पुणे-माझा वार्ड आहे कि नाही, माझा मतदार आहे कि नाही ,कोरोना काय हे माहिती नसताना पण लॉक डाऊन ने घाबरलेला , हाताला काम नाही ,पोटालाभाकर नाही अशा अवस्थेत चिंतातूर झालेल्या शेकडो मजुरांसाठी त्यांची जात पात ,धर्म,प्रांत न पाहता कात्रज चा एक परिवार राबतोय ..कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेविना नगरसेवक प्रकाश कदम ,त्यांचे दोन्ही पुत्र प्रतीक कदम आणि प्रणव कदम आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन महापालिका ,पोलीस यांच्या आवश्यक त्या परवानग्या काढून अशा दीन दुबळ्याना जेवण पोहोच करत आहेत. कुठे तांदूळ,गव्हाचे पीठ पोहोच करीत आहेत आणि कुठे सोडीयम हाप्रोक्लोराइड ची फवारणी करून गोरगरिबांचा कोरोना पासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत . क्वचितच राजकारणी असे असतील असे वाटावे अशा पद्धतीने त्यांच्या सुरु असलेल्या सेवाभावी मेहनतीने लोकांना आश्चर्य वाटले तर नवल वाटू नये … पहा हा व्हिडीओ