Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

1 ते 31 जुलै दरम्यान मतदार यादीत नांव नोंदणीसाठी विशेष मोहीम

Date:

मोहीम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयांनी

पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी सौरभ राव

पुणे –तरुण  व पात्र प्रथम मतदारांच्या नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेमध्ये जिल्हयातील महाविद्यालयांनी सक्रिय सहभागी व्हावे. यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी पात्र विद्यार्थ्यांचे नांव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे केले.

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 1 ते 31 जुलै,2017 दरम्यान 18 ते 21 वर्षांच्या तरुण व पात्र प्रथम मतदारांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यासाठी जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीचा आणि नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्यासह जिल्हयातील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

तरुण व पात्र प्रथम मतदारांच्या मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेमध्ये जिल्हयातील विविध महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या  18 ते 21 वयोगटातील सर्व पात्र व तरुण मतदारांचे अर्ज भरुन घेण्यात यावे, महाविद्यालयांना फॉर्म क्रमांक 6 चे वाटप करावे, मोहिमेमध्ये लोकप्रतिनिधींनी सहभागी करुन घ्यावे अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यावेळी संबंधित अधिकारी व प्राचार्यांना केली. मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशीत केले. यासोबतच मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या सर्व पात्र नागरिकांची नांव नोंदणी करण्याची सूचना त्यांनी केली.

सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात, मतदार यादीत नांव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम प्राधान्याने राबवावी, अशी सूचना उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. बैठकीला जिल्हयातील मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज

वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय ह. भ. प. योगीराज...

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी...