Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कलाकार सारे,भर भर जमले ,.. अन लढ्याचां निर्धार करुनी माघारी गेले (गडकरी पुतळा प्रकरण -व्हिडीओ)

Date:

पुणे- डॉ.मोहन आगाशे ,अमोल पालेकर ,मोहन जोशी, शरद पोंक्षे,श्रीरंग गोडबोले,पुष्कर श्रोत्री ,संध्या गोखले, शुभांगी दामले, विभावरी देशपांडे, स्मिता शेवाळे, हृषीकेश जोशी, संदीप खरे , प्रवीण तरडे,पुरुषोत्तम बेर्डे,ऋषिकेश जोशी, पिंटू परदेशी, सतीश आळेकर ,कांचन अधिकारी, सुनील महाजन  .. एक ना अनेक कलाकार भरभर जमले … त्यांनी थोर नाटककार राम गणेश गडकरीचा पुतळा हि बनवून आणला … पण कायद्याचा सन्मान करीत लढ्याची पुढची दिशा ठरवून .. पुतळा हि माघारी नेला आणि सारे माघारी फिरले…
प्रकरण आहे ते , संभाजी बागेतील गडकरींच्या पुतळ्याचे..काहींनी हा पुतळा येथून उखडून काढला ..आणि गायब केला..  संभाजी ब्रिगेड ने इथे हा पुतळा बसवू देणार नाही अशी भूमिका घेत या कलाकारांना प्रतिआव्हान दिले .या पार्श्वभूमीवर आता गडकरीचा नवा पुतळा  -होता तिथेच बसविण्यासाठी मराठी सिने नाट्य सृष्टीतील कलाकारांनी पुढाकार घेतला होता . आज सकाळी ते संभाजी बागेत हा पुतळा बसविणार होते .. त्यास ब्रिगेड  ने .. संभाजी बागेत पाय तर ठेवून दाखवा असे प्रतिआव्हान दिले होते… या साऱ्या घडामोडीत पोलिसांनी देखील कलाकारांना बागेत जमा होता येणार नाही आणि महापालिका  आयुक्तांच्या परवानगी शिवाय ..कायदेशीर सोपस्कार उरकल्याशिवाय तिथे पुतळा देखील पुन्हा उभारता येणार नाही अशी समज कलाकारांना दिली होती. त्यामुळे पुण्यातील म्हात्रे पुलानजीकच्या मेहंदळे गॅरेज शेजारील मनोहर मंगल कार्यालयात सकाळी पावणेअकरा पासून हि सारी कलाकार मंडळी भर भर जमली खरी.. गडकरींचा पुतळा हि येथे घेवून आली .. पण कायद्याची जाणीव सांगत ..भावना व्यक्त करीत .. गडकरीचे साहित्य आणखी आपापल्या कलेने मोहिमेद्वारे महाराष्ट्रभर पसरवू आणि कायदेशीर मार्गानेच पुन्हा तिथे पुतळा उभारू असा निर्धार करीत माघारी फिरली . अमोल पालेकर यांनी ‘पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना याप्रकरणी मोजके कलाकार भेटू आणि  पुतळा पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी करू ‘अशी सूचना देखील केली . ..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....