दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब संघाचा दुसरा तर, पीवायसीचा पहिला विजय

Date:


पुणे, 21ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुना क्लब संघाने दुसरा विजय, तर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पहिला विजय नोंदविला. 

पुना क्लब मैदानावर झालेल्या लढतीत डावखुरा जलदगती गोलंदाज विश्वराज शिंदे(5-29)याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पुना क्लब संघाने मेट्रो क्रिकेट क्लब संघाचा 57 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना रेहान खान(3-29), निशांत नगरकर(3-46), मिरझा अकिब(2-46)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे पुना क्लब संघाचा डाव 46.1षटकात सर्वबाद 191धावावर संपुष्टात आला. यामध्ये ओंकार आखाडे 39, शंतनू खेनात 26, हर्ष ओस्वाल 26, सागर बिरदावडे 21, मेहुल चहल 19, रौनक ढोलेपाटील 18 यांनी धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मेट्रो क्रिकेट क्लब संघाचा डाव 31.4षटकात 134 धावावर संपुष्टात आला. यामध्ये प्रशम गांधी 50, यश बारगे 21, गुरवीर सिंग सैनी 18 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पुना क्लबच्या विश्वराज शिंदेने 29 धावात 5 गडी बाद, तर अमेय मुजुमदारने 18धावात2गडी, ओंकार आखाडे(1-29), सागर बिरदावडे(1-21)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

वीरांगना क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत साहिल छुरी(50धावा व 1-20)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा 113 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 50षटकात 7बाद 285धावा केल्या. यात आदित्य लोंढेने 63 चेंडूत 5चौकार व 3षटकारासह 59धावा व श्रेयश वाळेकरने 72चेंडूत 6चौकारासह 53धावा केल्या. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी 100 चेंडूत 101धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर साहिल छुरीने 30चेंडूत 4चौकार व 3षटकारासह 50धावा व नचिकेत वेर्लेकरने 32धावा, रोहित जनाने 22धावा, साहिल मदनने 17 धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात केडन्स क्रिकेट अकादमी संघाचा डाव 37.3षटकात 172धावावर कोसळला. यामध्ये प्रद्युम्न चव्हाण 38, हर्षल काटे 25, आर्यन गोजे 21, सिद्धेश वरगंटे 20 यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. पीवायसी संघाकडून आदित्य डावरे(3-28), नचिकेत वेर्लेकर(3-37) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला.  सामनावीर साहिल छुरी ठरला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:पुना क्लब: 46.1षटकात सर्वबाद 191धावा(ओंकार आखाडे 39(76,1×4), शंतनू खेनात 26(39), हर्ष ओस्वाल 26(28), सागर बिरदावडे 21, मेहुल चहल 19, रौनक ढोलेपाटील 18, रेहान खान 3-29, निशांत नगरकर 3-46, मिरझा अकिब 2-46)वि.वि.मेट्रो क्रिकेट क्लब: 31.4षटकात सर्वबाद 134 धावा (प्रशम गांधी 50(61,5×4,1×6), यश बारगे 21, गुरवीर सिंग सैनी 18, विश्वराज शिंदे 5-29, अमेय मुजुमदार 2-18, ओंकार आखाडे 1-29, सागर बिरदावडे 1-21); सामनावीर-विश्वराज शिंदे; मेट्रो क्रिकेट क्लब संघ 57धावांनी विजयी;

पीवायसी हिंदू जिमखाना: 50षटकात 7बाद 285धावा(आदित्य लोंढे 59(63,5×4, 3×6), श्रेयश वाळेकर 53(72,6×4), साहिल छुरी 50(30,4×4,3×6), नचिकेत वेर्लेकर 32(28), रोहित जना 22, साहिल मदन 17, सिद्धेश वरगंटे 2-39, यतीन मंगवानी 2-59) वि.वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 37.3षटकात सर्वबाद 172धावा(प्रद्युम्न चव्हाण 38(49,6×4), हर्षल काटे 25(31), आर्यन गोजे 21(33), सिद्धेश वरगंटे 20(23), आदित्य डावरे 3-28, नचिकेत वेर्लेकर 3-37, साहिल छुरी 1-20); सामनावीर-साहिल छुरी; पीवायसी संघ 113 धावांनी विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेकायदा बांधकाम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – माजी उपमहापौरांची पोलिसात तक्रार

संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नाही महापालिकेच्या कामबंदीची नोटीसीला केराची...

पात्र मतदारांची अचूक नोंदणी व निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे-मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision -...