पुणे- नगरसेवक पदाची मुदत संपली तरी महापालिकेची स्थायी समिती बरखास्त होतच नाही आमची स्थायी समिती आणि मी चौथ्यांदा अबाधित अध्यक्ष आहे असा पवित्रा घेऊन ; तथाकथित माजी नगरसेवक आणि इतिहासात चार वेळा सलग स्थायी अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेले हेमंत रासने यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी महापौर अंकुश काकडे यांनी येथे दिली त्यांनी यावर राजकीय टिप्पण्या करत रासने आणि भाजपला टोले लागविले आहेत .ते म्हणाले रासने यांना एवढी हाव सुटली कि त्यांच्यामुळे विनाकारण महानगरपालिकेला विधी खात्याला जो खर्च झाला त्याला जबाबदार कोण ? शेवटी रासने आपली हौस फिटली, पण महानगरपालिकेला मात्र आर्थिक बोजा पडला त्याला जबाबदार कोण? पण शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली असेच म्हणावे लागेल. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिशय चांगले अभ्यासू अध्यक्ष आपण पुणे महानगर पालिकेला दिले त्याबद्दल त्यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन असाही टोला काकडे यांनी लगावला आहे.