“अखेर मोरगाव व परिसर भागात पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन कामाला सुरूवात “

Date:

.पुणे-येथील श्री क्षेत्र मोरगांव बारामतीच्या जिरायत भाग शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माध्यमातुन वआदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट यांचे सहकार्यातुन पुरंधर उपसा सिंचन योजनेमध्ये जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा होणेकामी पाइपलाइन करणेसाठी 1.32 कोटी रुपयांचा निधी C.S.R फंडातून उपलब्ध करून दिला आहे. या पाईपलाईन च्या कामासाठी मोरगाव येथील तरुण शेतकरी ,कार्यकर्ते अनिल ढोले, चांगदेव ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले ,विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, नारायण तावरे, विलास तावरे महादेव ढोले ,अभिजीत ढोले तसेच मोरगाव चे विद्यमान सरपंच निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष कष्ट घेतले आहेत. सदर योजनेमुळे मोरगांव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतक-यांना फायदा होणार आहे

या योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे. या योजनेसाठी शेतकरी, ग्रामपंचायत, सिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच व इतर ठिकाणी पत्रव्यवहार व पाठपुरावा इतर बाबींसाठी मोरगांवचे भूमिपुत्र असलेले पुणे महापालिकेतील उपायुक्त संदीप शंकरराव कदम यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले असे मोरगांवचे सरपंच निलेश केदारी व ग्रामस्थांनी सांगितले. या पाईपलाईनचे काम येत्या एक दोन दिवसांत चालू होणार असुन दिड ते दोन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे..
या योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्ती- वरील शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच मुंबई येथे जाऊन पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले आहे. तसेच सिंचन विभागातील मुख्य अभियंता गुणाले व इतर अधिकारी त्यांचेही आभार मानले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...