“ शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार ” ; नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार!

Date:

मुंबई-हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असं ते म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. तर, भाजपाकडून मात्र या बंदवरून महाविकासआघाडीवर जोरादार टीका केली जात आहे.

नाना पटोले यांनी आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या जनतेने बंदला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भाजपाने ज्या पद्धतीने या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं, या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणं, हा पद्धतीच्या हत्यारी व्यवस्थेला महाराष्ट्र भाजपा समर्थन करत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे. म्हणून आज ज्या पद्धतीने भाजपाने आजच्या बंदला विरोध केला, त्याचाही आम्ही निषेध करतोय. तो यासाठी करतोय की उत्तर प्रदेशच्या भाजपा अध्यक्षांनी देखील झालेली घटना, जिथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांना मारण्यात आलं, त्याबद्दलची चिंता व्यक्त केली. परंतु, महाराष्ट्रामधील भाजपाचे नेतेमंडळी ज्या पद्धतीने या आंदोलनाचा विरोध करत होते. यातून भाजपाचं शेतकरी विरोधी धोरण स्पष्ट होत होतं. आजचा बंद हा चांगल्या पद्धतीने व शांततेत झालेला आहे. त्यामुळे जनतेचं समर्थन, महाविकासआघाडीच्या बरोबर आहे हे देखील सिद्ध झालं आणि भाजपाचा विरोध, आज पूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळालेला आहे.”याचबरोबर, “भाजपाने हा बंद अयशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी सांगितलं की, रस्त्यावर ते उतरले नाहीत, त्यांना रस्त्यावरील घटना माहिती नाही. रस्त्यावर ज्यावेळी लोकं या बंदला प्रतिसाद देत होते, ते त्यांनी पाहिलं नसेल म्हणून अशा पद्धतीनचं वक्तव्य भाजपाकडून केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना ढोंगीपणाच वाटेल. कारण, की शेतकऱ्यांची हत्या करणं हा भाजपाचा आता धंदा झालेला आहे. शेतकरी विरोधी धोरण, केंद्र सरकारमधून तीन काळे कायदे करणे आणि मग शेतकरी हितासाठी जे कुणी लढेल त्यांच्यासाठी तो ढोंगीपणाच असतो. आपण पाहिलं असेल, राकेश टिकैतला त्यांनी दहशतवादी, नक्षलवादी घोषित केलं. शेतकऱ्यांच्या बाजूने जो बोलेल तो ढोंगी असतो, दहशतवादी असतो हे भाजपाचं धोरण आहे. त्यामुळे ते काही चुकीचं बोलले नाहीत, कारण भाजपा शेतकरी विरोधी आहे.” असंही पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...