आर्या स्पोर्ट्सच्या मोना मेश्रामची अफलातून फलंदाजी

Date:

एचपी महिला प्रीमियर लीग स्पर्धेत आर्या स्पोर्ट्स व एचपी रॉयल्स यांच्यात अंतिम लढत 

पुणे: हेमंत पाटील ग्रुप यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत आर्या स्पोर्ट्स व एचपी रॉयल्स या संघांनी अनुक्रमे सिंबा वॉरियर्स व एचपी ग्रुप या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 
व्हिजन क्रिकेट मैदान, सिंहगड रोड व डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत मोना मेश्राम(नाबाद 70) हिने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीसह गौतमी नाईक(3-15)च्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर आर्या स्पोर्ट्स संघाने सिंबा वॉरियर्स संघाचा  7गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली.  आर्या स्पोर्ट्सच्या  गौतमी नाईक(3-15), आरती केदार(1-8), आरती दासगुडे(1-13)यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे सिंबा वॉरियर्स संघाला 20षटकात 6बाद 98धावाच करता आल्या. यात प्रियांका गारखेडे 28, जाई देवनावर 20, माधुरी आघाव नाबाद 16यांनी धावा केल्या. आर्या स्पोर्ट्स संघाने हे आव्हान 17षटकात 3बाद 102धावा करून पूर्ण केले. यात मोना मेश्रामने 57चेंडूत 8चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. मोनाला कर्णधार किरण नवगिरेने नाबाद 19 धावा काढून सुरेख साथ दिली. सामन्याची मानकरी मोना मेश्राम ठरली. 
दुसऱ्या सामन्यात अनुजा पाटील(नाबाद 75धावा व  1-24) हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एचपी रॉयल्स संघाने एचपी ग्रुप संघावर  3 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना एचपी रॉयल्स व आर्या स्पोर्ट्स यांच्यात आज, 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे  स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:सिंबा वॉरियर्स: 20षटकात 6बाद 98धावा(प्रियांका गारखेडे 28(24,3×4,1×6), जाई देवनावर 20(33,2×4), माधुरी आघाव नाबाद 16, गौतमी नाईक 3-15, आरती केदार 1-8, आरती दासगुडे 1-13) पराभूत वि.आर्या स्पोर्ट्स: 17षटकात 3बाद 102धावा(मोना मेश्राम नाबाद 70(57,8×4,3×6), किरण नवगिरे नाबाद 19(13,1×4,1×6), मुक्ता मगरे 1-8, रीमा मल्होत्रा 1-15, श्रुती महाबळेश्वर 1-26);सामनावीर-गौतमी नाईक; आर्या स्पोर्ट्स 7गडी राखून विजयी;
एचपी रॉयल्स: 20षटकात 5बाद 143धावा(अनुजा पाटील नाबाद 75(46,12×4), आदिती गायकवाड 47(46,4×4), संजूला नाईक 2-25, प्रियांका घोडके 1-27, इशा पठारे 1-29) वि.वि.एचपी ग्रुप: 20 षटकात 6बाद 140धावा(तेजल हसबनीस 67(39,11×4), रसिका शिंदे 23(32,2×4), शिवानी के. 16, प्रियांका घोडके 16, प्रज्ञा वीरकर 2-35, शाल्मली क्षत्रिय 1-28, अनुजा पाटील 1-24, पूनम खेमनार 1-18);सामनावीर-अनुजा पाटील; एचपी रॉयल्स 3 धावांनी विजयी.   

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्तोरस्ती,गल्लोगल्ली वसुली भाईंचे साम्राज्य ,पुण्यात कर्जदारांना होतेय मारहाण

हडपसर मध्ये क्रेडिट कार्डच्या थकीत बिलावरून एजंटची व्यक्तीला...

६० कोटी जास्त दर दिलेल्या अशोक लेलॅंडला PMPML च्या 1 हजार बसची ऑर्डर ?

पुणे- सध्या PMPML विविध मार्गाने प्रसिद्धी झोतात आहे. बेकायदा...