पुणे,: कात्रज ते सिंहगड रस्ता(नवले ब्रिज ) , राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच ५४८ डी डी वरील ३.८८ किलोमीटर च्या रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्यासह बांधकाम आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १.०० वाजता शिवसृष्टी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज बायपास रोड, पुणे येथे होणार आहे. या कामासाठी ६९ कोटी रुपये खर्च होणार असून काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात रस्त्याचे सहापदरीकरण, सेवा रस्ते, पदपथ, लहान पूल, मोऱ्या, व्हेहीक्युलर अंडर पास, पादचारी भुयारी मार्ग, नवीन बांधकाम, लहान चौक सुधारणा , बस निवारा आदी कामे करण्यात येतील,
असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.