Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंम् रोजगार या तिन्ही वेब पोर्टलचे एकत्रिकरण

Date:

मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंम् रोजगार या तिन्ही वेबपोर्टलचे एकत्रिकरण करून महास्वयंम् हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, आयुक्त ई. रविंद्रन उपस्थित होते.

कौशल्य विकास (एमएसएसडीएस), रोजगार (महारोजगार) व उद्योजकता (महास्वयंम् रोजगार) याबाबत तीन स्वतंत्र वेब पोर्टल होती. सदर तिन्ही वेब पोर्टल एकाच ठिकाणी एकत्रित करुन महास्वयंम् हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले. महास्वयंम् पोर्टल वन स्टॉप शॉप म्हणून काम करणार आहे. हे सर्व प्लॅटफार्म एकाच ठिकाणी आपल्याला वापरता येणार आहेत. म्हणजे कौशल्य प्रशिक्षित लोकांची यादी ठेवता येईल, ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांना नोंदी करता येतील, बेरोजगारांना नोंदी करता येतील आणि इंडस्ट्रिजला मागणीप्रमाणे नोंदणी करता येणार आहे. उमेदवारास एकाच ठिकाणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विषयक माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षण संस्थाना उमेदवारास प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे देयक त्याचप्रमाणे रोजगार बाबत संपूर्ण माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उद्योजकास सीएनव्ही ॲक्ट अन्वये रिक्त असलेली पदे अधिसुचित करणे, प्रसिद्धी देणे, योग्य उमेदवाराची निवड तयार करणे, मुलाखतीचा एसएमएस पाठविणे, अनिवार्य विवरण पत्र सादर करणे इ.सुविधा उपलब्ध आहेत. उमेदवारांना नोकरी बाबतची माहिती एकाच क्लिक बटनवर उपलब्ध आहे व याबाबत एस.एम.एस. उपलब्ध होण्याची सुविधा आहे. उमेदवार, उद्योजक यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होणे सुलभ होणार आहे तसेच उमेदवार, उद्योजक यांना प्रशिक्षण नोंदणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

उमेदवारास नोंदणी, रोजगार उपलब्धतेबद्दल माहिती व अर्ज भरणे, प्रशिक्षणा बाबतची माहिती, स्वयंम् रोजगाराबाबतची माहिती अर्ज भरणे, रोजगार मेळावे माहिती व सहभागी होण्याची सुविधा, रिक्त पदासाठी अर्ज करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रशिक्षण संस्थांसाठी नोंदणी, शासनाच्या कौशल्य विकास योजनेत सहभागी होणे, प्रशिक्षण शुल्क देयक, प्रशिक्षण शुल्क ईसीएस पद्धतीने प्राप्त होते. तसेच उद्योजकांसाठी नोंदणी, रिक्त पदे प्रसिद्ध करणे, सुयोग्य उमेदवारांची यादी काढणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

एका बटनावर एकूण नोंदणीकृत उमेदवार/उद्योजक/प्रशिक्षण संस्था, एकूण कौशल्य विकास झालेले उमेदवार, एकूण नोकरी प्राप्त व स्वयंरोजगार करीत असलेले उमेदवार आदींची माहिती शासनास उपलब्ध होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....