कौशल्य विकास प्रमाणपत्राच्या आधारे बंदीजनांना समाजप्रवाहात आत्मनिर्भर जीवन जगण्यास मदत हाईल-सहायक आयुक्त अनुपमा पवार

Date:

  • संकल्प’ प्रकल्पांतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांचे कौशल्य प्रमाणीकरण.

पुणे, दि. 7 : शासनमान्य कौशल्य विकास प्रमाणपत्राच्या आधारे कारावासातून बंदीजनांची सुटका झाल्यानंतर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आत्मनिर्भर होवून सन्मानाने जगण्याकरिता नवी दिशा मिळण्यास मदत होईल, असे मत कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी व्यक्त केले.
उत्तीर्ण बंदीजनांना कौशल्य प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे पडला. यावेळी कारागृह अधीक्षक यु. टी. पवार, कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार, अतिरिक्त अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जी. के. भोसले, नितीन क्षीरसागर, सोमनाथ म्हस्के, सुभेदार प्रकाश सातपुते, शिक्षक अंगत गव्हाणे यांच्यासह बंदीजन उपस्थित होते.
कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती पवार म्हणाल्या, येरवडा कारागॄहात काम करणा-या चर्मोद्योग उद्योगातील कुशल अशा 25 बंदीजनांची चर्मोद्योग क्षेत्र कौशल्य परिषदेमार्फ़त परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे निकाल प्राप्त झाले असून सदर परीक्षेत सर्व 25 बंदीजन उत्तीर्ण झाले आहेत.
कौशल्य विकास व उदयोजकता मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेतंर्गत संकल्प प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातील 10 जिल्हयांची निवड करण्यात आली असून यामध्ये पुणे जिल्हयाचा समावेश आहे.
संकल्प प्रकल्पांतर्गत पुणे जिल्हयात सन 2020-21 मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या काही विशेष बाबी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागॄह पुणे येथील बंदीजनांची कौशल्य पडताळणी तज्ञांमार्फत करुन पूर्व ज्ञान मान्यता अंतर्गत त्यांचे प्रमाणीकरण करणे व केंद्र शासनामार्फ़त कौशल्य कसोटी मधे उत्तीर्ण लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देणे प्रस्तावित करण्यात आले होते, असेही कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती पवार म्हणाल्या.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...