पुणे- एकीकडे शेकडो कोटीची अनधिकृत बांधकामे करून अनेक शेठ गलेलठ्ठ होत असताना अशा बांधकामांवर कारवाई करण्या ऐवजी महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख कोरोना सारख्या महामारीच्या काळातही पथारीवाल्यांच्या आणि स्टोल धारकांच्या पाठीशी लागले आहेत त्यांना सळोकी पळो करण्यात आजवरचे हे सर्वात मोठ्ठे अधिकारी ठरत आहेत . आणि दुसरीकडे मात्र पथ विक्रेता आत्मनिर्भर योजना आपण राबविणार असल्याचे पुण्याचे महापौर मोहोळ हे आपल्या पक्षाच्या ,आणि सरकारच्या धोरणा नुसार जाहीर करताना दिसत आहेत . महापालिकेकडून लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात होणारी अशी थट्टा मात्र ग्राहकांच्या भोवती आपला फास आवळताना दिसत आहे . कारण हे अतिक्रमण अधिकारी पथारीवाल्यांना तब्बल ५ हजार रुपये दंड ठोठावून मग खाऊन उरलेला माल पथारीवाल्यांच्या स्वाधीन आहेत आणि जा आत्मनिर्भर योजना येते आहे असे सांगत आहेत .
लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत एकीकडे नौकरीला मुकलेले , काम धंदा करू न शकलेले अनेक जन शेत माल आणि अन्य मार्गे पथारीवाले बनून गमावलेले उत्पन्न भरून काढताना दिसत आहेत . पदवीधर आणि अनेक मोठ्या पदावर असलेले रस्त्यावर भाजीपाला विकून उदार निर्वाह करताना दिसून आले . लॉक डाऊन उठल्यावर स्टोल दुकाने सुरु झाली या सर्वांना या अतिक्रमण प्रमुखाचा जोरदार तडाखा बसला आहे. एकीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि गटनेते आबा बागुल , विपक्ष्नेत्या दिपाली धुमाळ ,अश्विनी कदम , अविनाश बागवे ,वनराज आंदेकर ,नंदा लोणकर अशा विविध नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाकडून होणाऱ्या ५ हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईला विरोध करत स्थायी समितीला केवळ १ हजाराचा दंड करा एवढा दंड करू नका असा दिलेला प्रस्ताव कित्येक महिने धूळ खात पडला असताना आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविला आहे आणि आता पथारीवाल्यासाठी आत्मनिर्भर योजना घेऊन आले आहेत.