Home Blog Page 1063

तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान; २३ हजार ०३६  मतदान केंद्र

  • सुमारे २ कोटी ९ लाखांपेक्षा जास्त मतदार; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
  • उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा
  • दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सरासरी ६२.७१ टक्के मतदान

मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात बुलढाणाअकोला, अमरावतीवर्धायवतमाळवाशिमहिंगोलीनांदेडपरभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्पात एकूण सरासरी 62.71 टक्के मतदान झाले.

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02, पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  यासाठी एकूण २३ हजार ०३६  मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ०९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४६,४९१ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,०३६ आणि २३,०३६ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून तिसऱ्या टप्प्यात एकूण २५८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. मात्र मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची  मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरु राहील. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून घरोघरी वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या असून इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करत आपला मतदानाचा महत्वपूर्ण हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही  रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 1 मे पर्यंत 50,397 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1,110 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,595  इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,11,878 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.    राज्यामध्ये दि. 1 मार्च ते  २ मे  2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 49.95  कोटी रोख रक्कम तर 36.80 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 129.89 कोटी रुपये, ड्रग्ज 220.65 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ९२.९२ कोटी रुपये अशा एकूण ५३०.६९ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

३३,४६१ तक्रारी निकाली

16 मार्च ते 2 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ४३४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ४३३३ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ३४,१६८ तक्रारीपैकी ३३,४६१ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे २०५ प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने २०५ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्या टक्केवारी

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरूष मतदारमतदान केलेले पुरूष मतदारमहिला मतदारमतदान केलेल्या महिला मतदारतृतीयपंथी मतदारमतदान केलेले तृतीयपंथी मतदारएकूण मतदार टक्केवारी
105- बुलढाणा933173603525(64.67%)849503502226(59.12%)2410(41.67%)62.03%
206 – अकोला977500 634116(64.87%)913269 534239(58.50%)4511(24.44%)61.79% 
307- अमरावती944213 631920(66.93%)891780537183(60.24%)8518(21.18%)63.67% 
408- वर्धा858439 586780(68.35%)824318 504560(61.21%)14 9(64.29%)64.85% 
514- यवतमाळ – वाशिम1002400 655658(65.41%)938452 564508(60.15%)64 23(35.94%)62.87% 
615 – हिंगोली946674 628302(66.37%)871035 526647(60.46%)25 9(36.00%)63.54% 
716 -नांदेड955084 606482(63.50%)896617 522062(58.23%)142 20(14.08%)60.94% 
817 -परभणी1103891 717617(65.01%)1019132 604247(59.29%)33 4(12.12%)62.26% 

तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02 आणि पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.   त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नावमतदान केंद्रेक्रिटिकल मतदान केंद्रनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्याबॅलेट युनिट (बीयु)कंट्रोल युनिट(सीयु)व्हीव्हीपॅट
132-रायगड21850613218521852185
235-बारामती25160338754825162516
340-धाराशीव(उस्मानाबाद)21390831427821392139
441-लातूर21251628425021252125
542-सोलापुर19681421393619681968
643-माढा20301632609020302030
744-सांगली18300620366018301830
845-सातारा23154016463023152315
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग19420009194219421942
1047-कोल्हापुर21560323431221562156
1148-हातकणंगले18300227366018301830
एकूण23036114258464912303623,036
  1. मतदारांची संख्या
अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुण85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12अर्जांची संख्या.
132-रायगड8,20,6058,47,763416,68,3723,146
235-बारामती12,41,94511,30,60711623,72,668431
340-धाराशीव (उस्मानाबाद)10,52,0969,40,5608119,92,7374,588
441-लातूर10,35,3769,41,6056119,77,0422,566
542-सोलापुर10,41,4709,88,45019920,30,1192,052
643-माढा10,35,6789,55,7067019,91,4542,346
744-सांगली9,53,0249,15,02612418,68,1741,859
845-सातारा9,59,0179,30,6477618,89,7401,272
946-रत्नागिरी-सिंधुदुर्ग7,14,9457,36,6731214,51,630 3,726
1047-कोल्हापुर9,84,7349,51,5789119,36,4033,103
1148-हातकणंगले9,25,8518,88,3319518,14,2771,122
एकूण  1,07,64,741  1,02,26,9469292,09,92,61626,211

चौथ्या टप्पा :-

चौथ्या टप्प्यात 01 नंदुरबार, 03 जळगाव, 04 रावेर, 18 जालना, 19 औरंगाबाद, 33 मावळ, 34 पुणे, 36 शिरूर, 37 अहमदनगर, 38 शिर्डी, 39 बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 29.04.2024 असा होता. त्यानुसार अंतिम उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नावअंतिम उमेदवारांची  संख्या
101 नंदुरबार11
203 जळगाव14
304 रावेर24
418 जालना26
519 औरंगाबाद37
633 मावळ33
734 पुणे35
836 शिरूर32
937 अहमदनगर25
1038 शिर्डी20
1139 बीड41
एकूण298

चौथ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा अंतिम तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नावपुरुष मतदारमहिला मतदारतृतीयपंथी मतदारएकुणमतदान केंद्रे
101 नंदुरबार9,92,9719,77,3292719,70,3272,115
203 जळगाव10,37,3509,56,6118519,94,0461,982
304 रावेर9,41,7328,79,9645418,21,7501,904
418 जालना10,34,1069,33,4165219,67,5742,061
519 औरंगाबाद10,77,8099,81,77312820,59,7102,040
633 मावळ13,49,18412,35,66117325,85,0182,566
734 पुणे10,57,87010,03,08232420,61,2762,018
836 शिरूर13,36,82012,02,67920325,39,7022,509
937 अहमदनगर10,32,9469,48,80111919,81,8662,026
1038 शिर्डी8,64,5738,12,6847816,77,3351,708
1139 बीड11,34,28410,08,2342921,42,5472,355
एकूण1,18,59,6451,09,40,2341,2722,28,01,15123,284

मतदारांचा तुलनात्मक तपशील :- चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.मतदार संघाचे नाव2014 मधील मतदार संख्या2019 मधील मतदार संख्या2024 मधील मतदार संख्या
101 नंदुरबार16,72,94318,71,09919,70,327
203 जळगाव17,07,96919,31,40019,94,046
304 रावेर15,93,38917,75,05118,21,750
418 जालना16,12,05618,67,22019,67,574
519 औरंगाबाद15,89,39518,86,28420,59,710
633 मावळ19,53,74122,98,08025,85,018
734 पुणे18,35,83520,75,82420,61,276
836 शिरूर18,24,11221,75,52925,39,702
937 अहमदनगर17,05,00518,61,39619,81,866
1038 शिर्डी14,62,26715,87,07916,77,335
1139 बीड17,92,65220,45,40521,42,547

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्रमतदार संघाचे नाव18-1920-2930-3940-4950-5960-6970-7980 +
101 नंदुरबार33,1954,44,3184,42,5544,12,8722,99,4401,97,11898,70842,122
203 जळगाव28,1733,85,4124,48,9214,53,7363,13,0222,03,4521,09,82851,502
304 रावेर29,1693,64,7314,11,6263,87,1642,87,2841,91,7121,01,82548,239
418 जालना29,7904,17,7824,80,2254,12,3522,86,0201,80,3001,00,86060,245
519 औरंगाबाद34,0754,19,4325,11,4704,39,8433,20,6501,81,68498,50954,047
633 मावळ35,3314,53,8496,68,2355,84,8424,01,4392,54,5031,28,91957,900
734 पुणे21,9512,80,2534,63,8454,74,0383,54,1802,40,1691,49,66377,177
836 शिरूर32,0814,52,0256,67,0125,74,1663,75,3162,36,4201,34,24468,438
937 अहमदनगर27,5363,67,6094,24,4284,19,6203,16,9092,20,4501,33,39371,921
1038 शिर्डी25,303 3,36,8883,69,1363,53,4202,70,9051,76,56196,85848,264
1139 बीड25,0114,30,5725,06,9354,52,5863,15,7252,09,8831,28,14473,691
          एकूण3,21,61543,52,87153,94,38749,64,63935,40,89022,92,25212,80,9516,53,546

 पाचवा टप्पा:-     लोकसभा निवडणूकीचा पाचव्या टप्प्याबाबतची माहिती :- पाचव्या टप्प्यात नाशिक  विभागातील 03 आणि कोकण विभागातील 10 अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20.05.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरुदिनांक 26.04.2024
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांकदिनांक 03.05.2024
नामनिर्देशन पत्र छाननी करण्याचा दिनांकदिनांक 04.05.2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांकदिनांक 06.05.2024
मतदानाचा दिवसदिनांक 20.05.2024
  1. पाचव्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघात दि.02.05.2024 पर्यंत खालीलप्रमाणे उमेदवार व त्यांची नामनिर्देशने प्राप्त झालेली आहेत.
अ.क्र.मतदार संघाचे नावउमेदवारांची  संख्यानामनिर्देशनाची संख्या
102 धुळे1013
220 दिंडोरी0916
321 नाशिक1827
422 पालघर1113
523भिंवडी1516
624 कल्याण1523
725 ठाणे1417
826 मुंबई उत्तर1118
927 मुंबई उत्तर – पश्चिम1516
1028 मुंबई उत्तर – पूर्व2024
1129 मुंबई उत्तर – मध्य1314
1230 मुंबई दक्षिण – मध्य1419
1331 मुंबई दक्षिण0813
एकूण173229

००००

एस.चोक्कलिंगम यांची रायगड जिल्हा माध्यम कक्षास भेट

रायगड :निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून विविध माध्यमाने समन्वय राखताना माध्यम कक्षाने सतर्कतेने भूमिका पूर्ण करावी असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयात कार्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत श्री. चोकलिंगम यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहित दिली.

माध्यम कक्षात सुमारे 8 दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्री चोकलिंगम यांनी सीव्हिजील कक्षालाही भेट देऊन नागरिकांच्या तक्ररी संदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,   उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी होते.

ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थीनीसेरा चावला ला राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत रौप्य पदक

पुणे, दि. ३  मे  : नियतीने जरी आपल्याशी खेळ खेळला असला तरी स्वतःच्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या ताकदीवर स्वतःला सिद्ध करत एक हाती यश कसे खेचून आणता येते. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुण्यातील सुस रोड येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थी दिव्यांग जलतरणपट्टू सेरा चावला हिने जिल्हास्तरावर नावलौकिक मिळवला आहे. या जलतरणपटूचा प्रेरणादायी प्रवास अतिशय खडतर असला तरी इच्छाशक्तीच्या जोरावर तिने त्यावर मात केली आहे. जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जिल्हास्तरावर नाव कमावलं आहे.
मेक माय ड्रीम्स फाउंडेशनच्या वतीने डेक्कन जिमखाना टिळक जलतरण तलाव येथे दिव्यांगांसाठी नुकतीच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये विद्यार्थीनी सेरा चावला हिने दोन रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या यशाबद्दल स्कूलचे संचालक यश मालपणाी, मुख्याध्यापिका संगीता राऊतजी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सेरा चावला आपल्या यशाचे श्रेय पालकांबरोबरच स्कूलचे संचालक यश मालपाणी, संगीता राऊतजी, प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रूपाली अनप आणि केशव हजारे यांना देते.
ही स्पर्धा पुणे जिल्ह्यात घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातून जवळपास शेकडो स्पर्धक आले होते. दिव्यांगासाठी ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर अशा तीन गटात केले होते. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, आयएम अशा पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेते खेळाडू जिल्ह्यास्तरीय प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेचा जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना फायदा होईल. सामान्य खेळाडू प्रमाणेच दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यांचे आयोजन केले होते.

डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या “झुळूक”ला महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड शाखेचा पुरस्कार प्रदान

पुणे, ३ मे २०२४ : मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, शिवाजीनगर पुणेचे प्राचार्य. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या “झुळूक” या काव्यसंग्रहाला  महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड शाखेचा अपर्णा मोहिले स्मृती लक्ष्यवेधी वांग्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद, चिंचवड आयोजित निगडी येथील शांता शेळके सभागृहात मसाप च्या राज्यस्तरीय वांग्मय पुरस्कार – २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महाराष्ट्र  साहित्य परिषद चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे, रजनी शेठ आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांचे आजपर्यंत “फुलोरा, ओंजळ, गुंफण, झुळूक आणि बहर” हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्या काव्यसंग्रहांना महाराष्ट्रातील नामांकित साहित्य संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मानसिक आरोग्य आणि कवितेतून आत्मानंद देणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. “झुळूक” या काव्यसंग्रहाचे प्रकाशक आणि साहित्यविश्व प्रकाशनाचे प्रमुख विक्रम मालनआप्पा शिंदे यांनी याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व लोकोपयोगी चांगल्या साहित्य लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेच्या महामेळाव्यात हजारो महिलांचा महासंकल्प..!!

पुणे: शिवसेना महिला आघाडीच्या भव्य जिल्हास्तरीय महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन काल हडपसर मधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान येथे केले होते. पुणे जिल्ह्यातील लोकसभा महायुतीचे अधिकृत चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विधान परिषदेच्या उपसभापती,शिवसेना नेत्या डॉ.नीलमताई गोऱ्हे अध्यक्षस्थानी होत्या. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या हजारो शिवसैनिक महिला पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचा राजकीय व समाजिक सहभाग वाढविणे गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल अधिक जाणकार होण्यासाठी समाज माध्यम व तंत्रज्ञानाचा शिकाऊ वृत्तीने वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून महिला आपले प्रश्न व समस्या अशा व यासारख्या मध्यवर्ती मेळाव्यात मांडू शकतील असे आवाहन नीलमताईंनी महिलांशी संवाद साधताना केले.

महिला सक्षमीकरणाचे महायुतीच सरकारचे धोरण असून राज्यातील महिला बचत गटांना एकनाथ शिंदे साहेबांनी दुप्पट अर्थ साहाय्य मंजूर केल्याचे यावेळी नमूद केले

यावेळी शैला पाचपुते, कांताताई पांढरे, सीमा कल्याणकर,गीतांजली ढोणे, सुदर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार, श्रद्धा शिंदे, श्रुती नाझीरकर, चैत्राली गुरव, सुनीता उकिरडे आणि नेहा शिंदे, सुरेखा शिंदे,हेमांगी बांदल, स्मिता साबळे, अयोध्या आंधळे, सुनीता उकिरडे, राजश्री माने, निशिगंधा माने, प्रतिमा बोबडे, ज्योती अभांगे, पल्लवी ढाके या पुणे जिल्हा व शहर महिला पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होत्या.

हे तर लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी….

डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा.

शिरुर – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या दोघांनीही एकमेकांना आवाहन दिले आहे. माजी खासदार केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. त्यांनी ७० पेक्षा अधिक प्रश्न संसदेत आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी विचारले असल्याचा आरोप डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ओतूर येथील भाषणात केला होता. त्यावर आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हे यांना आवाहन दिले होते की, पुरावे द्यावेत मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो, अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडावं.

यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील आढळराव पाटील यांचे आवाहन स्वीकारत मी पुरावे घेऊन येतोय निवडणुकीतुन माघार घेण्याची तयारी करा असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर आज (दि.०३) रोजी शिरुर तालुक्यात मतदारांशी संवाद साधत असताना डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचे नाव न घेता लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी म्हणून उल्लेख करत आढळराव यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.

एवढ्यावरच न थांबता डॉ. कोल्हे यांनी शब्दाला माणूस पक्का असेल तर मघारीची तयारी ठेवावी असा सल्लाही आढळराव पाटील यांना दिला. पुढे डॉ. कोल्हे म्हणाले की, मी कोणाच्या व्यवसायावर बोलत नाही परंतु मला नटसम्राट आणि यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची. मतदारसंघात आल्यावर सांगतात मी तुमच्यासाठी काम करतो मात्र दिल्लीत गेल्यावर स्वतःच्या कंपनीचा कसा नफा होईल यासाठी प्रयत्न करायचा हे काम माजी खासदार करत होते असं मत यावेळी डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार अशोक पवार, विश्वास ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, पोपट शेलार, संभाजी फराटे, दत्तात्रय फराटे, शंकर फराटे, सुभाष कळसकर, संजय देशमुख, जीवन तांबे, शरद निंबाळकर, राहुल करपे, गोरक्ष गदाडे, मच्छिन्द्र गदादे यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. ३: मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत ७ मे रोजी बारामती आणि १३ मे रोजी मावळ, पुणे आणि शिरूर या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण करण्यात येत आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्र सोबत न्यावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आपल्या मतदान केंद्राविषयी जाणून घ्या
मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत कोथरूड, शिवाजी नगर, वडगाव शेरी, कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टॉन्मेंट मतदारसंघ आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा आणि खडकवासला मतदारसंघाचा समावेश होतो. शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे.

लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता नागरिकांनी मतदानापूर्वी आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी. जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यादृष्टीने मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र स्थापित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ॲपद्वारेही ही माहिती मिळू शकेल. मतदारांना वितरीत करण्यात येणाऱ्या मतदार माहिती चिठ्ठीद्वारेदेखील कुठे मतदान करावयाचे आहे ते कळू शकेल.

मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्ष स्थापन

पुणे, दि. ३: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे यासाठी पुणे शहरात वॉर्डनिहाय मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

मतदार सहायता कक्षाचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. औंध बाणेर 020-29912679, ढोले पाटील रोड 020-29995164, विश्रामबाग वाडा 020-29950782, भवानी पेठ 020-29950749, घोले रोड 020-29950672, कर्वे नगर 020-29900101, कोंढवा 9373949573, वानवडी 020-29980508, येरवडा 020-29913010, हडपसर 020-29980410, सिंहगड रोड 020-29950768, नगर रोड 020-29913491, बिबवेवाडी 020-29950752, धनकवडी 020-29950746, कोथरुड 020-29950838.

सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यत ही सेवा उपलब्ध असून नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

पुणे शहरातील १३ दुय्यम निबंधक कार्यालये ६ व ७ मे रोजी बंद

पुणे, दि. ३: जिल्ह्यामधील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत ७ मे २०२४ रोजी मतदान होणार असून या निवडणूकीसाठी सह जिल्हा निबंधक पुणे शहर या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या हवेली क्र.-२, ३, ४, ५, ८, ९, १२, १३, १६, १८, २०, २१ व २४ या कार्यालयांमधील दुय्यम निबंधकांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे ६ व ७ मे रोजी सदरची कार्यालये दस्त नोंदणीसाठी बंद राहतील. तसेच शहरातील इतर सर्व कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरु राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली आहे.

सोनिया-प्रियांका सोबत जाऊन राहुल गांधींनी रायबरेलीतून दाखल केला उमेदवारी अर्ज

अमेठी–राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्यासोबत सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी, मेहुणे रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते. किशोरीलाल शर्मा यांनीही अमेठीतून उमेदवारी दाखल केली आहे.

उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने रायबरेलीमधून राहुल आणि अमेठीतून किशोरी लाल यांच्या नावाची घोषणा केली. किशोरीलाल सोनिया गांधींचे विश्वासू मानले जातात.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता राहुल आपल्या कुटुंबासह दिल्लीहून रायबरेलीला रवाना झाले. 10.30 वाजता अमेठी-रायबरेली सीमेवर असलेल्या फुरसातगंज विमानतळावर उतरले.

विमानतळावरून सोनिया, राहुल आणि रॉबर्ट वाड्रा रायबरेली काँग्रेस कार्यालयात पोहोचले, तर प्रियांका आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत अमेठीला गेले. किशोरी लाल यांच्यासोबत येथे रोड शो केला.

अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा

पुणे-अखिल भारतीय मराठा महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा जाहीर केला आहे.महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, शहराध्यक्ष वैभव शिळमकर, सरचिटणीस मयुर गुजर, महिला प्रमुख आरती मारणे, जयश्री साळुंके, सविता मारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारले.

जगताप म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण महायुतीने दिले आहे. राज्यात 1998 साली युतीचे सरकार असताना मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. त्यानंतर सन 2000 ते 2014 काँग्रसच्या सत्ता काळात महामंडळाचे कामकाज ठप्प झाले होते. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निधी देऊन महामंडळाचे पुनरुज्जीवन केले. आज 86 हजारहून अधिक मराठा युवकांना या महामंडळाचा लाभ झाला. महायुतीच्या सरकारने विविध खात्यात निवड झालेल्या 2270 मराठा उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. सारथीच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ झाला. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून समाजाचे आरक्षण टिकू शकेल या विश्वासाने पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा दिला आहे.

मोहोळ यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपण मराठा समाजाबरोबर असून समाजाच्या प्रगतीसाठी शासन दरबारी सर्वोतोपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले.

महायुतीच्या पाठीशी मराठा समाजाने ठामपणे उभे राहावे, महायुती समाजाला न्याय देईल असा विश्वास महायुतीचे समन्वयक आणि भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.

बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची – सुनील शेळके

कर्जत, 3 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहील, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत पिंगळे, दत्तात्रय म्हसुरकर, अशोक भोपतराव, भगवान भोईर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, कर्जतचे तालुकाध्यक्ष भगवान चंचे, खालापूरचे तालुकाध्यक्ष संतोष बेलमारे तसेच एच आर पाटील, भरत भगत, शिवाजी खारीक, अंकित साखरे, रजनीताई धुळे, प्राची पाटील, संभाजी जगताप, स्वप्निल भालकर, अक्षय पिंगळे, भाई कोतवाल, हिराजी पाटील आधी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत मी स्वतः पार्थ पवार यांच्या विरोधात काम केले होते, तरी देखील अजितदादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. आमदार केले आणि मावळ तालुक्याच्या विकासासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देखील दिला. अशा नेत्याच्या शब्दासाठी आपण काहीही करू शकतो. अजित पवार यांनी मावळात धनुष्यबाण चालवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे.

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या रूपाने एक कर्तृत्ववान तरुण न नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. या नेत्याला भविष्यात न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहनही शेळके यांनी केले.

खासदार बारणे यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला. कर्जत तालुक्यातील तुंगी सारख्या आदिवासी खेड्यात स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वीज आणि रस्ता पोहोचवता आला, याचा विशेष आनंद आहे, असं ते म्हणाले. अटल सेतू, मेट्रो यासारख्या मोठ्या कामांबरोबरच शासकीय योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. अजूनही याबाबत अनेक विकास कामे प्रस्तावित आहेत, असे त्यांनी सांगितले. मावळचे मतदार विकासाच्या बाजूनेच मतदान करतील, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीनंतरही महायुती कायम राहणार आहे. महायुतीच्या वतीने भविष्यात कोणाला संधी दिली जाईल, याचा निर्णय केंद्र व राज्याचे नेतृत्व घेईल. पण निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाची जाणीव आपण सदैव ठेवू, अशी ग्वाही बारणे यांनी दिली.

एकनाथ धुळे यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर घारे, दत्तात्रय म्हसुरकर, उमाताई मुंडे, अशोक भोपतराव, हनुमंत पिंगळे, रंजना धुळे आदींची यावेळी भाषणे झाली.

उरण तालुक्यातील मोठ्या यात्रांमध्ये बारणे यांची हजेरी

उरण, दि. 3 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी रात्री उरण तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्री रत्नेश्वरी देवी व श्री शांतेश्वरी देवी यांचे यात्रेनिमित्त मंदिरात जाऊन पूजा केली व आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी जसखार व नवीन शेवा या गावांमधील मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन गाठीभेटी घेतल्या.

उरण तालुक्यातील जसखार येथील श्री रत्नेश्वरी देवी यात्रा व पालखी सोहळ्यात खासदार बारणे दरवर्षी सहभागी होतात. या वर्षीही ते आवर्जून जसखारच्या मंदिरात जाऊन रत्नेश्वरी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघाताई दमडे व अन्य पदाधिकारी होते. नितीन पाटील, दीपक ठाकूर, अमित ठाकूर, गणेश घरत, उपसरपंच प्रणाली म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते पी. जे. पाटील तसेच मधुकर पाटील व संदीप भोईर यांच्या निवासस्थानी बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांचे स्वागत करण्यात आले.

नवीन शेवा येथील श्री शांतेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. नवीन शेवा ग्राम सुधारणा मंडळाच्या वतीने अध्यक्ष कमलाकर पाटील तसेच चंद्रकांत घरत, पंडित घरत, हिराजी घरत, एस. जी. म्हात्रे, भारत भोईर, हेमंत म्हात्रे, भगवान घरत, रमेश म्हात्रे, आदिनाथ भोईर, भावेश भोईर, मालती म्हात्रे, राकेश भोईर आदींनी बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. गावातील काही मान्यवरांची त्यांनी घरी जाऊन भेट घेतली. निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती बारणे यांनी केली.

शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे,दि. ३ : जिल्ह्यात मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत असून शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गृहनिर्माण संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये पदाधिकारी आणि सदस्यांनी जास्तीत जास्त मतदार जागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, सहकारी गृहनिर्माण संस्था पुणे शहर जिल्हा उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटचे प्रमाण अधिक असून तेथील मतदारांची संख्या अधिक आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्याच्यादृष्टीने ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी तयार करण्यात आलेला क्यूआर कोड संस्थेच्या दर्शनी भागात लावण्यात यावा. मतदार ओळख पत्र आणि मतदार ओळख चिठ्ठी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेऊन जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थामध्ये मतदान होईल यासाठी प्रयत्न करावेत.

मतदारांच्या सुविधेसाठी ‘नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच मतदारांना हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. लवकरच मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नगरपालिका क्षेत्रातही स्थानिक यंत्रणेमार्फत मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत. मतदार नोंदणी झालेल्या जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही डॉ. दिवसे यांनी केले.

शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार-मुरलीधर मोहोळ

पुणे-कमी वेळेत अधिक पाऊस होऊन शहरात निर्माण होणारी पूरस्थिती रोखण्यासाठी शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

दत्तवाडी, राजेंद्र नगर, सेनादत्त पोलीस चौकी, नवी पेठ, टिळक रस्ता, रामबाग कॉलनी, साने गुरुजी नगर, पर्वती गाव, लक्ष्मीनगर, सातारा रस्ता परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, सरस्वती शेंडगे, राजेंद्र काकडे, अमित कंक, प्रशांत सुर्वे, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, संजय देशमुख, छगन बुलाखे, राजू परदेशी, उमेश चव्हाण, राजाभाऊ भिलारे, गणेश भोकरे, नीलेश हांडे, हेमंत जगताप, रवी साने, कपिल जगताप, नीलेश धुमाळ उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, केंद्राच्या शहरी पूर नियंत्रण योजनेत पुणे, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. मी महापौर असताना पुणे महापालिकेने या संदर्भातला आराखडा केंद्र सरकारकडे सुपूर्द केला होता. त्या आराखड्याला मान्यता मिळाली असून शहराच्या विविध भागांमध्ये 250 कोटी रुपयांची पूरनियंत्रणासाठी कामे होणार आहेत.

मोहोळ पुढे म्हणाले, पूराच्या पाण्याच्या अंदाज घेण्यासाठी सेन्सर्स बसविणे, धोकादायक ठिकाणी कॅमेरे बसविणे, पाणी टेकड्यांवर जिरवण्यासाठी उपाय करणे, कल्व्हर्ट बांधणे, नाल्यांचे ड्रोन मॅपिंग करणे, गटारांची क्षमता वाढविणे, सांडपाणी व्यवस्थापन करणे, गॅबियन वॉल उभारणे, कमांड कंट्रोल रूम उभारणे अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत. पाच वर्षांपूवी आंबील ओढ्याला आलेल्या पुरात नुकसान झालेल्या सोसायट्या आणि नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.