Home Blog Page 1067

भाजपा व आरएसएस आरक्षण विरोधी, मोदींची पुन्हा सत्ता आली तर संविधान व आरक्षणही संपवणार.

लातूर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगेंच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीची जाहीर सभा.

लातूर/मुंबई, दि. १ मे २०२४
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला. भाजपाने जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून सामाजिक शांतता बिघडवण्याचे पाप केले. लोकसभेची ही निवडणुक देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची केंद्रात सत्ता आणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. या सभेला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनायकराव पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, एन आर पाटील, चंद्रकांत मद्दे, रामभाऊ बेल्लाळे, सिराज जहागीरदार, विलास पाटील, निळकंठ मिरकले, ज्योतीताई पवार, निलेश देशमुख, भाग्यश्री क्षिरसागर, सांब महाजन, कलीम अहमद, अनिल शेळके, शंकर गुट्टे, सोमेश्वर कदम, आर. डी शेळके, संजय पवार, विकास महाजन, श्रीकांत बनसोडे, हेमंत माकणे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपा सरकारवर टीका करत नाना पटोले म्हणाले की, भाजपने मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले पण त्यांनी आरक्षण दिले नाहीच उलट राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला. भारतीय जनता पक्ष व आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत. नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता आली तर ते संविधान बदलणार व संविधानाने दिलेले आरक्षणही संपवणार. भाजपने २०१४ साली खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली, २०१९ मध्ये पुलवामा येथे हल्ल्यात ४० जवान शहिद झाले, हा हल्ला कोणी त्याचा तपास आजही लागलेला नाही. मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली व अदानी, अंबानीचे घर भरले. कांदा निर्यात बंदी उठवताना गुजरातची उठवली पण महाराष्ट्रातील कांदा निर्यातला परवानगी दिली नाही. भाजपा सरकारने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले. राम मंदिर उद्घाटन व संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी असल्याने भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण न देऊन त्यांचा अपमान केला, असेही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसने जनतेला गॅरंटीकार्ड दिले आहे, गरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार, ३० लाख सरकारी रिक्त पदे भरणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, एमएसपीचा कायदा आणणार, शेती जीएसटी मुक्त करणार, जातनिहाय जनगणना करणार आहे असे नाना पटोले यांनी सांगितले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरात झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेत सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल भाष्य करण्यात आले नाही. २०१४ च्या निवडणुकीत मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतून मेट्रोचे कोच तयार करू असे भाजपवाले म्हणाले होते, 2019 ला त्याच फॅक्टरीतून बुलेट ट्रेन कोच तयार करू असे म्हणाले आणि आता 2024 ला ते त्या फॅक्टरीतून वंदे भारत कोच तयार करू असे म्हणतात पण महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार म्हणून या फॅक्टरीतून कोच बाहेर काढतील. नांदेड अहमदपूर रेल्वे विकसित झाली पाहिजे, रोकडा सावरगाव पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता करू, या परिसरातील ऊस मांजरा परिवार घेऊन जाईल. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करा आणि ७ मे रोजी डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावासमोरील हाताच्या चिन्हाचे बटन दाबून विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन देशमुख यांनी केले.

आमदार वजाहत मिर्झा म्हणाले की, देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजपचा सुपडा साफ होणार आहे. देशाला स्वातंत्र्य काँग्रेस पक्षाने मिळवून दिले, ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्याची असून डॉक्टर शिवाजी काळगे हे उच्चशिक्षित सुसंस्कृत, डॉक्टर आहेत त्यांना विजयी करा असे आवाहन केले
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, देशातील व राज्यातील भाजपच्या कारभाराचा जनतेला वीट आलेला आहे. लोकशाही, संविधान भाजपमुळे धोक्यात आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार ते काम करत नाहीत. मोदी शहा यांच्या काळात देशात दडपशाही वाढली आहे त्यांनी शेतकऱ्यांची आंदोलने चिरडली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संग्राम पवार यांनी केले तर आभार शिवकुमार कदम यांनी मानले.

‘कामगार हिताचे कायदे पुनर्पस्थापित करून’ कामगारक्षेत्रास न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भुमिका..! – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी


पुणे दि १ मे – ब्रिटीश-गुलामीत पिचत पडलेल्या भारताचे, स्वातंत्र्य लढ्याद्वारे ‘लोकशाहीरुपी देशात रुपांतर’ हे काँग्रेस’नेच् केले व समानता, न्याय व सर्वांगीण प्रगतीची कवाडे देशात उघडली गेली असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले. देशाची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असतांनाच् देशातील मोदी सरकारने उद्योगपती मित्रांकरीता भांडवलशाही धार्जिण भुमिका घेऊन, कामगार हिताचे २९ कायदे रद्द केले. त्यामुळे कामगार देशोधडीला लागले व असुरक्षीतत्च्या गर्तेत अडकले. देशातील कामगारांप्रती झालेला अन्याय भरुन काढण्यासाठी, २०२४ च्या निवडणुकीनंतर, कामगार हिताचे कायदे पुनर्पस्थापित करून’ कामगारक्षेत्रास न्याय मिळवून देण्याची काँग्रेसची भुमिका असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले.
काँग्रेस प्रणीत इंडीया आघाडीचे पुणे शहर लोकसभेचे उमेदवार रविंद्र धगेकर यांनी आज, १ मे महाराष्ट्र दिन, कामगार दिना निमित्त, शिवाजी नगर येथील देशातील श्रमिकांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमात काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी बोलत होते.
उपस्थित मान्यवरांनी “महराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या” नागरीकांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी, माजी आमदार दीप्ती चवधरी, लिगल विभागाचे प्रदेश सचिव ऍड. फैयाज शेख, भाऊ गोरावडे, मयूर काळेल, सतीश चव्हाण, राजेश मांजरे, रमण पवार, धीरज खोरे, रुगवेदी सपकाळ, सुभाष काळे, अविनाश बहिरट, विकास शिरोळे, अरविंद कांबळे, सुरेश नांगरे, शेखर जाधव, अण्णा काळेल इ उपस्थित होते..!

पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ

फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’

पुणे : ‘खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो, असा माझा विश्वास असून देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ हे आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातही विविध क्रीडा प्रकारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन पुण्याला क्रीडानगरी करण्याचे ध्येय गाठणार असून पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना व्यक्त केला.

पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य कसे असावे, याबद्दल चर्चा करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्व फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोहोळ बोलत होते. ‘खेळाडू म्हणून स्वत:ला घडविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, याची मला जाणीव आहे. ते करताना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्याची जबाबदारी मी सातत्याने घेत आलो आहे. यापुढे अधिक जोमाने घेईल, त्यासाठी कोणताही खेळाडू कुठेही अडता कामा नये,’ अशी ग्वाहीही मोहोळ यांनी दिली.

‘पुण्याने राज्याला आणि देशालाही अनेक खेळाडू आजवर दिले आहेत. ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे नाव मोठे केले अशा खेळाडूंचे मार्गदर्शन घेत पुण्याची क्रीडा संस्कृती आणखी जोमाने पुढे नेण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे’, असेही मोहोळ म्हणाले.

छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, डॉ. दीपक माने, शैलेश टिळक, विलास कथुरे, डॉ. पी. जी. धनवे यांनी या कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. शैलेश टिळक यांनी सर्व खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना खेळाडूंनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्याला सर्व खेळाडूंच्या वतीने ऑलिंपियन मनोज पिंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा असल्याचे सांगितले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या खेळाडूंसाठी संदेश पाठवला होता. ‘सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेच; पण तुम्हीदेखील भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळावे, यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. ते तुम्ही करीत आहात याची मला पूर्ण खात्री आहे. २०२९ साली होणाऱ्या युथ ऑलिम्पिकसाठी आपण प्रयन्त करतच आहोत, पण ते पुण्यात व्हावे यासाठी देखील आम्ही कसोशीने प्रयत्न करू. मुरलीअण्णांच्या नेतृत्वात पुण्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या खेळांसाठी आम्ही पूर्णपणे मदत करू,’ असे त्यांनी संदेशात म्हटले होते

रेखा भिडे, अंजली भागवत, शांताराम जाधव, डॉ. दीपक माने या मान्यवर खेळाडूंनीही मनोगत व्यक्त केले. अरविंद पटवर्धन यांनी आभार मानले.

नामवंत खेळाडूंची हजेरी…

अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात पार पडलेल्या या कॉन्क्लेव्हसाठी ३२ विविध प्रकारच्या खेळांतील नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त नेमबाज अंजली भागवत, ऑलिंपियन मनोज पिंगळे, रेखा भिडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, गौरव नाटेकर, संदीप किर्तने, श्रीरंग इनामदार, एस. द्रविड, ध्यानचंद पुरस्कार विजेते अभिजित कुंटे, नितीन किर्तने, २०११ चे मिस्टर युनिव्हर्स किताब विजेते महेश हगवणे, जीवनगौरव पुरस्कारप्राप्त रमेश विपट, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी विकी बांकर यांच्यासह १६५ छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा समावेश होता.

सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदी शहांच्या नाकाखालून परदेशी कसा पळाला.

मातृशक्ती, नारीशक्ती ह्या भाजपाच्या पोकळ घोषणा, भाजपाच्या राज्यात महिला असुरक्षित.

मुंबई, दि. १ मे २०२४भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत गंभीर असून त्याच्या मुसक्या आवळून कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाच्या महाराष्ट्र समन्वयक प्रगती अहिर यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रगती अहिर म्हणाल्या की, प्रज्वल रेवन्ना याच्या सेक्स स्कँडलची माहिती भारतीय जनता पक्षाला होती, असे असतानाही भाजपाने जेडीएसबरोबर कर्नाटकात युती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रज्वल रेवन्नाचा प्रचारही केला. रेवन्नाला मत म्हणजे मोदीला मत असे मोदी म्हणाले. हजारो महिलांवर अत्याचार करणारा प्रज्वल्ल रेवन्ना मोदीशाह यांच्या नाकाखालून परदेशात पळला कसा. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वैयक्तीक कामासाठी किंवा उपचारासाठी परदेशात गेल्याची माहिती नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी असते पण रेवन्ना पदेशात पळून गेला याची माहिती कशी मिळाली नाही.
कर्नाटकातील हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले हा
नारीशक्तीचा, मातृशक्तीचा अपमान नाही का. नारीशक्ती, मातृशक्ती या भाजपाच्या पोकळ घोषणा आहेत. मागील १० वर्षांच्या भाजपा राजवटीत देशभरात लाखो महिलांवर अत्याचार झाले, भाजपा खासदार ब्रिजभूषणसिंह याने महिला खेळाडूंवर अत्याचार केले पण त्याचावरही कारवाई केली नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले त्यावर भाजपा व नरेंद्र मोदी काहीही बोलले नाहीत. भाजपा राजवटीत महिला सुरक्षित नाहीत, असेही प्रगती अहिर म्हणाल्या.या पत्रकार परिषदेला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार भूषण पाटील, राकेश शेट्टी आदी उपस्थित होते.

बारणे यांच्या विजयासाठी महायुतीची संत तुकारामनगरमध्ये बैठक संपन्न

बारणे यांच्या विजयाचा निर्धार

पिंपरी, दि. 1 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकवटले असून ठिकठिकाणी संयुक्त बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे.

खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे व राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या पुढाकाराने संत तुकारामनगर येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदानाची टक्केवारी वाढवून बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीस आमदार उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, भाजप नेते सदाशिव खाडे, अमित गोरखे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, माजी नगरसेवक वसंत शेवडे, नारायण बहिरवाडे, बबनराव गाडवे, जितेंद्र ननावरे, निलेश बारणे तसेच नंदू कदम, माणिकराव अहिरराव, फजल शेख, मायला खत्री, विशाल काळभोर, राहुल खाडे, सतीश नागरगोजे, मंगेश धाडगे, वर्षा जगताप, सुनील पालांडे, राजेश वाबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

आतापर्यंत झालेल्या प्रचाराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. संत तुकाराम नगर परिसरामध्ये प्रत्येक घरापर्यंत उमेदवाराचे परिचय पत्रक पोहोचवण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घरोघर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महायुतीच्या वतीने एक मोठी प्रचार फेरी संत तुकाराम नगर भागामध्ये काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरले.

आमदार खापरे, योगेश बहल, सदाशिव खाडे आदी नेत्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अशाच प्रकारच्या महायुतीच्या संयुक्त बैठका शहराच्या विविध भागांमध्ये घेऊन समन्वयाने अधिक प्रभावी पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे, अशी माहिती खाडे यांनी दिली.

मराठा महासंघ, खान्देश तिळवण तेली समाज मंडळाने दिले बारणे यांना पाठिंब्याचे पत्र

चिंचवड, दि. 1 मे – अखिल भारतीय मराठा महासंघ, खान्देश तिळवण तली समाज मंडळ, माजी सैनिक संस्था अशा विविध संस्था संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार बारणे यांना पाठिंब्याचे लेखी पत्र देण्यात आले. पत्रावर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष संतोष भांगरे, सरचिटणीस संजय देसाई यांच्या सह्या आहेत.

मराठा महासंघाने पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, सरकारच्या विविध खात्यांमध्ये निवड झालेले 2,200 तरुणांना आरक्षण रद्द झाल्यामुळे नियुक्तीपासून वंचित रहावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात बसून या मराठा तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. मंत्रालयात राजमाता जिजाऊ मा साहेबांचे तैलचित्र बसवण्यात आले.

2016 मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला शिक्षणात 13 टक्के तर नोकरीत 12 टक्के आरक्षण दिले. मराठा तरुण तरुणींना नवसंजीवनी ठरणारी सारथी संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून अनेक तरुणांना शासकीय सेवेत संधी मिळाली. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या 86,220 तरुण मराठा व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनामुळे महायुती सरकारने न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून सर्व सरकारी खात्यांना कुणबी नोंदी शोधण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून शोध मोहीम पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. नोंदी सापडलेल्या सर्वांना त्वरित कुणबी दाखले देण्याचे आदेश सरकारने दिले आहे, त्याबद्दल पत्रात समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाने 25 जुलै 2023 रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे लाक्षणिक उपोषण केले होते. आरक्षणाची मर्यादा वाढवून महाराष्ट्रातील मराठा व भारतातील क्षत्रिय समाजांना संवैधानिक आरक्षण द्यावे, ही मागणी महायुतीने मान्य करून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे, असे पत्रात म्हटले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने केले आहे.

खान्देश तिळवण तेली समाजाचा पाठिंबा

पिंपरी-चिंचवड व पुणे परिसर खान्देश तिळवण तेली समाज मंडळाने खासदार बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मावळ मतदार संघात या समाजाचे सुमारे पाच हजार मतदार आहेत. मंडळाचे अध्यक्ष अनिल चौधरी व सचिव भरत चौधरी यांनी बारणे यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. खासदार बारणे हे खान्देश तिळवण तेली समाजाच्या अडीअडचणीच्या वेळी सदैव पाठीशी उभे राहतात व समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती मदत तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतात. त्यामुळे समाज बांधवांच्या संमतीने खासदार बारणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मंडळाच्या कार्यकारणीने एकमताने घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

देहूगाव माजी सैनिक संस्थेचा पाठिंबा

श्रीक्षेत्र देहूगाव येथील माजी सैनिक संस्थेने खासदार बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल सवालाखे यांनी बारणे यांना पाठिंबा पत्र दिले. सुमारे 160 नोंदणीकृत माजी सैनिकांची कुटुंबे या संस्थेची सभासद आहेत. आम्ही संस्थेसाठी देहूगाव विठ्ठलवाडी येथे सर्वे नंबर 97 मधील सरकारी जमिनीची मागणी केली असता कोणताही विलंब न लावता खासदार बारणे यांनी न हरकत प्रमाणपत्र देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात व मंत्रालयात पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन केले. खासदार बारणे यांचे संसदेतील कार्यही उल्लेखनीय आहे. सर्वांना जिवाभावाचा वाटणारा, जमिनीवरील लोकनेता भविष्यातही हवा असल्यामुळे माजी सैनिकांच्या परिवारांनी बारणे यांना पाठिंबा दिला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४ वा वर्धापन दिन संपन्न.

पुणे-महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिन निमित्त बुधवार दि. १ मे २०२४ रोजी प्रशासक तथा महापालिका आयुक्तडॉ. राजेंद्र भोसले, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सकाळी ७.०५ वाजता राजेंद्र भोसले, यांचे हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणण्यात आले.
या नंतर मतदानाचा टक्का वाढविणेकरिता आयुक्त यांचे समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाची शपथ घेतली.
या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे,अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) पृथ्वीराज बी.पी. तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असंख्य माध्यमे विकत घेऊनही जे पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात, ते जनतेत काय मिसळणार ?

मोदीजी, वाढत्या महागाई,बेरोजगारीवर आपण गप्प का ?

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा सवाल; आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय

सभा घेणे, भाषणे ठोकणे म्हणजे लोकांमध्ये मिसळणे, असे होत नाही. गेल्या १० वर्षात ते एकदाही लोकांमध्ये मिसळले नाहीत. इतकेच काय या १० वर्षात एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. अनेक चॅनेल त्यांनी विकत घेतले असले तरी पत्रकारांच्या प्रश्नांना जे आजही घाबरतात,मग ते जनतेत मुक्तपणे काय मिसळणार ?

पुणे : महागाई का कमी केली नाही, यावर ‘ते’ बोलणार नाहीत. बेरोजगारी का वाढतेय, याकडे ‘ते’ दुर्लक्ष करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत, असे विचारल्यानंतर ‘ते’ कानावर हात ठेवतात. महिलांवर अत्याचार का वाढले आहेत, असे म्हणल्यानंतर ‘ते’ डोळे बंद करतात. असे हे अंधे-मुके आणि बहिरे सरकार आपण गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे. असे सरकार देशातील जनतेला नकोय, असे अशी खरमरीत टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदी यांच्या भाषणात नवीन काहीही नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचे भाषण पूर्ण होत नाही. विकासावर ते बोलत नाहीत.वाढत्या महागाई, बेरोजगारीवर गप्प राहतात. वर्षाला २ कोटी रोजगार देवू, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देवू, सर्व टोल नाके बंद करू, पेट्रोल, गॅस स्वस्त करू… अशी खोटी आश्वासने देवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारची जुमलेबाजी आता जनतेला चांगलीच समजली आहे.

केंद्र सरकारने पन्नास रुपयांचे पेट्रोल ११० रुपयांवर नेले. ४०० रुपयांचा गॅस १२०० रुपयांवर नेला. त्यामुळे सर्वसामान्यांना काय हाल सोसावे लागत आहेत, हे मोदींनी कधी रस्त्यावर उतरून पाहिले नाही. सभा घेणे, भाषणे ठोकणे म्हणजे लोकांमध्ये मिसळणे, असे होत नाही. गेल्या १० वर्षात ते एकदाही लोकांमध्ये मिसळले नाहीत. इतकेच काय या १० वर्षात एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. अनेक चॅनेल त्यांनी विकत घेतले असले तरी पत्रकारांच्या प्रश्नांना ते आजही घाबरतात, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केल्यामुळे हजारो छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. तर अनेकांनी आत्महत्या केल्या. आपल्या देशात कोरोना येण्याआधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला ‘जनतेची काळजी घ्या, कोरोना जगात सर्वत्र पसरत आहे’, असे पत्राद्वारे कळवले होते. पण, केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, देशातील लाखो लोक मृत्युमुखी पडले. या दहा वर्षांत केवळ धार्मिक तेढ वाढवण्याचे काम या सरकारने केलेले आहे. आता यांना जनताच योग्य ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी अप्पर आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल, तसेच आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. १: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली. यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मतदान करण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

कोथरूड येथील हॉटेल खिंड ढाब्यावर छापा:चालकासह मद्यपी ग्राहकांना अटक, चालकाला १ लाख रूपयांचा दंड,ग्राहकांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड

पुणे: राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने कोथरूड येथील हॉटेल खिंड ढाब्यावर टाकलेल्या छाप्यात ढाबाचालक ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था करुन देत असताना आढळून आला. या प्रकरणात ढाबाचालकासह चार मद्यपींना अटक करुन एकाच दिवसात आरोपपत्र दाखल करुन न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने ढाबाचालकाला १ लाख रूपयांचा दंड, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

राज्य उत्पादन शुल्क ‘सी’ विभागाच्या पथकाने शनिवार (ता.२७) रोजी कोथरूड येथील हॉटेल खिंड या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक योगेश सुरेश माथवड हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असताना आढळून आल्याने त्याचेसह चार मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. १ शिवाजी नगर, पुणे यांच्या न्यायालयात सादर केले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रताप बोडेकर, किरण पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक संदिप लोहकरे, महिला जवान उज्ज्वला भाबड, जवान शरद भोर, गोपाळ कानडे व वाहनचालक सचिन इंदलकर यांच्या पथकाने पार पाडली.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून बेकायदेशीर तसेच बनावट मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ढाबा, हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील, असे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक एस. एस. कदम यांनी कळविले आहे.

दौंड येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे : सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभागाअंतर्गत नव्याने सुरू झालेल्या दौंड येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तेची प्रवेश प्रक्रिया सूरू झाली असून अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रर्वग २ टक्के आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत.

प्रवेशासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका, विद्यार्थ्यांचे व पालकांची चार रंगीत छायाचित्रे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

शाळेत डिजिटल अध्यापन सुविधा, सायन्स पार्क, सेमी इंग्रजी माध्यम, मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व सुसज्ज इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय, ई ग्रंथालय आदी सोयी सुविधा असून दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा मेळावा व सहलीचे आयोजन करण्यात येते.

अधिक माहितीसाठी मुख्याद्यापक मुलांची निवासी शाळा, दौंड, भ्रमणध्वनी क्रमांक ९७६२९६९९५५ वर इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहनही शाळेचे मुख्याद्यापक एम. एम. वाघमारे यांनी केले आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

सोलापूर:- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. व जिल्ह्यात विविध धर्माचे, पंथाचे, वंशाचे, जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने, सलोख्याने एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करुया, असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.

 या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक, पत्रकार उपस्थित होते. 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन. याच दिवशी महाराष्ट्राचा मंगलकलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे  राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या 105 हुतात्मांना ही श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात महान विभूतींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले.

राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा: डॉ. भालचंद्र मुणगेकर

टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

मुंबई, दि. १ मे २०२४
लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून देशात हुकूमशाही राजवट येईल. आरएसएसचा तर राज्यघटनेला पहिल्यापासूनच विरोध आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा राज्यघटना बदलण्यासाठीच आहे, त्यामुळे घटना बदलणार नाही असे नरेंद्र मोदी कितीही सांगत असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आले की राज्यघटना बदलणार त्यामुळे लोकशाही व राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपा व नरेंद्र मोदींना सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना डॉ. मुणगेकर यांनी उपस्थितांना व राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा लोकशाही व राज्यघटनेवर विश्वास नाही. माजी सरसंघचालक गोलवलकर यांनी राज्यघटना ही गोधडी आहे असे म्हटले होते. भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी ४०० जागांचे बहुमत मिळाले की राज्यघटना बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार यांनीही नवीन राज्यघटना करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता प्रत्येक प्रचार सभेत राज्यघटना बदलणार नाही असे सांगत असले तरी त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसने राज्यघटना बदलली असा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे पण घटनेत दुरुस्ती करणे आणि घटना बदलणे याच फरक आहे. मोदी सरकारनेही निवडणूक आयुक्त नियुक्तीसंदर्भात नुकतीच घटना दुरुस्ती केली आहे.
लोकसभेसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र आहे, पराभवाच्या भितीने मोदी घाबरले असून आता ते, “मी फक्त निमित्त मात्र आहे, ईश्वरानेच मला पाठवले आहे” असे सांगत आहेत, याचा अर्थ मी देवाचा अवतार आहे, असे सांगून नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करत आहेत असे मुणगेकर म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, जोजो थॉमस, गजानन देसाई, उत्तर मुंबईचे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात घेण्याचं गुपित काय? शरद पवारांचा सवाल

पुणे: ज्या राज्यांत चाळीसहून अधिक लोकसभेच्या जागा होत्या, त्या राज्यांत एक किंवा दोन दिवसांत निवडणुका झाल्या. पण महाराष्ट्राची निवडणूक पाच दिवसांत विभागली गेली. यामागचा मोदी आणि भाजपचा डाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघड केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे वारजे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या मतदारांचे आभार मानताना शरद पवार म्हणाले की, आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इतक्या संख्येने तुम्ही उपस्थित असलेल्या तुमचं स्वागत करायला मला मनापासून आनंद होत आहे. देशाचं सूत्र देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा आणि गेली पाच दहा वर्षं ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली, त्यांच्या कामाचा आढावा घ्यायच्या दृष्टीने ही निवडणूकआधीची सभा अत्यंत महत्त्वाची आहे. काल देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात होते, आजही होते. चांगली गोष्ट आहे की त्यांना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा यावं लागतंय. स्थिती कशामुळे झाली? तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम आखलाय, तो गमतीचा आहे. तामिळनाडूमध्ये 42 जागा आहेत. त्या जागांची निवडणूक एका दिवसात झाली. उत्तरप्रदेशमध्ये त्याहीपेक्षा जास्त जागा आहेत. त्यांची निवडणूक दोन दिवसांमध्ये. महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याची निवडणूक पाच दिवसांमध्ये होणार आहे. कशासाठी? जर कर्नाटकची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका दिवसात होऊ शकते, तर महाराष्ट्राची का होऊ शकत नाही? ती होऊ शकत नाही, त्याचं महत्त्वाचं कारण मोदींच्या यंत्रणेचा अहवाल आला असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही. पण, पर्याय काय? त्यांनी मग हा पर्याय शोधला की महाराष्ट्राची निवडणूक चार-पाच टप्प्यात घ्यायची. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं. खोट्या गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मत मिळवायचं हे सूत्र त्याच्या मागे असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही, असं म्हणत शरद पवार यांनी मोदी आणि भाजपचा डाव उघड केला.

‘मोदी आले, त्याच्याही आधी 2014साली पहिल्यांदा आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं काय? ते सांगत होते सगळ्या सभांमधून की मनमोहन सिंगांच्या राज्यात महागाई प्रचंड वाढली. ही वस्तु खरी नव्हती. साधी गोष्ट आहे, इंधनाचा दर, पेट्रोलचा दर 2014ला 71 रुपये लीटर होता. मोदींनी सांगितलं 2014ला की माझ्या हातात सत्ता आल्यानंतर 50 दिवसांत पेट्रोलचा दर खाली आणतो. 50 दिवस काय तर आज 3650 दिवस झाले मोदींनी हे आश्वासन देऊन आणि 3650 नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली..106 रुपये लीटर. जे आश्वासन दिलं होतं, 50 टक्क्यांनी खाली आणतो आणि आज 106… तुम्हा आम्हा घरांमध्ये आई-बहीण-पत्नी स्वयंपाक करायला सिलिंडर वापरते. मोदी साहेबांनी सांगितलं की घरगुती गॅस आम्ही 410 होता, आणखीन खाली आणणार. लोकांना खरं वाटलं. तोच सिलिंडर गॅस आज अकराशे साठ रुपये झाला. त्यांनी हे सांगितलं होतं की मत द्यायला जात असाल तर सिलिंडरला नमस्कार करा आणि त्याला नमस्कार करून मत द्यायला जा. तुमची खात्री बसली की भविष्यात असंच होणार आहे. याचा अर्थ एकच आहे, चुकीच्या, खोट्या गोष्टी सांगायच्या. खोटी आश्वासनं द्यायची. या देशातील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. नोकरीच्या संधींचा शोध घेतात. मोदींनी सांगितलं की आमची सत्ता आली की एका वर्षांत दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ. दहा वर्षं होऊन गेली, आज काय चित्र दिसतंय? जगात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची संघटना आहे. ती जगातल्या नोकरींच्या संधी संदर्भात अभ्यास करते. त्यांचा अहवाल नुकताच आलाय. त्यात म्हटलंय की भारतात 100 तरूण शिकून बाहेर पडले, तर त्यातल्या 87 तरुणांना नोकरी मिळत नाही. याचा अर्थ काय? दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणारे मोदी आज शंभरातल्या 87 तरुणांना नोकरी देऊ शकत नाहीत. या तरुणांची फसगत करण्याची भूमिका त्यांनी घेतली. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांच्या हातात सत्ता देणं देशाच्या हिताचं नाही, या निष्कर्षाशी आपण पोहोचतो.’

‘सत्ता ही देशाच्या हितासाठी, भल्यासाठी, भवितव्यासाठी असते. आज मोदी या सत्तेचा वापर कसा करतात. याची उदाहरणं आहेत. एक उदाहरण देतो. झारखंड नावाचं आदिवासी लोकांचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे, रांची ही राजधानी आहे. या मागच्या वर्षी आदिवासी आपल्या राज्यात आदिवासींचं जीवन कसं सुधारता येईल यासाठी जिवनाची पराकाष्ठा करतात. केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करताहेत. केंद्र सरकारने त्यांचे जास्त प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे एका कार्यक्रमात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर टीका केली. परिणाम काय झाला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुगांत टाकलं. देशाची राजधानी दिल्ली. या दिल्लीत दोन तीन निवडुणका अरविंद केजरीवाल निवडून येत आहेत. दिल्लीमध्ये संसदेत सदस्य म्हणून जातो, तेव्हा बघतो की आज दिल्लीचा चेहरा बदलतोय. केजरीवालांनी उत्तम काम केलं. शैक्षणिक संस्थेत आणि प्राथमिक शिक्षणात अनेक सुधारणा केल्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढवला. केजरीवालांनी दिल्लीत आरोग्यासंबंधी अनेक सुविधा दिल्या. त्यामुळे लोकांचं आजारपण, आरोग्याचे प्रश्न कमी झाले. म्हणून लोकांसाठी काम करणारे केजरीवाल. केंद्र सरकारने एखादं काम नीट केलं नाही म्हणून टीका केली. त्या केजरीवालांना दिल्लीच्या तुरुंगात टाकलं. एक नाही दोन मुख्यमंत्र्याना तुरुंगात टाकायचं. पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची. ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांविरोधात खटले भरायचे. अनिल देशमुख, सामनाचे संपादक, शिवसेनेचे नेते उत्तम लिखाण करतात, लोकांत जागृती करतात. त्यांना तुरुंगात टाकायचं.’

‘स्वातंत्र्यापूर्वी अनेकांनी इंग्रजांच्या तुरुंगात दिवस घालवले. त्यांच्या कष्टांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश योग्य दिशेने जाईल, याची खबरदारी ते घेतात, त्यासगळ्यांबाबत आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीने बोलतात. काँग्रेस नेते राहुल गांधींनी संपूर्ण देशाचं चित्र समजण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रस्त्यावरून चालत जातो. जनतेला भेटतो., तरुणांना, शेतकऱ्यांना, आया-बहिणींना भेटतो. आणि या देशाच्या दुसरं काय ते समजून घेऊन मार्ग काढण्याच दृष्टीने देशात फिरतो, त्या राहुल गांधींना काय म्हटलं जातं. त्यांच्यावर टीका केली जाते. का? पदयात्रा काढणं म्हणजे गुन्हा नाही. ज्या तरुणाचे वडील राजीव गांधी यांनी देशासाठी जीव दिला. त्यांच्या आई इंदिरा गांधी यांनी हौतात्म्य पत्करलं. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यपूर्व काळात 13 वर्षं तुरुंगात होते. आणि स्वातंत्र्यानंतर ज्यांनी संसदीय लोकशाही स्थापन आणि आधुनिक विचारांची स्थापना केली. त्यांच्याबद्दल वेडंवाकडं बोलण्याची, नालस्ती करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान या पदाला महत्त्व आहे. ते महत्त्व राखणं आपलं कर्तव्य आहे. मी कधी वैयक्तिक टीका करत नाही. पण या पदाची गरिमा त्यांनी ठेवलेली नाही. जाईल त्या राज्यात, तिथल्या नेत्यांवर टीका करायची हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. हे बदलायचं असेल तर आपल्याला या देशात बदल करण्याची गरज आहे. आणि ती संधी निवडणुकीच्या मताच्या रुपाने आपल्या सगळ्यांना आलेली आहे.’ असं आवाहन शरद पवार यांनी उपस्थित मतदारांना केलं.