सोनावणे हॉस्पिटलच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. -अतिरिक्त महापालिका आयुक्त :रुबल अग्रवाल

Date:


पुणे- महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १९ अंतर्गत सोनावणे हॉस्पिटल भवानी पेठ या ठिकाणी नव्याने सुरु करण्यात आलेल्या कै. शांताबाई आनंदराव बागवे डायल्यासिस सेंटरचे उदघाटन महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते व आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, उपआरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे, तसेच रुबी हॉल क्लीनिकचे सर्जन डॉ. आनंद काटकर, नगरसेवक अजित दरेकर, सोनावणे हॉस्पिटल प्रमुख डॉ. रोकडे व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नगरसेवक अविनाश बागवे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले

.या प्रसंगी संयोजक अविनाश बागवे यांनी पूर्वीचे सोनावणे हॉस्पिटल व आत्ताचे सोनावणे हॉस्पिटल यामध्ये जो आमूलाग्र बदल विकास रूपाने झाला आहे. आणि या पुढील काळातही गोरगरीब कष्टकरी बहुजन समाजातील नागरिकाना या हॉस्पिटल मधून अत्यंत चांगल्या प्रकारच्या सोइ -सुविधा दिल्या जातील. त्यासाठी आम्ही या पुढील काळातही जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणार असल्याचे नमूद करून पुणे मनपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सेवक वर्ग व अत्यावश्यक मशीनरी व इतर साहित्यासाठी निधी लागणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिले .
तदनंतर उदघाटन प्रसंगी बोलताना सौ. रुबल अग्रवाल म्हणाले कि सात ते आठ महिन्यापासून कोरोनाच्या या महामारी मध्ये मी २४ तास काम करीत आहे. आत्ता कोरोनाचा परिणाम प्रभाव शहरामध्ये कमी झालेला असून जे पॉझिटीव्ह रुग्ण आहेत त्यांना रूग्णालय मध्ये उपचार सुरु आहेत. सोनावणे हॉस्पिटल हे पुणे मनपाचे एकमेव प्रसूतीगृह कोरोना काळात सुरु होते. व या हॉस्पिटल मधील सर्व सेवकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम केले असल्याचे स्पष्ट केले. या हॉस्पिटलसाठी पुढील काळात जी आर्थिक मदत लागेल ती पुणे मनपाच्या वतीने दिली जाईल असे मी जाहीर करते. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नगरसेवक अविनाश बागवे हे महापालिकेतील अत्यंत हुशार व अभ्यासू नगरसेवक आहेत. शहाराच्या विकासाच्या प्रश्नावर ते सातत्याने आपले म्हणणे मांडतात. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमासाठी.साबीर शेख, रवी पाटोळे, मीरा शिंदे, सुनील घाडगे, सुमित डांगी, क्लेमेंट लाजरस, सुरेखा खंडाळे, व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, हुसेन शेख, सुनील बावकर, रोहित अवचिते, मारुती कसबे, संजय साठे, इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

थोरले बाजीराव पेशवे यांचे तैलचित्र राज्याच्या विधानभवनात लावणार

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान ; श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे...

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल...

‘… तर आपल्या पक्षाचा विस्तार वेगाने करणे हेच उद्दिष्ट’

केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे प्रतिपादन पुणे...

सेवा हक्क दिनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान

पुणे- महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी...