मात्र एकाच घरातील, कुटुंबातील लोकांच्यात मतदार भेदभाव देखील करणार नाहीत. सुप्रीया ताईंना या मतदार संघाने पवारांचा बालेकिल्ला म्हणूनच नेतृत्वाची संधी दिलेली होती संसदेत त्यांनी चांगली भाषणे केली याचे कौतुक मतदारांना निश्चित असेल देखील. पण आता परिस्थिती बदलली आहे आणि काही समस्या मात्र तशाच आहेत या मतदार संघात पिण्याच्या पाण्याची समस्या काही ठिकाणी आहे, तसेच इथले लोक रोजगारासाठी बाहेरगावी जातात. नवले ब्रिज चा अपघाती ब्रिज म्हणून सारखा उल्लेख होतो आणि खडकवासल्यात धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी ओरड हि होत असते.रिंग रोड च्या भू संपादनाचा विषय असेल पुरंदरच्या विमानतळाचा विषय असेल असे अनेक विषय अजूनही व्यवस्थित हाताळण्याची गरज आहे .सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आता सुनेत्रावाहिनी यांच्याकडे मतदार या मतदारसंघाचे नेतृत्व देतील असे स्पष्ट दिसून येऊ लागल्याचे मानकर यांचे म्हणणे आहे. अजितदादांच्या साथीने वहिनी हे सारे प्रश्न आपल्या पहिल्याच टर्म मध्ये लीलया सोडवू शकतील असाही विश्वास त्यांना वाटतो आहे. जो मतदारांमध्ये आपल्याला दिसून आला असे ते म्हणालेत.
पुण्याच्या कॉंग्रेस भवनाचा बदललेला चेहरा कॉंग्रेसचे परंपरागत मतदार देखील स्वीकारणार नाहीत .
महाराष्टातीलच नव्हे तर पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील अजितदादांच्या नेतृत्वाचाच विजय निश्चित होईल असे सांगून पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाबत बोलताना दीपक मानकर म्हणाले ,भाजपचे मुरलीधर मोहोळ येथील निवडणूक सहज सरळ जिंकतील असा आपल्याला विश्वास आहे.भाजपचा प्रमुख विरोधक कॉंग्रेसची अवस्था खूपच कठीण होऊन बसली आहे. ज्या कॉंग्रेसने स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहिला त्या कॉंग्रेसच्या नशिबी अशी अवस्था येणे दुर्दैवी आहे,पण ती आणली कोणी याचा विचार याही निवडणुकीत पुन्हा स्पष्ट होईलच.कॉंग्रेसकडे परंपरागत मतदार होता आणि आहे यात दुमत नाही पण दिवसेंदिवस तो आता कमी कमी होता चालला आहे . याचे आत्मपरीक्षण कोणी करत नाही. कॉंग्रेसला भाजपने संपविले नसून कॉंग्रेसला कॉंग्रेस मध्येच असणाऱ्या नेत्यांनी संपविले आहे असे माझे मत आहे.आज बदललेला कॉंग्रेस भवनाचा चेहरा पहा तो कोणताही सज्जन चांगला माणूस मग तो पुरुष असो कि स्त्री असो त्यास भावणार नाही .कॉंग्रेस चा जुना कार्यकर्ताही आता कॉंग्रेस भवन ला जायला नको म्हणतो, सगळीकडे नुसती ठेकेदारांची बजबजपुरीच दिसून येते आहे. एका मराठा आयएएस अधिकाऱ्याला कानफटात लगावणे , चप्पल फेकून मारणे असे प्रकार ठेकेदारांनी याच कॉंग्रेसच्या सहाय्याने येथे केलेत हे मराठा समाज देखील विसरणार नाही. पवार साहेबांनी येथे नेतृत्व सोपविलेल्या तथाकथित नेत्याचे जे आज गुणगान गाताहेत त्याने नेमके राजकारण कसे नासविले ते गाडगीळ आणि टिळकच जाणून नाहीत तर उभ्या देशाला संबधित नेत्याचे कर्तुत्व ठाऊक आहे त्याच्यानंतर तर सामुहिक नेतृत्वाने आणखीच बजबजपुरी करून ठेवली . त्यांच्यात जणू रेसच लागली आणि या रेस मध्ये ते सामान्य जनतेपासून दूरवर गेले .आणि म्हणून भाजपचा पर्याय लोकांनी स्वीकारला. अजूनही कॉंग्रेसमध्ये निष्ठेला, प्रामाणिकपणाला योग्य सन्मान नाहीआणि किंमत नाहीच.’ XXX मेहरबान तो ××× पहिलवान ‘अशा अवस्थेत येथे निवडणुका होत आहेत .
…तुम्ही कफन चोर आहात…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई दिनांक १ मे २०२४
कोरोना काळात विकसित राष्ट्रांचा लस घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तो दबाव मोदींनी झुगारून दिला. पूर्वी तीस वर्षे भारताला लस मिळत नव्हती. जगात तीन ते चार देश लस तयार करू शकले त्यात भारत आहे. मोदींच्या नेतृत्वात ती तयार झाली. उद्धवजी ‘तुमको मिरची लगी तो मै क्या करू..’ त्या काळात तुम्ही खिचडी, कफन चोरी करत होता. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही..लोक मरत असताना उपाशी असताना घोटाळे करत होता. बॉडी बॅगचा घोटाळे करणारे तुम्ही कफन चोर आहात अश्या शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले.
मुंबई भाजपच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आज ते बोलत होते. दादर येथील कामगार मैदानावर भव्य मेळावा पार पडला.
यावेळी महायुतीचे उत्तर मुंबईचे लोकसभा उमेदवार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उत्तर-मध्य मुंबईचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा, विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपा खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्याने मोठा इतिहास घडवला आहे. संपूर्ण देश पारतंत्र्यात असताना महाराष्ट्राच्या मराठी मातीतून एक हुंकार निर्माण झाला आणि आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. हिंदू पादशाही निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पुढच्या अनेक पिढ्यांच्या रक्तामध्ये स्वातंत्र्याचे बीजारोपण त्यांनी केले. महाराष्ट्राने शौर्य दिले. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही. खऱ्या अर्थाने क्रांतीची ज्योत पेटवण्याचे काम या भूमीमध्ये झाले. महाराष्ट्र तयार होत असताना काँग्रेसकडून अनेक लोकांना हुतात्मा करण्यात आले. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल त्यावेळी माझं शिवसेना नावाचे दुकान मी बंद करून टाकीन आणि परवा त्यांच्या सुपुत्राची प्रेस कॉन्फरन्स मी पाहत होतो. ते हसत सांगत होते. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार काँग्रेसच्या वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे. तुझ्या पंजाचे बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करेल. काय वाटलं असेल वंदनीय बाळासाहेब यांच्या आत्म्याला… खुर्ची करता हा ऱ्हास आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांशी पूर्णपणे प्रतारणा करायची. बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत. विचारांना जिवंत ठेवण्याचे, हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने केले आहे. भारताचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राने प्रगती केली. देशाच्या जीडीपीतील १५ टक्के जीडीपी महाराष्ट्रात तयार होतो. देशातील वस्तू उत्पादनामध्ये २० टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. निर्यातीमध्ये २२ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. सर्वात जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. या देशाला चालवण्याचे काम आर्थिक राजधानी म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई करत आहे. महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला चालले या चुकीच्या गोष्टी सांगतात. महाराष्ट्रची ताकद उद्धव ठाकरे यांच्या चेला चपाट्यांना माहित नाही. महाराष्ट्राची क्षमता त्यांना माहित नाही म्हणून ते महाराष्ट्राचा अपमान करतात. ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार आले. त्याला मोदीजींचा आशीर्वाद होता. २०१५ ते २०१९ पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केले. त्याच्या आधी देशात, राज्यातही काँग्रेसचे सरकार होते. गुंतवणूकीत महाराष्ट्र चौथ्या आणि पाचव्या, सातव्या क्रमांकावर होता. तो पहिल्या क्रमांकावर आणला. दोन वर्षात देशात आलेल्या गुंतवणुकी पैकी ४२ टक्के आणि ४९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली. आमचं सरकार गेल्यानंतर आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि पवार साहेबांसोबत तुम्ही सरकार केले. तुम्हाला खुर्ची बोलवत होती. तुम्हाला त्याठिकाणी तत्व, मूल्य, नव्हती. तुमचे केवळ एकच स्वप्न होते त्या खुर्चीवर मी कसा बसतो हेच.. त्या खुर्चीवर बसण्याकरता तुम्ही विचारांना तिलांजली दिली. पहिल्या क्रमांकवर असणारा महाराष्ट्र तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आला. गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र मागे गेला. त्याच्या पुढच्या वर्षी गुजरात पहिला क्रमांकावर आला आणि पुन्हा महाराष्ट्र मागे केला. तुम्ही महाराष्ट्रा बद्दल बोलता तर तुमच्या मनगटात धमक का नव्हती की, ज्या महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणले होते तो, तुमच्या राज्यामध्ये मागे गेला. तोंडाच्या वाफा काढून राज्य पुढे जात नसते. त्या ठिकाणी मनगटात जोर असावा लागतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यावर महाराष्ट्राला पुढे आणून पहिल्याच वर्षी महाराष्ट्र नंबर वनवर आणला. यावर्षी पुन्हा महाराष्ट्र नंबरवन आला आहे. गुजरात, कर्नाटक, दिल्ली एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. रडायचं नाही तर लढायच , लढणार आहोत लढत लढत पुढे जाऊ…. तुम्ही अडीच तीन वर्षे त्या ठिकाणी होतात तर आमची गुंतवणूक चालली म्हणून रडत राहिलात. ज्या राज्यांमध्ये सत्तारूढ पक्ष षडयंत्र करतो आणि जो सगळ्यात मोठा गुंतवणूकदार आहे त्यांच्या घरासमोर तुमचे पोलीस षड्यंत्र करून बॉम्ब ठेवतात. कोण तुमच्या राज्यात येईल. ज्या राज्यामध्ये शंभर कोटी रुपयांचे वसुलीचे रॅकेट चालते त्या राज्यांमध्ये कोण येणार आहे. ज्या राज्याचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जातात आणि फेसबुक लाईव्ह करतात आणि कोमट पाणी प्या म्हणतात त्या राज्यामध्ये कोण जाईल. तुमचे नेते माझं कुटुंब माझी जबाबदारी इतर सगळ्यांचे कुटुंब मोदींची जबाबदारी अशी तुमची निती होती. २५ वर्षे मुंबई महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली. आम्ही सोबत होतो पण राज्य तुमचे होते. वीस वर्षांमध्ये या मुंबईला तुम्ही काय दिले. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काय बदल केला? जो मराठी माणूस गिरणी कामगार दक्षिण मुंबईत राहत होता त्याला हद्दपार करण्याचे काम तुम्ही केले. ७० हजार कोटी बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले पण त्या मराठी माणसाला घर देण्याकरता तुम्हाला निर्णय घेता आला नाही. बंगलोर, हैदराबाद आयटी कॅपिटल झाले कारण राज्यातील काँग्रेस सरकार आणि त्यांना भ्रष्टाचार करायचा होता. मालपाणी मिळणारे काम त्यांना हातात घ्यायचे होते. त्यामुळे मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले नाही. आयटी उद्योग परवडत नसल्यामुळे उद्योग मुंबई बाहेर गेले. पंतप्रधान मोदीजींचे सरकार आल्यानंतर स्टार्टअप पॉलिसी आणली. आता स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र आहे. देशातील सर्वात जास्त रजिस्टर स्टार्टअप २० टक्के देशाचे स्टार्टअप एकट्या महाराष्ट्राच्या आहेत. देशाचे युनिकॉर्न २५ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. कारण आम्ही रडलो नाही लढलो. कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, लोकल ट्रेन, मेट्रो, एसटीपी प्रकल्प यामध्ये तुमचा काय वाटा आहे. तुम्ही कुठून कुठून वाटा घेतला त्याबद्दल मी बोलत नाही. याचं उत्तर हे देवू शकत नाहीत. उत्तर देता आले नाही की, मावळे कावळे हे यांचे ठरले आहे त्याच्यापलीकडे जात नाहीत. आता हे अध्यक्ष आहेत की, गल्लीचे नेते आहेत अशी भाषा त्यांची झाली आहे. याद राखा इटका जवाब पत्थर से देना हम जानते है… संयम ठेवला आहे कारण आम्ही परिपक्व आहोत. ज्या दिवशी आपल्यावर येऊ त्या दिवशी काय ताकद आहे ते दाखवून देवू. मुंबई मोदींवर प्रेम करते. हे प्रकल्प मोदी नसते तर होऊ शकले नसते. झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प झाले नसते. या निवडणुकीच्या निमित्ताने विकसित भारत तयार करत आहोत. मुंबईत काँक्रीटचे रस्ते तयार झाले असून पन्नास वर्ष त्याकडे पाहण्याची गरज नाही. खड्डामुक्त मुंबई झाली आहे. मुंबईला कोणाचाही बाप महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. हे लबाड लांडगे निवडणूक आली की, कोल्हेकुई सुरू करतात. यांची डायलॉग बाजी त्यांचेच लोक ऐकत नाहीत. मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना संधी दिली आणि लस तयार करून घेतली ती लस मिळाली म्हणून आज १४० कोटी भारतीय जिवंत आहेत. तर यांना मिरची…. यांना लस म्हणजे लसूण वाटते. तुमच्या घोटाळ्यांची मालिका आम्ही काढणार आहोत. अभी तो शुरुवात हुई है आगे आगे देखिये होता है क्या.. आज या देशाला कणखर नेतृत्व हवे आहे. देशात गुंतवणुकीची संधी आहे. भारताकडे जग आकृष्ट होत आहे. भारतामध्ये महाराष्ट्र राज्य इन्वेस्टर फ्रेंडली आहे. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताची इकॉनोमी फाईव्ह ट्रिलियन होईल. महाराष्ट्र वन ट्रिलियनची इकॉनॉमी आम्ही सोबत करू. एमएमआरचे रिजन वन ट्रिलियन करण्याची क्षमता आहे. डेटा सेंटर कॅपिटल तयार होत आहे. मुंबई महायुतीच्या पाठीशी उभी आहे. फेक नरेटिव्ह पराभूत होईल. मुंबईतील महायुतीचे सहा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्य गीताच्या गायनाचे कार्यक्रम शक्ती केंद्रावर केले. १ हजार ७७ ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले. जय महाराष्ट्र म्हणून राजकारण करणारे मुंबईच्या कुठल्या चौकात किंवा गल्लीबोळात दिसले नाहीत. निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपा किंवा महायुतीकडून खालच्या स्तरावर प्रचार केला जात नाही. या निवडणुकीमध्ये काही गोष्टी आम्हाला नव्याने कळत आहेत. काही नेते बहुरूपी म्हणून सापडत आहेत. काही लोकांचे अर्ध्या तासात रंग बदलू लागले आहेत. पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्यता न तपासता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातील नंबर एकचे बहुरूपी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांची विधाने पाहिले असता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घालवले. प्राण गेला तरी महाराष्ट्र हुकूमशाहीच्या हाती जाऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले. दुसरे बहुरूपी पत्रकार पोपटलाल म्हणत आहेत की, महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी काही आत्मे महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहे. माझा पक्ष आणि काँग्रेस सर्व मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला असेही म्हणत आहेत. आपल्यावर आरोप करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची बहुरूपी गॅंग काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, कम्युनिस्ट यांच्याबरोबर आहेत. रोज नौटंकी चालू आहे. लढा संयुक्त महाराष्ट्राचा या पुस्तकात काँग्रेसच्या मुरारजी देसाई यांनी केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी या मुंबईमध्ये जर दोन मिनिटाला एक गोळी दिवसाला २७०० च्या वरती गोळ्या, नव अर्भक, नव विवाहिता, कामगारांचा मृत्यू, घरात जेवण करत बसलेल्या मृत्यू झाला. हे बलिदान आणि मृत्यू १०५ हुतात्म्यांचा खून काँग्रेसने केला. नराधन काँग्रेसने राज्यातील मराठी माणसाचा खून केला. उद्धवजी त्या काँग्रेसबरोबर तुम्ही हातमिळवणी केली. ज्या काँग्रेसच्या हाताला मराठी माणसाचा खून करून काँग्रेसच्या हाताला रक्त लागले त्याच्याशी हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. माझा बहुरुपी उद्धवजींना प्रश्न आहे की, मातोश्रीमध्ये जाऊन आरशात बघाल तर तुमच्या हाताला मराठी माणसाच्या खुनाचे रक्त लागलेले दिसेल. मुंबईकर जनता चिडलेली आहे. मराठी माणूस दुःखी आहे. मुंबईवर आणि महाराष्ट्र प्रेम करणारा मराठी माणूस त्रागा व्यक्त करत आहे. मतासाठी तुम्ही रंग बदलले, बहुरूपी झालात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे. तुम्हाला जय महाराष्ट्र करताना आत्मपरीक्षणाची विनंती करतो. तुमच्या हाताला लागलेल्या रक्तातून मुक्तता मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची विनंती करतो असेही
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
आढळरावांना पराभव दिसला म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा – डॉ. अमोल कोल्हे
शिरुर – शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा माहोल चांगलाच तापला आहे. कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनकडून नोटीसा दिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत प्रचाराची दिशा बिघडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आढळरावांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहण्यापासून नोटीस देऊन परावृत्त करण्यात आले आहे. यावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना चांगलेच सुनावले आहे.
विरोधी उमेदवार खासदार असताना त्यांनी जे शिरुर तालुक्यातील करंदी गाव दत्तक घेतले होते, त्याच गावातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा त्या गावात येत असताना विरोधी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये म्हणून नोटीस दिल्या जातात. मी देखील करंदी गावात प्रचारदरम्यान गेलो होतो एका कार्यकर्त्याने मला प्रश्न विचारला होता त्याच्या प्रश्नाचे उत्तर आणि त्याच्या शंकांचे निरसन होईल अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने मी त्याचे समाधान केले होते. परंतु विरोधी उमेदवाराला कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली. जे करंदी गाव आपण दत्तक घेतले त्याच दत्तक गावातील लोकांना अशा प्रकारे दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. हे स्पष्ट दिसून येत आहे. असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान करंदी (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच बबन उर्फ बबलू ढोकले, जावेद इनामदार, योगेश ढोकले, सागर झेंडे यांना पोलसांनी नोटीस करंदीत होणाऱ्या आढळराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहू नये म्हणून परावृत्त केले. परंतु यावर वरील नोटीस मिळालेल्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही कोणतेही प्रश्न आढळराव यांना विचारणार नव्हतो किंवा ते आमच्या गावात येणार आहेत याची कोणतीही कल्पना नव्हती. याशिवाय अशा दडपशाहीच्या प्रकारामुळे आढळराव पाटील यांचा पराभव ठरलेला आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी जागवला शौर्याचा इतिहास; महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण
नागपूर, दि.1 : स्वराज्याच्या निर्मितीत प्राणांची आहुती देणारे शुरवीर, महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा आणि देशभक्तीपर गितांवर उत्तम नृत्याविस्कारातून शालेय विद्यार्थ्यांनी गौरवशाली शौर्याचा इतिहास जागविला, औचित्य ठरले महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापनदिनाचे.
येथील वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार, उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड, विज्ञान पर्यवेक्षक जयेश वाकुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हजारो सैनिकांचा ताफ्यासहित स्वराज्यावर पुन्हा चाल करुन आलेला आदिलशाहीचा सरदार बहलोल खान आणि त्याचा निकराने सामना करणारे प्रतापराव गुजर हा प्रसंग कथन करुन नेसरीच्या ऐतिहासिक लढाईत वीर मरण आलेल्या प्रतापराव गुजरांसहीत आणखी सहा वीरांच्या शौर्यांवर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या गितावरील दक्षिण अंबाझरी येथील मुंडले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांनी सादर केलेला नृत्याविस्कार उपस्थितांच्या दाद मिळवून गेला. यासोबतच कोंडाळी येथील लखोटिया भुतळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हे कण कण मे जाना’, शिशु ज्ञानमंदीर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘मै इतिहास का आयना हु’, नयापुरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘तेरी मिट्टी मे मिल जावा’, सेंट पॉल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘लल्लाटी भंडार’, सुदर्शन हायस्कूल इतवारीच्या विद्यार्थ्यांनी ‘माय भवानी’ अशा उत्तमोत्त्म नृत्याविस्काराचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या एकूण अकरा शाळांच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले.
पहिल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक जांबोरी आयोजनात नागपूर जिल्हा पथकाचे नैतृत्व करणारे सावनेर तालुक्यातील टाकडी येथील भन्साळी बुनियादी विद्यामंदीराचे स्काऊट मास्टर प्रितम टेकाडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन एस.सी.एस. गर्ल्स ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. शालिनी तेलरांधे यांनी केले तर उपशिक्षणाधिकारी सुशील बनसोड यांनी आभार मानले.
