मोटार ड्रायव्हिंग स्कूलही सुरु …

Date:

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोटार ड्रायव्हिंग स्कूल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परवानगी दिली आहे. मात्र, प्रत्येक मोटारीत एकच उमेदवार आणि एकच प्रशिक्षक असेल, असे बंधन घालण्यात आले आहे.

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे मोटार वाहन प्रशिक्षणाला बंदी घालण्यात आली होती; परंतु निर्बंध शिथिल झाल्यावर आता मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यासाठी पुणे आरटीओने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार, उपाध्यक्ष नीलेश गांगुर्डे, खजिनदार निखिल बोराडे यांनी स्वागत केले आहे.शहरात सुमारे ४०० मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. त्यातील २५० स्कूल सध्या कार्यान्वित आहेत.

मोटार ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी देताना ‘आरटीओ’ने एका मोटारीत एकच उमेदवार आणि प्रशिक्षक असेल, असे बंधन घातले आहे. तसेच प्रत्येक फेरीनंतर मोटार सॅनिटाईज करावे लागेल. तर, प्रशिक्षक आणि उमेदवाराला मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच मोटारीतून फेरी सुरू करण्यासाठी प्रशिक्षक आणि उमेदवाराच्या शरीराच्या तापमानाची चाचणी घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

याबाबत घाटोळे म्हणाले, ”मोटार ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी मिळाली, ही स्वागताची बाब आहे. एकाच उमेदवाराला एका फेरीत न्यायचे असल्यामुळे त्यानुसार आम्ही आमचे शेड्यूल तयार केले आहे. त्यामुळे एका उमेदवाराचा सराव झाल्यावर त्याला सोडले जाते. त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराची फेरी सुरू होते. ‘आरटीओ’ने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे.”

परवान्यासह शुल्क

शहर ड्रायव्हिंग स्कूलचालक मोटारींच्या प्रकारानुसार सुमारे ६ ते ७ हजार रुपये शुल्क आकारतात. त्यात २४ दिवस उमेदवाराला रोज ४५ ते ६० मिनिटांचा सराव दिला जातो. या शुल्कात शिकाऊ आणि कायमस्वरूपी वाहन चालविण्याच्या परवान्याच्या शुल्काचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...