एसटी मधील मोफत वायफाय सेवेमुळे महामंडळास दरवर्षी एक कोटीचा अतिरिक्त महसूल

Date:

  नागपूर-राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशांना वायफाय सुविधा देण्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पावर महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून या उलट दरवर्षी एक कोटी इतका वार्षिक परवाना शुल्क महामंडळास अतिरिक्त महसूल म्हणून मिळणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

            सदस्य सर्वश्री प्रकाश आबिटकर, बसवराज पाटील, श्रीमती प्रणिती शिंदे आदींनी राज्य महामार्ग परिवहन मंडळास एसटीमधील मोफत वायफाय सेवेमुळे होत असलेल्या नुकसानाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना परिवहन मंत्री श्री. रावते यांनी म्हटले आहे की, एसटी बसेसमध्ये वायफाय प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीची सेवा पुरवठादार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कोणत्याही प्रकारचा खर्च केला नसून महामंडळास या प्रकल्पाद्वारे वार्षिक परवाना शुल्क म्हणून प्रतीवर्षी एक कोटी पाच लाख इतका अतिरिक्त महसूल पुढील पाच वर्षांसाठी प्राप्त होणार आहे. तांत्रिक कारणास्तव वायफाय उपकरण बंद पडल्यास सदर कंपनीकडून त्याची मोफत दुरुस्ती करुन देण्यात येते, असे श्री. रावते यांनी उत्तरात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘५०० कोटींच्या विषयावर ED-CBI आता झोपली आहे का?’; संजय राऊतांचा सरकारला सवाल!

जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून भाजपसह शिंदे गटावर निशाणा मुंबई |...

शिक्षकांच्या मताला १० हजार रुपये? राजू शेट्टींच्या फेसबुक पोस्टने खळबळ!

विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांत आज मतदान; पैशांच्या आमिषावरून शिक्षकांच्या...

९९ रुपये लिटरचे डीझेल १५९ रुपये लिटरने का घेते महापालिका/PMPML ? फायदा कोणाला, तोटा कोणाला?

बाजारात ₹९९, महापालिकेला ₹१५९ प्रतिलिटर दराचा दावा; वर्षाला १५...

‘५०० कोटींचा आरोप १०० टक्के खोटा; भाजपचा काडीमात्र संबंध नाही!’ — आशिष शेलार

‘जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल कायदेशीर चौकशी करा’; शिंदेंवरील...