पुणे -संकलनाप्रमाणे व शासकीय नियमाप्रमाणे गुंजवणी प्रकल्पग्रस्तांनाभूखंड वाटप केले आहे. त्यामध्ये काही लोकांना भूखड वाटप करायचे राहणारनाही याची खात्री केली आहे. भूखंड वाटपाचे आदेश निर्गमित झाले आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य मंत्री विजय शिवतारे यांनी
व्ही. व्ही. आय. पी. सर्किट हाऊस येथे झालेल्या गुंजवणी पुनर्वसनाबाबतच्या बैठकीत केले.
जमीन वाटपाचे ताबे 15 दिवसांच्या आत देणेची कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. वाटप आदेशामध्ये चूका करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता ईश्वर चौधरी, कार्यकारी अभियंता बापसाहेब पवार, गुंजवणी प्रकल्पाचे सहायक अभियंता भरत वायसे, गुंजवणी प्रकल्पाचे सहायक अभियंता दि. स. डुबल,जिल्हा पुनर्वसन अधिकारी सौ. नयना बोंदार्डे, तहसीलदार सौ. जयश्री माळी, गुंजवणी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गौतम लोंढे व गुंजवणी प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.