पानिपत युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे लोकसभा अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश – डॉ. नीलम गोऱ्हे यांची माहिती

Date:

नवी दिल्ली, दि.  11 :-  पानिपतच्या ऐतिहासिक युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकाचा विकास करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याबाबत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी लोकसभा भवनात दिले असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पानिपत युद्ध स्मारक, त्याचबरोबर पानिपत येथील मराठा स्मारकाच्या विकासाबरोबरच  महाराष्ट्रातील लेण्याद्री, एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात करावयाच्या सोयी-सुविधा बाबत पुरातत्व खात्याने तात्काळ कार्यवाही करण्याविषयी त्यांनी निर्देश दिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. विधान मंडळाच्या सदस्यांना रेल्वे प्रवास करीत असताना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळाव्यात याबाबतही लोकसभा अध्यक्षांना डॉ. गोऱ्हे यांनी निवेदन दिले.

लोकसभा अध्यक्षांनी यावर त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित मंत्रालयाशी संवाद साधून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अध्यक्ष महोदयांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले.

या बैठकीला महाराष्ट्राच्या विधी व  न्याय विभागाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, महेंद्र काज, रवींद्र खेबुडकर, राजेश तार्वी, अनिल महाजन, मकरंद पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बावधन येथील प्राण्यांचे इन्सिनेटरच्या स्थलांतरचा मार्ग मोकळा

पुणे : बावधन येथील महापालिकेचे प्राण्यांचे इन्सिनेटर बोपोडी येथील...

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची आसनव्यवस्था होणार अद्ययावत-स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या बैठकीची...

पुण्यात फेरीवाला परवाना हस्तांतरणासाठी शुल्क १,००० रुपये ; सुधारित प्रस्ताव मुख्य सभेपुढे-श्रीनाथ भिमाले

पुणे : पुणे महापालिकेकडील अधिकृत फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र अथवा...

‘आता फोन नाही डायरेक्ट गोळी येईल’:काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा बिश्नोई गँगची धमकी

‘आमचे ऐकले नाही तर दुपारी 2 वाजता दाखवून देतो’ मुंबई-पावसाळी...