२ ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांना घरपोच मिळणार डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना सातबारा महसूल विभागाचा उपक्रम

Date:

पुणे दि.24: महसूल व वनविभाग तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक भुमिअभिलेख यांचे निर्देशानुसार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना सातबाराचे मोफत घरपोच वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.

भोर तालुक्यात एकूण २०० महसुली गावे असून ८ महसुली मंडळांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत फक्त शेतीचे डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना नं. सातबारा वितरीत करण्यात येणार आहे. सदर मोहीम कालावधीत गाव नमुना नं. सातबारा केवळ एकदा मोफत दिला जाईल.भोर तालुक्यातील 42 हजार 206 व्यक्तिगत खातेदार, 9 हजार 756 संयुक्त खातेदार, 22 हजार 386 सामाईक खातेदार, 3 हजार 210 अभिव्यक्त कुटंब या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. गाव नमुना नं. सातबारा प्राप्त झाल्यानंतर संबंधित गाव नमुना सातबारा उताऱ्यात त्रुटी असेल तर तात्काळ त्याबाबतचा अभिप्राय नोंदवायचा आहे. त्याबरोबर गाव नमुना सातबारावर पिकांच्या अचूक नोंदीसाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी या अॅपचा वापर करावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आव्हान उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कोणाचा बाप रोखू शकत नाही’ ही मुख्यमंत्र्यांची गावगुंडाची भाषा; गोपाळदादा तिवारींचा फडणवीसांवर हल्लाबोल!

‘चोरी ते चोरी, पुन्हा शिरजोरी’; असे वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्राला...

कॅलिफोर्नियाला ५.० तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा; लॉस एंजेलिस विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत!

४५ मिनिटांत भूकंपाचे अनेक उत्तरधक्के; विमानतळाच्या टर्मिनलचे नुकसान, त्सुनामीचा...

अर्जेंटिनाच्या ‘द रिव्हर ट्रेन’ला इफ्फीत रजत मयूर पुरस्कार; नावीन्यपूर्ण कथाकथनाचा आंतरराष्ट्रीय गौरव!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष परीक्षक पुरस्कार; २०...

‘कांतारा’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर पुरस्कार!

५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनयाचा गौरव; सन्मानचिन्हासह १५...