Home Blog Page 1064

पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी-मुरलीधर मोहोळ

पुणे-आगामी 20 वर्षांचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असल्याने पुण्याची अन्य शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी खासदार संजय काकडे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, प्रकाश ढोरे, दत्ता खाडे, परशुराम वाडेकर, मुकेश गवळी, आनंद छाजेड, कार्तिकी हिवरकर, दुर्योधन भातकर, विजय वेल्हेकर, हर्षद बोडके, प्रविण गायकवाड, धर्मेश शहा, नितिन शिंदे, डॉ. अजय दुधाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोळ म्हणाले, शहरातील पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी आणि हडपसर स्थानकांचा गेल्या दहा वर्षांत प्रवासीकेंद्रीत विकास करण्यात आला आहे. त्यातील पुणे स्थानकावर एकूण 6 फलाट असून, दररोज 72 रेल्वे गाड्या सुटतात व लोकलच्या 41 फेऱ्या होतात. दररोजची प्रवासी संख्या दीड लाख इतकी आहे. 750 मीटर लांबीचे नवीन चार आणि लोकलसाठी 600 मीटर लांबीचे नवीन दोन फलाट बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याहून 300 रेल्वे धावतील आणि दररोजची प्रवासी संख्या तीन लाख इतकी होऊ शकेल.

मोहोळ पुढे म्हणाले, मोदी सरकारने पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश देशातील सुवर्ण चतुष्कोण रेल्वे मार्गावरचे प्रमुख स्थानक म्हणून केला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानक तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेने जोडले जाईल. सध्या पुणे ते वाडीदरम्यानचा सर्व्हे सुरू असून, पुणे ते लोणावळादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. सर्व रेल्वे स्थानकांवरील विकासकामांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करेन.

समुद्राखाली जाऊन ड्रामा,ज्येष्ठ नेते आणि पवारांवर टीका, बलात्कारी रेवण्णाला साथ ; राहुल गांधींची मोदींवर जोरदार फटकेबाजी

इंडिया आघाडीचे सरकार येताच जातीय जनगणना करुन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार.

जातनिहाय जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे मराठा, धनगर व इतर छोट्या जातींची आरक्षणातील भागिदारी वाढवणार

राहुल गांधींनी मिडीयाच्या मालकांना केले लक्ष्यमिडीया कितीही ओरडू दे… आम्हाला कितीही शिव्या देऊदेत… आम्हाला फरक पडत नाही. -पत्रकारांना कुटुंब आणि रोजी रोटीची चिंता -पत्रकारांच्या मध्ये देखील किती मागे राहिलेल्या जातींचे प्रतिनिधित्व हेही लक्षात घ्यावे लागेल असे म्हणाले राहुल गांधी .

कोरोना काळात व्हॅक्सीन तयार करणारी कंपनी मोदींना इलेक्ट्रोरल बॉन्डच्या माध्यमातून पैसे देत होती.का देत होतीं मोदींच्या पार्टीला पैसे हे समजून घ्या म्हणाले राहुल गांधी

पुणे-नरेंद्र मोदी कधी पाकिस्तानची गोष्ट सांगतील, कधी समुद्राच्या खाली जाऊन ड्रामा करतील, त्यांनी राजकारणाची गंमत लावलीय, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला. तसेच,ज्येष्ठ नेत्यांवर आणि शरद पवारांबद्दल मोदींनी केलेल्या टीकेवरुनही राहुल गांधींनी पलटवार केला. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते असलेल्या शरद पवारांबद्दल उलटसुटल बोलत आहेत. पंतप्रधान पदाची गरिमा ठेवली नाही. पंतप्रधानांनी विकासाची, देशाची बात केली पाहिजे, शेतकऱ्यांवर बोललं पाहिजे. पण, शरद पवारांवर बोललं म्हणजे लोकांना आवडेल असं त्यांना वाटतं का, असा सवालही राहुल गांधींनी पुण्यातून विचारला आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, राहुल गांधी यांनी पुणे जिल्हयातील महायुतीचे चार उमेदवार सुप्रिया सुळे(बारामती),रवींद्र धंगेकर(पुणे), अमोल कोल्हे(शिरूर) आणि संजोग वाघेरे पाटील(मावळ) यांच्या प्रचारार्थ आज दि. (3 मे) रोजी  पुणे येथे आले होते. यावेळी महासचिव रवि चेन्नीथ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,रमेश बागवे,मोहन जोशी ,आबा बागुल,अरविंद शिंदे , संग्राम थोपटे, रजनी पाटील, अजित दरेकर, दीप्ती चौधरी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेतून शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. भटकती आत्मा असा उल्लेख करत मोदींनी नाव न घेता शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. आता, त्याच पुण्यातून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केला आहे. वरिष्ठ नेत्यांबद्दल काहीही बोलणं हे पंतप्रधानांना शोभतं का, असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.

संविधान वाचविण्याची ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थान मधील वंचित, आदिवासी आणि अल्पसंख्याक लोकांना अधिकार मिळाले ते काढून घेणे प्रयत्न केले जात आहे.संविधान गायब झाले तर हिंदुस्थान ओळख राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी जी देणं दिली ते आम्ही संपुष्टात आणून देणार नाही, असे मत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

गांधी म्हणाले, आरक्षण संपवण्याचा भाजपचा कट आहे. जे आरक्षणसाठी ५० टक्के कृत्रिम मर्यादा लावली आहे ती संपवणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही सभेत जाहीर करावे. निवडणूक नंतर आम्ही सत्तेत आल्यास हे काम करणार आहे. देशात १५ टक्के दलित, आठ टक्के आदिवासी आणि ५० टक्के मागासवर्गीय असे ७३ टक्के लोक आहे. देशात महागाई, गरिबी, बेरोजगारी, इंधन दरवाढ आहे मात्र, प्रसारमाध्यमे ते दाखवत नाही ,काही बोलत नाही. हजारो कोटींची निवडणूक रोखे भ्रष्टाचार झाला आहे पण त्याबाबत मीडिया गप्प आहे. मोदी हे पारदर्शक काम करत आहे तर देणगीदार यांची नावे लपवून का ठेवण्यात आली. देणगीदार कंपन्या यांना टेंडर मिळत आहे.

जनतेसमोर नरेंद्र मोदी भ्रष्टाचार करत आहे. त्यांनी १६ लाख कोटी रुपये २२ उद्योजक यांचे कर्जाचे माफ केले आहे. त्यांच्याजवळ देशातील ७० टक्के जनता इतके धन आहे. ९० टक्के लोक मनरेगा , कंत्राटी कामे करत आहे, त्यांची देशात कुठे भागीदारी दिसत नाही. दलित, आदिवासी यांचे प्रधिनित्व कुठे दिसत नाही त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाल्यास कसे जनतेला मूर्ख बनवले जात आहे समजून येईल. त्यानंतर नवीन राजनीती सुरू होईल.मी जतिगणाना गोष्ट करण्यापूर्वी ते ओबीसी स्वतःला सांगत होते. पण त्यानंतर ते देशात जाती नाही सांगत आहे. मागील दहा वर्षात मोदी यांनी २२ लोकांना फायदा दिला आहे. विविध उद्योग खासगीकरण करण्यात आले आहे.

  • मी जेव्हापासून जातनिहाय जनगणनेची मागणी करू लागलो तेव्हापासून मोदी म्हणू लागले की या देशात दोनच जाती आहेत एक श्रीमंत आणि एक गरीब.
  • अचानक ते ओ बी सी असल्याचा दावा करतायत.
    कॉंग्रेस सत्तेत आल्यावर आरक्षणाची मर्यादा आम्ही उठवू… ज्यामुळे मराठा आणि धनगरांना आरक्षणात वाटा मिळेल.
  • कॉंग्रेस सत्तेत आल्यावर भारतातील गरीबांची यादी आम्ही तयार करु. त्या महिलेच्या अकांटमधे आम्ही वर्षाला एक लाख रुपये जमा करू.
    कॉंग्रेस सत्तेत आल्यावर जी एस टी संपवून टाकू
  • नोकरी करणार्रा महिला घरी येऊन डबल ड्युटी करतात… अशा महिलांच्या खात्यात कॉंग्रेस एक लाख रुपये जमा करेल.
  • अंगणवाडी सेविकांचे वेतन आम्ही दुप्पट करू.
    कॉंग्रेस सत्तेत आल्यावर शेतकर्यांचे कर्ज माफ करू
  • कॉंग्रेस सत्तेत आल्यावर अग्नीवीर योजना रद्द करू.
  • शेतकर्रयास्ठी कर्ज माफी कमिशन तयार करू.
  • मिडीया जेवढा ओरडेल तेवढे मला वाटेल की मी योग्य काम करतोय
  • कॉंग्रेस सत्तेत आल्यावर युवकांना पहिल्या वर्षभराच्या नोकरीची हमी देणार आणि विद्यापीठात शिकणार्या तरुणांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करणार.
  • रेवण्णाने 400 महिलांचा बलात्कार केलाय. बी जे पी च्याच आमदाराने ही गोष्ट गृहमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. मात्र तरिही मोदींनी अशा व्यक्तिंसाठी मते मागितली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्रात पाण्याखाली जाऊन ड्रामा करतात. मोदी पाण्याखाली घाबरले होते.
  • नरेंद्र मोदींनी शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याचा अपमान करतात.
  • महाराष्ट्र कॉंग्रेस विचारधारेचे राज्य आहे.
    पेपर लिक करणार्यांना कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कडक कायदा करू.*नोकर भरती आम्ही खाजगी कंपन्यांकडून बंद करू.

भाजपचे जे नगरसेवक,आमदार ठीक काम करणार नाहीत त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येईल -फडणवीस

पुणे-भाजपचे काही माजी नगरसेवक, आमदार पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजनाच्या बैठकीला ही ३० नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यातच आज फडणवीस यांनी आज माजी नगरसेवकांची बैठक घेऊन योग्य शब्दात समज दिली आहे. या बैठकीला बहुतांश सर्व नगरसेवक उपस्थित होते असे समजते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज पुण्यात आलेले असताना त्यांनी कोरेगाव पार्क येथे माजी नगरसेवकांची बैठक घेतली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,माजी खासदार संजय काकडे , शहराध्यक्ष धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी शिरूर लोकसभेतील हडपसर विधानसभा आणि बारामती लोकसभेतील खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. त्या भागातील माजी नगरसेवकांनी तेथे जास्त ताकद लावून जास्तीत जास्त मतदान शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला करून घ्या, यामध्ये कोणत्याही पद्धतीने दुर्लक्ष करू नका.
पुण्यातही प्रत्येकाने सोसायटी भेटी, कोपरा सभा, घरोघरी जाऊन वैयक्तीक गाठीभेटीवर लक्ष द्या. पुण्याची जागा आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायची आहे. जे लोकसभेसाठी काम करतील त्यांचाच विचार विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत केला जाईल.


जे काम करणार नाहीत त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी बजावले. या बैठकीत नगरसेवकांना त्यांचे मुद्दे मांडण्यास सांगण्यात आले होते, पण प्रचाराच्या पातळीवरील त्रुटी समोर येत असल्याने नगरसेवकांना थांबवून फडणवीस यांनी थेट मार्गदर्शन सुरु केले, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “पुण्यातील माजी नगरसेवकांची बैठक घेतली, यावेळी सर्वजण उपस्थित होते. प्रचारात जे नगरसेवक चांगले काम करत आहेत, त्यांचा सत्कार केला जाईल. जे चांगले काम करणार नाहीत त्यांच्याकडे बघितले जाईल.लोकसभेचा प्रचार कोण करत आहे? कोण करत नाही? यावर आमचे पूर्ण लक्ष असून, त्याची माहिती आम्हाला वेळोवेळी दिली जात आहे. सध्या १० ते १५ माजी नगरसेवक, काही आमदार काम करत नाहीत. त्यांच्या नावासह आमच्याकडे यादी आहे. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील व्यक्तिगत पातळीवर बोलून समज देतील. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर पुढे योग्य ती कारवाई करू, असा इशारा फडणवीस यांनी बैठकीत दिला.

आबा बागूल यांची कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणारे पुणे शहर काँग्रेसचे नेते, माजी उपमहापौर आबा बागूल यांची नाराजी दूर झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांच्या आदेशांनुसार बागूल यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बागूल हे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्याने अंतर्गत वादाचा एक अंक संपल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे.त्यांनी काँग्रेस भवनाच्या दारात केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात अचानक घेतलेल्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते. या वेळी बागूल यांची समजूत काढा, अशी सूचना थोरात यांनी केली होती. त्यानंतरही बागूल यांच्याशी कोणीही संपर्क साधला नसल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात फडणवीस यांची भेट घेतल्याची कुजबूज होती, तर आबा बागूल पक्ष सोडणार नाहीत. त्यांनी व्यक्तिगत कामासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असावी, अशी शक्यता शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली होती.या सर्व घडामोडी सुरू असताना थोरात यांनी त्यांच्या पुढील भेटीदरम्यान बागूल यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती. काँग्रेसचे उमेदवार धंगेकर हे दोन दिवसांपूर्वी बागूल यांच्या निवासस्थानी गेले होते. त्या वेळी त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसकडून बागूल यांची काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टायटनचे सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक घड्याळांचे नवीन कलेक्शन

सिरॅमिकचे सौंदर्य आणि ऑटोमॅटिक्स तंत्रज्ञान यांची सांगड असलेले कारागिरी आणि अचूकतेचे फ्यूजन अनुभवा

बंगलोर०३ मे२०२४:  टायटनने आपल्या सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स कलेक्शनमध्ये नवीन घड्याळे सादर केली आहेतसुबकता आणि नावीन्य यांचा अतुलनीय तरीही सहजसुंदर मिलाप या नवीन घड्याळांमध्ये साधण्यात आला आहेयंदाच्या वर्षभरात ब्रँड ऑटोमॅटिक्सवर खूप जास्त भर देत असून या कलेक्शनमध्ये सिरॅमिक बांधणी आणि टायटनने स्वतः तयार केलेली ऑटोमॅटिक मुव्हमेंट ही स्वतःची दोन सर्वात प्रभावी कौशल्ये एकत्र केली आहेतत्यामुळे डिझाइन्सचा नाविन्यपूर्ण मिलाप असलेले टायटनचे सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स कलेक्शन ब्रँडच्या आजवरच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहेकारागिरी नेहमी उत्कृष्ट असावी याप्रती टायटन ब्रँडची बांधिलकी या कलेक्शनमधून दर्शवली जातेइतकेच नव्हे तरसिरॅमिक आणि टायटनचे स्वतःचे ऑटोमॅटिक कौशल्य यांचा मिलाप देखील यामधून दिसून येतोटिकाऊपणाओरखडे  पडण्याची क्षमतावजनाला हलकेहायपोअलर्जेनिक ही सिरॅमिकची वैशिष्ट्ये आणि टायटनच्या स्वतःच्या ऑटोमॅटिक मुव्हमेंटमुळे रंगांचे विविध पर्याय हे दोन्ही लाभ सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स वॉच कलेक्शनमध्ये मिळतात.

२२ ज्वेल्ससह ७ए२०-एस मुव्हमेंट असलेले हे कॅलिबर प्रति दिवशी -१० सेकंद ते +३० सेकंद अचूकतेसह आणि ३६ तासांच्या प्रचंड पॉवर रिझर्व्हसह डिझाईन करण्यात आले आहे. स्केलेटल डायल फेस नाजूक ऑटोमॅटिक मुव्हमेंट अतिशय सुंदर पद्धतीने दर्शवते. ड्युएल-टोन सॉलिड लिंक स्टेनलेस स्टील आणि सिरॅमिक ब्रेसलेट सुबक सौंदर्य दर्शवते. डोम्ड क्रिस्टल आणि काँकेव्ह तसेच स्क्वेयर डायल्स यांचा समावेश असलेले हे कलेक्शन आधुनिक आकर्षक सौंदर्य प्रस्तुत करते. ऑटोमॅटिक कौशल्य आणि सिरॅमिकचे आकर्षक सौंदर्य यांचा मिलाप असलेली ही बहुउपयोगी घड्याळे दिवसा तसेच संध्याकाळच्या कार्यक्रमांमध्ये देखील वापरता येतात.

अतिशय अनोख्या आवडीनिवडी असलेल्या, पारखी पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळ फक्त ऍक्सेसरी नाही तर डिझाईन, तंत्रज्ञान आणि कालातीत सौंदर्य यांचा मिलाप असलेले स्टेटमेंट आहे. सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक वॉच कलेक्शनच्या किमती २४९९५ ते २६९९५ रुपयांदरम्यान आहेत.  यंदाच्या वर्षी तयार केल्या जात असलेल्या ऑटोमॅटिक घड्याळांच्या आकर्षक श्रेणीमध्ये सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स वॉच कलेक्शन  महत्त्वाचा टप्पा आहे.

टायटन स्टोर्स आणि www.titan.co.in वर हे कलेक्शन उपलब्ध आहे. घड्याळ बनवण्याच्या कलेत उत्कृष्ट कामगिरी बजावण्याच्या बांधिलकीचे प्रतीक असलेल्या या रेन्जमध्ये टायटन ब्रँड अजून अनेक डिझाइन्स आणणार आहे.

जम्मू आणि उधमपूर येथे राहणाऱ्या विस्थापितांसाठी ‘फॉर्म-एम’ची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाकडून रद्द

मुंबई उपनगर, दि. 3 : लोकसभा निवडणुका 2024 मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना  मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म  एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम  सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राचे स्व-प्रमाणन अधिकृत केले आहे, त्यामुळे हे प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित करून घेण्याची धावपळ वाचेल.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.

प्रत्येक निवडणुकीत फॉर्म – एम भरताना येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे मताधिकाराचा अधिकार बजावण्यात होणारा त्रास याबाबत अनेक काश्मिरी स्थलांतरित गटांकडून विविध निवेदने प्राप्त झाली. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील योग्य विचारविनिमय करून आणि राजकीय पक्षांच्या पूर्ण सहमतीने 9 एप्रिल रोजी आयोगाला टिप्पण्या सादर केल्या. या योजनेबाबत अनेक काश्मिरी स्थलांतरित गटांकडून प्राप्त झालेली निवेदने, राजकीय पक्षांचे अभिप्राय आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या टिप्पण्या विचारात घेतल्यानंतर, काश्मिरी विस्थापितांनी संक्रमण शिबिरांमध्ये वैयक्तिकरित्या मतदान करण्याची आणि दिनांक 11 एप्रिलच्या आदेशाद्वारे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया आयोगाने अधिसूचित केली.

टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्ष २०२४ च्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली

मुंबई मे २०२४टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्ष २०२४ च्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली.

शाश्वत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करणारी, भारतातील आघाडीची इंजिनीयरिंग, प्रोक्युअरमेंट व कन्स्ट्रक्शन कंपनी आणि जागतिक पातळीवरील नामांकित टाटा समूहातील एक सदस्य, टाटा प्रोजेक्ट्सने आर्थिक वर्षासाठीच्या आपल्या आर्थिक निष्कर्षांची घोषणा केली आहे.

टाटा प्रोजेक्ट्सचे एमडी आणि सीईओ श्री विनायक पै यांनी आर्थिक वर्ष २०२४ मधील कामगिरीविषयी सांगितले, धोरणात्मक एकत्रीकरणसंघटनात्मक परिवर्तन आणि संचालनात्मक क्षमतांवरील भर याचे लाभ मिळू लागले आहेतआम्हाला पुन्हा नफा मिळू लागला आहे आणि आम्ही नावीन्य  तंत्रज्ञानाच्या बळावर अंदाज करण्यायोग्य  शाश्वत प्रकल्प करण्याच्या मार्गावर पुढे जात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.”

श्री पै यांनी पुढे सांगितले, “कामाची सुरक्षित जागा पुरवूनभारतीय कन्स्ट्रक्शन उद्योगक्षेत्रात सर्वोत्तम सुरक्षा मापदंड निर्माण करून टाटा प्रोजेक्ट्सने उद्योगक्षेत्रातील आघाडी कायम राखली आहेविविधता आणि समावेशाप्रती आमची बांधिलकी आमच्या लीडरशिप टीममधून दिसून येतेआघाडीच्या डीअँडआयवर आमचे उद्योगक्षेत्र भर देत असल्याचे हे एक उदाहरण आहेआमच्या प्रमुख कौशल्य विकास कार्यक्रमामार्फत कन्स्ट्रक्शनच्या भविष्याला आकार दिला जात आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”

A screenshot of a document

Description automatically generated

धोरण आणि वृद्धीकंपनीने आपल्या प्राधान्य दिल्या जात असलेल्या क्षेत्रांमध्ये सिलेक्टिव्ह बिडिंग करण्याचे, लाभदायक वृद्धीला चालना देण्याचे, कॉम्प्लेक्स प्रकल्पांवर भर देण्याचे आणि अनुकूल बाजारपेठ स्थितीचा लाभ घेण्याचे धोरण कंपनीने कायम राखले आहे. नावीन्य आणि तंत्रज्ञानामार्फत, अंदाज लावण्यायोग्य व शाश्वत प्रकल्प करून देऊन ग्राहकांना आनंद मिळवून देण्यावर आमचा धोरणात्मक भर आहे. टाटा प्रोजेक्ट्स नवनवीन संधींचा लाभ घेऊन बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सज्ज आहे.

तंत्रज्ञान  नावीन्य यांना चालना: उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या क्षमता आणि नावीन्य यांना चालना देण्यासाठी डिजिटल प्रोजेक्टवर आम्ही आमचा भर वाढवला आहे. त्यासाठी आणि मजबूत आयटी कोर उभारण्यासाठी आम्ही वर्षभरात सॅप ईआरपी मायग्रेट केले. फक्त ९ महिन्यात कार्यान्वित करण्यात आल्यामुळे हे ईपीसी सेक्टरमधील एक सर्वात वेगवान रोल आउट ठरले आहे. या वर्षभरात आम्ही अनेक तंत्रज्ञान भागीदारी केल्या आहेत आणि त्याद्वारे आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा पुरवल्या आहेत. या भागीदारींमुळे टाटा प्रोजेक्ट्सला बांधकामात पर्यावरणपूरकतेला चालना देता येईल आणि आपल्या प्रकल्पांचे कार्बन फूटप्रिंट कमी करता येईल.

नवभारताची उभारणी: गुजरातेतील मायक्रॉन सेमीकंडक्टर युनिट, चेन्नई मेट्रो लाईन आणि तामिळनाडूतील टाटा पॉवर सोलर प्लांट यांनी संपादन केलेले यश नवभारताच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञान उन्नती घडवून आणण्याची टाटा प्रोजेक्ट्सची बांधिलकी दर्शवते. हे आणि नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टसारखे इतर अनेक प्रकल्प त्यांचे गुंतागुंतीचे स्वरूप आणि प्रोजेक्ट डिलिव्हरीचे मर्यादित वेळेचे शेड्युल या बाबी एकीकृत प्रकल्प ठरलेल्या किमतीत आणि वेळेत पूर्ण करून देण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये आमच्या ग्राहकांनी दर्शविलेला विश्वास दाखवून देतात.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करून यशस्वीपणे सुपूर्द करण्यात आले. यामध्ये नवीन संसद भवन, अटल सेतू (एमटीएचएल), फर्स्ट सोलर आयएनसीसाठी सोलर मॅन्युफॅक्चरिंग युनिट, डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरचे अनेक शेकडो किलोमीटरचे बांधकाम आणि इसरोसाठी ट्रायसॉनिक विंड टनेल यांचा समावेश आहे. अशाप्रकारे टाटा प्रोजेक्ट्स नवभारताची उभारणी करण्यात मोलाचा हातभार लावत आहे.

मिआ बाय तनिष्कने अक्षय तृतीयेसाठी लॉन्च केले ‘ग्लो विथ फ्लो’ कलेक्शन

रकुल प्रीत सिंगचा प्रमोशनमध्ये सहभाग

मिआ बाय तनिष्कच्या ट्रेंडी दागिन्यांसह निसर्गाच्या नाजूक सौंदर्यामध्ये हरवून जा

मुंबई-अक्षय तृतीया जवळ येत आहे आणि या निमित्ताने भारतातील सर्वात ट्रेंडी फाईन ज्वेलरी ब्रँड्सपैकी एकमिआ बाय तनिष्कने सादर केले आहे आपले नवे कलेक्शन ‘ग्लो विथ फ्लो‘. मिआचे हे नवे कलेक्शन निसर्गाच्या नाजूक सौंदर्यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहेही डिझाइन्स नदीच्या प्रवाहासारखी आहेतआशीर्वादनवी सुरुवात आणि समृद्धी दर्शवतातहे कलेक्शन आयुष्यातील अमर्याद संभावनांचा सन्मान करते आणि अक्षय समृद्धीचे सार दर्शवते.

हवेच्या सौम्य लहरी आणि नदीच्या प्रवाहातील लय यांनी प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या ‘ग्लो विथ फ्लो‘ कलेक्शनमधील प्रत्येक दागिना जीवनाच्या प्रवाहातील सद्भावनेचे प्रतीक आहे२०० पेक्षा जास्त डिझाइन्ससह १४ आणि १८ कॅरेटचे सोने  चमचमत्या हिऱ्यांचे दागिने आधुनिकसुबक आणि ट्रेंडी आहेतकोणत्याही प्रसंगी सहजपणे स्टाईल करता यावेत यादृष्टीने डिझाईन करण्यात आले आहेतयामध्ये स्टड्सअंगठ्याबांगड्याझुमकेइयर कफपेंडंट आणि नेकवेयर सेट्स देखील आहेतमिआने अक्षय तृतीयेसाठी विशेष ऑफर प्रस्तुत केल्या आहेतयामध्ये ग्राहकांना ५००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या उत्पादनांवर  खरेदीवर %* ची सूट खरेदीवर १०%* सूट आणि  खरेदीवर १५%* सूट मिळू शकतेसोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर सरसकट १०ची सूट दिली जात आहेयाशिवाय ७५००० रुपयांपेक्षा जास्त बिलावर ग्राहकांना सरसकट १५सूट* मिळेलतनिष्कच्या सर्व रिटेल आउटलेट्स आणि ऑनलाईन चॅनेल्सवर  ते १२ मे २०२४ पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल.

हवा आणि पाण्याच्या लहरींमधील सौंदर्य ल्यायलेली ही शानदार डिझाइन्स असीम क्षमता दर्शवतातयामध्ये केशी मोत्यांनी सजलेले दागिने आहेतमनमोहक चमक आणि आकर्षक डिझाइन्समध्ये जडवण्यात आलेले हिरे प्रसिद्ध आहेतया कलेक्शनची प्रेरणा प्रतिबिंबित करणारेस्लायडिंग पर्ल असलेले दागिने या कलेक्शनच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहेतझऱ्यांची आठवण करून देणाऱ्या कानातल्यांपासून पानांमधून वाहणाऱ्या मंद हवेची शीळ ऐकवणाऱ्या नाजूक बांगड्या आणि चमकदार पिवळ्या सोन्यापासून बनवलेल्या अंगठ्या आनंदाने भरलेल्या जीवनाची प्रतीके आहेतकलेक्शनमधील प्रत्येक दागिना उत्साहपूर्ण स्वप्ने  जीवनातील अमर्याद क्षमता दर्शवतो.

मिआच्या दुनियेत तुमचे स्वागत आहेयाठिकाणी प्रत्येक दागिना आनंद आणि सौंदर्याची कथा सांगतोलग्नासारख्या शुभ प्रसंगी भेट म्हणून देण्यासाठी हे दागिने उत्तम आहेतएखाद्या महत्त्वाच्या यशाचा आनंद साजरा करणे असो किंवा ही अक्षय तृतीया संस्मरणीय बनावी अशी इच्छा असोमिआचे दागिने तुमच्या भावना दर्शवतात.

कलेक्शनबद्दल मिआ बाय तनिष्कच्या बिझनेस हेड श्रीमती श्यामला रमणन यांनी सांगितलेयंदाच्या अक्षय तृतीयेला मिआचे ‘ग्लो विथ फ्लो‘ कलेक्शन लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ‘ग्लो विथ फ्लो‘ चे दागिने खास इनहाऊस डिझाईन करण्यात आले आहेतहे दागिने नदीचा प्रवाहा आणि त्याच्या विविध मूड्सपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहेत – जिवंतशांतलयबद्ध नदी जिथे वाहते तिथे जीवन आणि समृद्धीचा संचार होतो.

हिरे पाण्यावर सूर्याची चमक आणि केशी मोती पाण्यावर चांदण्याची चमक दर्शवतातप्रत्येक डिझाईन आधुनिक आणि कालातीत आहेथोडे थांबूनआत्मविश्वासासह जीवनाची वाटचाल आशा  आत्मविश्वासाने पुढे नेण्याची आठवण करून देतात.

मिआच्या टीमकडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.”

ग्लो विथ फ्लो‘ हे केवळ दागिन्यांचे कलेक्शन नाही तर उत्साही स्वप्ने  जीवनातील विपुल संधींचा आनंद आहेप्रत्येक दागिना व्यक्तीचा आंतरिक प्रकाश दर्शवतो.

यामिआच्या ‘ग्लो विथ फ्लो‘ कलेक्शनसह जीवनातील अंतहीन प्रवाहातील जादूचा आनंद घ्यासर्व मिआ स्टोर्सनिवडक तनिष्क स्टोर्स आणि मिआची होमसाईट https://www.miabytanishq.com/  ऍप्लिकेशनसहित अनेक ऑनलाईन चॅनेल्सवर हे कलेक्शन उपलब्ध आहे.

प्रत्येक राइड एक उत्सव, प्रत्येक राइड साजरी करा!

महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी 150 हून अधिक जावा येझदी वापरकर्त्यांची राईड

पुणे, 2 मे 2024 : पारंपारिक महाराष्ट्रीय पोशाखात सजलेल्या 150 हून अधिक जावा येझदी वापरकर्त्यांनी वाकड येथील जावा येझदी मोटरसायकल डीलरशीप ते पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा असा प्रतिकात्मक प्रवास केला. या कार्यक्रमाने ब्रँडच्या समृद्ध कम्युनिटी कार्यक्रमावर प्रकाश टाकला गेला, जो भारतातील दुचाकीवरील सांस्कृतीचा एक भाग आहे. 

महाराष्ट्र दिन दिवस साजरा होत असताना, जावा आणि येझदी मोटारसायकल मालकांच्या ताफ्याने भव्य शनिवार वाडा येथे आपला प्रवास संपवण्यापूर्वी औंध, शिवाजी नगर आणि एफसी रोडसह पुण्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यांमधून वाहन चालवताना एक आकर्षक देखावा निर्माण केला. या राइडने केवळ महाराष्ट्राच्या भावनेचा गौरव केला नाही तर ब्रँडला त्याच्या जावा येझदी समुदायाशी जोडण्याचा एक अर्थपूर्ण मार्ग म्हणूनही काम केले.

या सेलिब्रेशन व्यतिरिक्त, जावा येझदी मोटरसायकल भारतभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि ब्रँड-नेतृत्वातील रायडिंग उपक्रमांना समर्थन देत आहे, ज्यात कोवेलॉन्ग सर्फिंग फेस्टिव्हल, महिंद्रा iRock म्युझिक फेस्टिव्हल, बाइकर ब्रूस्केप आणि इतर अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. मोटारसायकल आणि सांस्कृतिक शोधासाठी उत्साही असणाऱ्या समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी जावा येझदी मोटरसायकल कटिबद्ध राहिल्यामुळे राइडिंग प्रेमी आणि संस्कृतीप्रेमी अधिक आकर्षक आणि उत्साही अनुभवांची अपेक्षा करू शकतात.

शरयू, सानिका, अरुंधती उपांत्यपूर्व फेरीत

सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने एसबीए कप सुपर – ५०० बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : शरयू रांजणे, सानिका बागळे, अरुंधती कंवर यांनी सुधांशू बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि पीडीएमबीएच्या सहकार्याने आयोजित योनेक्स-सनराईझ एसबीए कप जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या तिसऱ्या फेरीत शरयू रांजणेने समनव्या धनंजयवर २१-६,२१-६ असा, सानिकाने शिवानी मासळेकरवर १४-२१,२१-१३,२१-१६ असा विजय मिळवला. यानंतर अरुंधतीने आयुषी काळेवर २१-९, २१-१७ असा सहज विजय मिळवला. सानवी पाटीलने अपूर्वा घोळवेचे आव्हान २२-२०, १५-२१, २१-१३ असे परतवून लावले. शर्वरी सुरवसेने सई जोशीचा २१-८, २१-१६ असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

 या स्पर्धेतील १७ वर्षांखालील दुस-या फेरीत पार्थ झालवडिया याने अमेय जोशीवर २१-१९, २१-१५ अशी मात केली. यानंतर दुसऱ्या मानांकित ओजसने आर्यन टोरोवर २१-१०, २१-६ असा सहज विजय मिळवला.

निकाल – ११ वर्षांखालील मुले – दुसरी फेरी – वरद आठल्ये वि. वि. तनिष अनपट २१-१४, २१-१३, वेदांत मोरे वि. वि. लक्ष्य सिन्हा २१-५, २१-११, कृष्णा सावंत वि. वि. २१-९, २१-३, ईशान रॉय वि. वि. कबीर तांबे ११-२१, २१-१४, २१-१५, अमन वर्मा वि. वि. अर्निश काटोरे २१-९, २१-२.

११ वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – दिविशा सिंग वि. वि. ओवी वायळ २१-३, २१-१०, तेजस्वी दरेकर वि. वि. स्वरा कुलकर्णी २१-८, २१-१०, राजलक्ष्मी थेउरकर वि. वि. अन्वी कुलकर्णी २१-१८, २०-२२, २१-१३, पूर्वा हांडे वि. वि. स्वरा पांडे २१-१२, १८-२१, २१-१२, अग्रिमा राणा वि. वि. शुभ्रा मासळेकर २१-३, २१-५, निधी गायकवाड वि. वि. केयारा साखरे २१-८, २१-१५, वल्लरी वाटणे वि. वि. शनया राजवाडे २१-१०, २१-१३.

१५ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – विराज सराफ वि. वि. अद्वय यार्डी २१-९, २१-८, विहान कोल्हाडे वि. वि. विघ्नेश सुतार २१-१४, २१-१५, आरुष सापळे वि. वि. सौरिष काने २१-११, २१-१९, जतिन सराफ वि. वि. आदित्य पोतनिस २१-८, २१-१५, तनिष्क अडे वि. वि. शिवेंद्र पवार २१-४, २१-०, रोहन सायनकर वि. वि. अतिक्ष अगरवाल २१-१०, १६-२१, २१-१५, अयांश यारगट्टी वि. वि. नयन भामरे २१-१५, २१-१७, अजिंत्य जोशी वि. वि. दिव्यान कौशिक २१-११, २१-११, चिन्मय फणसे वि. वि. जयंत झाडे २१-९, २१-१५, अनय एकबोटे वि. वि. प्रथमेश जगदाळे २१-१६, २१-१२, अक्षर झोपे वि. वि. अर्णव राणे २१-८, २१-११, आरुष अरोरा वि. वि. महिराज सिंग राणा २०-२२, २१-१९, २१-१२, ध्रुव बर्वे वि. वि. अक्षित तरडलकर २१-८, २१-७, समीहन देशपांडे वि. वि. सिद्धार्थ पनिस्कर २१-१८, १८-२१, २१-१४.

१९ वर्षांखालील मुली – पहिली फेरी – संस्कृती जोशी वि. वि. हृदया साळवी २१-१०, २१-१२, यशस्वी काळे वि. वि. खुशी सोमवंशी २१-४, २१-१, जिया उत्तेकर वि. वि. नेहा गाडगीळ २१-७, २१-५, राधा गाडगीळ वि. वि. शांभवी कुरळे २१-४, २१-१, पीयूषा फडके वि. वि. मिताली इंगळे २१-१९, २१-१४, सिया बेहेडे वि. वि. अनुष्का जयस्वाल २१-६, २१-१६, सायुरी थोकल वि. वि. रिया गाडगीळ २१-८, २१-८.

पुणे मर्चंटस बँकेची कोंढवे धावडे येथे १४ वी शाखा: ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुणे मर्चंटस को- ऑप बँक लि. च्या १४ व्या शाखेचे उद्घाटन एनडीए खडकवासला येथील कोंढवे धावडे येथे ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते झाले. बँकेने नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केले असून उपनगरातील शाखा विस्तारातील हा महत्वाचा टप्पा आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष ऍड. सुधीर शेळके, यांसह बँकेचे सर्व संचालक देखील उपस्थित होते.

रामदास फुटाणे म्हणाले, युवा पिढीला भविष्यामध्ये नोकरी मिळणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे त्यांना उद्योजकतेची कास धरावी लागले. त्यासाठी समाजातून युवकांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. कर्ज योजनांच्या माध्यमातून अशा युवक-युवतींच्या पाठीमागे आपण बँक म्हणून भक्कमपणे उभे रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दीपक मानकर म्हणाले, सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्याचे काम सहकारी बँकांच्या माध्यमातून केला जात आहे. प्रकाश ढेरे यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बँकेला जनमानसात पोहोचविले. कोंढवे धावडे या भागात अनेक गरीब कुटुंब आहेत, त्यामुळे बँकेने नवीन शाखेच्या माध्यमातून त्यांच्या मुलांकरिता मदतीचा हात देणाऱ्या योजना सुरु कराव्यात.

विजय ढेरे म्हणाले, बँकेने नुकतेच १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेची ही १४ वी शाखा असून २४६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेला अ वर्ग ऑडिट दर्जा असून सर्वार्थाने बँकेचा कारभार पारदर्शीपणे सुरु आहे. त्यामुळे कोंढवे धावडे भागातील रहिवाशांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज-पात्र मतदारांनी या राष्ट्रीय पर्वामध्ये सहभागी होऊन मतदान करावे- कविता द्विवेदी

बारामती, दि. ३: बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या राष्ट्रीय पर्वामध्ये सहभागी होऊन मतदान करावे; आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी केले आहे.

श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघाकरीता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ असून यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्राची माहिती शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच याच संकेतस्थळावर असलेले क्युआर कोड स्कॅन करुन मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. येत्या ७ मे रोजी मतदान प्रक्रियेदरम्यान सहकार्य करावे.

मतदारसंघनिहाय मतदार ओळख चिठ्ठीचे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी वाटप करण्यात येत आहे. सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात मतदार मदत कक्ष सुरु करण्यात आले आहे तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयनिहाय मतदान केंद्राविषयी विषयी माहिती देणारे क्युआर कोड तयार करण्यात आले आहे. सदरचे क्युआर कोड गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चिकटविण्यात येणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता गृहनिर्माण सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सदस्य सचिवांनी मतदारांना प्रोत्साहित करुन सहकार्य करावे, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती द्विवेदी यांनी केले आहे.
0000

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारेंसह पायलट सुखरुप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना महाड येथे घेण्यास आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. केवळ पायलटच त्यामध्ये होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप समजले नाही.आज सकाळी 9.30 च्या सुमारास सुषमा अंधारे महाड येथून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. पण अचानक हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना कोसळले. यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.सुषमा अंधारे या महायुतीच्या स्टार प्रचारक आहेत. महाड येथून त्या बारामती येथे हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. हेलिकॉप्टर हे साधारण सकाळी 9 च्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते. खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे पंखा तसेच इतर महत्वाच्या भागांचे तुकडे झाले.

बारामती विधानसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण-कविता द्विवेदी

बारामती, दि. २: बारामती लोकसभा मतदासंघाकरीता येत्या ७ मे रोजी निवडणूक होणार असून मतदारसंघातील सर्व मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारसंघात आतापर्यंत एकूण १७ लाख १० हजार ८४५ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती विधानसभा मतदारंसघात एकूण ३८० मतदान केंद्रावर ३ लाख ६९ हजार २१७ मतदार ओळख चिठ्ठीपैकी २ लाख ८७ हजार २७७ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ३८० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे

पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ४२१ मतदार केंद्रावर ४ लाख २९ हजार ३५१ मतदार ओळख चिठ्ठींपैकी २ लाख ५१ हजार ४७१ मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे. याकरीता एकूण ५६५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

इंदापूर विधानसभा मतदारंसघात एकूण ३३० मतदान केंद्रावर आज रोजीपर्यंत ३ लाख २३ हजार ५४१ मतदार ओळख चिठ्ठीपैकी २ लाख १५ हजार ७६२ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ३३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दौंड विधानसभा मतदारंसघात एकूण ३०९ मतदान केंद्रावर आज रोजीपर्यंत ३ लाख ४ हजार ६०७ मतदार ओळख चिठ्ठींपैकी २ लाख ६७ हजार ४२३ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ३०९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

भोर विधानसभा मतदारंसघात एकूण ५६१ मतदान केंद्रावर ४ लाख ७ हजार ९२१ मतदार ओळख चिठ्ठींपैकी ३ लाख ६५ हजार १७१ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ५६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारंसघात एकूण ४६५ मतदान केंद्रावर ५ लाख ३८ हजार ३१ मतदार ओळख चिठ्ठींपैकी ३ लाख २३ हजार ७४१ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ५१५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय मतदार ओळख चिठ्ठी वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच ते काम पूर्ण करण्यात येईल. मतदार ओळख चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत असून मतदारांनी याकामी आपल्या दारापर्यंत येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती द्विवेदी यांनी केले आहे.

सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र कचरे यांनी हिंजवडी येथे साधला नागरिकांशी संवाद

भोर विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते आज हिंजवडी येथील ब्ल्यु रिड्ज गृहनिर्माण सोसायटी येथील मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. परिसरातील नागरिकांशी संवाद साधून निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. तसेच येत्या ७ मे रोजी मतदान करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांचे नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे, दि.२: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, यासाठीचे सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.

लोकसभा निवडणूकीच्या तयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

शहरात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण भागात आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती यांची मदत घ्यावी. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील आणि ओआरएसचा साठा पुरेशा प्रमाणात राहील याचे नियोजन करावे. मोठ्या रांगा असतील तर वयस्कर मतदारांना खुर्च्या किंवा बाकाची व्यवस्था करावी. मतदाराला उन्हाचा त्रास झाल्यास त्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. दिव्यांग, महिला आणि वयोवृद्ध मतदारांसाठीदेखील अशी व्यवस्था असावी.

शहरी भागातील गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात यावे. शहरी भागातील कमी मतदान केंद्र परिसरात मतदार चिठ्ठी वाटपावर विशेष लक्ष द्यावे. उपनिबंधक सहकारी संस्थांच्या सहकार्याने संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांची मदत घेण्यात यावी. महिला, युवा, दिव्यांग, आदर्श मतदान केंद्रासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मदतीसाठी आवश्यक तेथे स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. शहरी भागात मतदार सहाय्यता केंद्राद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा सूचना डॉ.दिवसे यांनी दिल्या.

यावेळी ईव्हीएम यंत्राची तयारी, टपाली मतदान, वयोवृद्धांसाठी घरून मतदान, मतदानाच्या दिवशीची तयारी आदीं विषयांचा आढावा घेण्यात आला.