Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे जिल्ह्याचा 48 हजार 807 कोटी रुपयांचा पत आराखडा जाहीर

Date:

पुणे : पुणे जिल्ह्याचा 2017-18 या वर्षाचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक आणि अन्य बँकांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या 48 हजार 807 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार हा पत पुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. पतपुरवठा आराखडा प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पूर्व परिमंडळ विभागाचे परिमंडळ व्यवस्थापक दत्ता डोके, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विक्रम पठारे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, जिल्हा उद्योग केंद्र सरव्यवस्थापक काशिनाथ डेकाटे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उप सरव्यवस्थापक डी. एस. थोरात पाटील, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आनंद कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक डी. बी. देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पत आराखड्याची वैशिष्ट्ये सांगताना अपर जिल्हाधिकारी रमेश काळे म्हणाले की हा पत आराखडा मागील वर्षापेक्षा 16 टक्यांनी अधिक आहे. प्राथमिकता क्षेत्रासाठी 30 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती एकून पतपुरवठ्याच्या 60 टक्के आहे. कृषी कर्जासाठी 6 हजार 895 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी 23 टक्के एवढे आहे.

कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती, फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामिण बँकेसह 41 बँकांच्या 1 हजार 617 शाखांचा सहभाग आहे.

पतपुरवठा आराखड्यात लघुउद्योजकांसाठी 11 हजार 420 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोट्या व्यवसायासाठी 12 हजार 185 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गत वर्षाच्या पत पुरवठा आराखड्यापेक्षा या 2017-18 आराखड्या मध्ये लघु उद्योजकांकरिता 37 टक्के, इतर प्राथमिक क्षेत्राकरिता 40 टक्के, एकूण प्राथमिकता क्षेत्राकरिता 38 टक्के, अप्राथमिकता क्षेत्राकरिता 15 टक्के, एकूण पत पुरवठा आराखड्याच्या 16 टक्के वाढ करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक देशमुख यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...