Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पीक व्यवस्थापन शास्त्राद्वारे दर्जेदार डाळींब उत्पादन शक्य – प्रकल्प संचालक सुनील बोरकर

Date:

बारामती:   देशात डाळींब लागवड क्षेत्रात वाढ झाल्यामुळे  उत्पादनातही वाढ झालेली आहे.   या स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जेदार व निर्यातक्षम डाळींब उत्पादन घ्यावे लागणार आहे.   पीक व्यवस्थापन शास्त्राद्वारे दर्जेदार डाळींब उत्पादन घेणे शक्य असल्याचे मत आत्मा, पुणेचे प्रकल्प  संचालक सुनील बोरकर यांनी व्यक्त केले.

कृषी विभागाअंतर्गत आत्मा, पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम डाळींब उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार,  महाराष्ट्र राज्य डाळींब बागायतदार संघाचे अध्यक्ष शहाजी जाचक, प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, सोलापूर डाळींब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ श्रीमती ज्योत्स्ना शर्मा, आकाशवाणीचे कैलास पिंगळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शाकीरअली सय्यद, डॉ. मिलींद जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्प संचालक श्री. बोरकर म्हणाले, डाळींब पिकाचे क्षेत्र वाढले आहे.  वैयक्तिक फायद्यासाठी शेतकऱ्यांची विविध प्रकारच्या औषध विक्रीतून  मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.  चांगल्या व दर्जेदार मालाच्या उत्पादनासाठी पीक व्यवस्थापन शास्त्र शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.   या दोन दिवशीय शिबीरातून शेतकऱ्यांच्या डाळींब फळ पीकाच्या  शंकेचे निरसन होणार असून त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे.

श्री. राजेंद्र पवार यावेळी म्हणाले,  पुणे, सातारा व सोलापूर या भागातील हवामान डाळींब फळ पिकासाठी पोषक आहे.   डाळींब  काटेरी झुडूप असून त्याची नैसर्गिता पहाणे महत्वाचे आहे. डाळींब उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी उत्पादन वाढीकडे लक्ष दिले पाहिजे.

डाळींब बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री. जाचक यावेळी म्हणाले,  डाळींब पिकासाठी पाणी, औषध व्यवस्थापन होणे महत्वाचे आहे.  अनावश्यक फवारण्या टाळल्या पाहिजेत.  शेतातील सेंद्रीय कर्ब वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सोलापूर डाळींब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ श्रीमती ज्योत्स्ना शर्मा यांनी डाळींब फळ पिकावरील तेल्या व मर या रोगावरील नियंत्रण व उपचार याविषयी सखोल माहिती दिली.  उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही केले.

वरिष्ठ शास्त्रज्ञ शाकीरअली सय्यद यांनी कृषी विज्ञान केंद्रात राबविण्यात आलेल्या मधमाशी प्रकल्पाविषयी माहिती दिली.  मधमाशीमुळे फळपिकावर फवारणीमध्ये घट झाल्याचे सांगून शिबीराचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलींद जोशी यांनी केले. या शिबीरास पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासल्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर विधानसभेत आ. तापकीरांची लक्षवेधी –

पुण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर पद व समन्वय समिती स्थापनेचे...

चंद्रकांतदादा पाटील यांची वाचनप्रेमी कोथरुडकरांसाठी आनंदाची बातमी

कोथरुड मतदारसंघातील वाचकांसाठी विशेष सवलत योजना पुणे-तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

निगडी ते चाकण व्हाया वाकड मेट्रो ‘डीपीआर’ मंजुरीसाठी आ. शंकर जगताप यांच्याकडून मागणी!

चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्प; जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या...

कायदेशीर बाजु पुर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार पूर्ण करणार!

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या (पुणे) विस्तारीकरणासाठी...