पुणे- खरे तर पुणेकरांना कोणीच नावे ठेऊ नये .. महापालिकेच्या मिळकतकराचा भरणा वेळेत जमा करण्यास असंख्य पुणेकर सदैव तत्पर असतात आणि मिळकत कर विभाग देखील तत्पर असतोच. नव्या २२-२३ वर्षाच्या पहिल्या महिन्यात अशीच तत्परता दाखवून गगन विहारी मिळकत कराची उत्तुंग भरारी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. पहिला महिना म्हणजे एप्रिल २०२२ हा महिना ; या महिन्यात महापालिकेच्या मिळकत कर विभागाने तब्बल २७९ कोटीचा मिळकत कर प्राप्त केला आहे. २ लाख ३४ हजार ६०० मिळकत धारकांनी तो जमा केला आहे. गेल्या वर्षातील याच एप्रिल महिन्यात महापालिकेला अवघे १९१ कोटी रुपयांचा कर प्राप्त झाला होता त्या तुलनेत ८८ कोटीने यंदा महसूल प्राप्तीत वाढ झाली आहे. मिळकत कर विभाग प्रमुख विलास कानडे यांनी हि माहिती दिली.
विशेष म्हणजे डिजिटल इंडिया,मिडिया ची दखल महापालिकेचे काही जण घेण्यास नेहमीच नाके डोळे मुरडत असले तरी पुणेकरांनी हा कर भरताना डिजिटल ला सराव्धिक महत्व दिले आहे. २७९ कोटीच्या उत्पन्नात १९६ कोटी रुपये ऑनलाईन- माध्यमातून पुणेकरांनी जमा केलेले आहेत. ७३ टक्के लोकांनी कर भरण्यास डिजिटल माध्यम स्वीकारले आहे. तर १८ टक्के लोकांनी धनादेशाने ४९ कोटी ९१ लाख जमा केले आहेत आणि रोखीने १७ टक्के लोकांनी २९ कोटी १६ लाख रुपये जमा केले आहेत