मुंबई ः पीएमसी बँक प्रकरणाचे तुम्ही लाभार्थी आहात का, हे आधी स्पष्ट करा, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
राऊत यांच्या पत्नीला आज ईडीची नोटीस आल्याप्रकरणी ते बोलत होते. पीएमसी बँकेत आपले पैसे अडकलेल्या दहा लाख खातेदारांसह सर्वांनाच त्या बँकेचे पुनरुज्जीवन हवे आहे. त्यामुळे ईडीला कोणतीही माहिती हवी असल्यास तिला राजकीय रंग देणे योग्य नाही असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
राऊत यांच्या पत्नीला आज पीएमसी बँक प्रकरणी ईडीची नोटीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.