कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीची कार्यशाळा संपन्न

Date:

पुणे, दि. 10 : कौंटुबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणे, त्यांची सुरक्षितता तसेच कायद्याबाबत सर्वांगिण जाणीव, जागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौंटुबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम-2005’ अंमलबजावणीबाबत कार्यशाळा आज संपन्न झाली.

जिल्हा परिषद पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृह  येथे  ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत कायद्याची अंमलबजावणी, कायद्याच्या नियमातील तरतुदींची माहिती या क्षेत्रात कार्यरत संरक्षण अधिकारी, विधिज्ञ, समुपदेशक व स्वयंसेवी संस्था यांना अवगत होण्यासाठी व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती.

पीडीत महिला तसेच मुले या कायद्याच्या मदतीने  कोणाकडून कशी मदत मिळवू शकतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये संरक्षण अधिकारी यांची भुमीका व जबाबदारी. समुपदेशकांना पीडीत महिलेस करावयाची मदत, जलद न्यायालयीन प्रक्रियेची माहिती या गोष्टींवर ॲड. रमा सरोदे व ॲड.असुंता पारधे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने झाले. महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त पी.बी. शिर्के, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी बिराजदार, बालविकास अधिकारी मुंडे, दक्षता कक्ष प्रमुख तथा वरिष्ठ  पोलिस निरीक्षक मेहेंदळे, महिला व आर्थीक विकास महामंडळाचे नितीन काळे, संरक्षण अधिकारी सरिता पाटील, तसेच समाजकार्यातील विद्यार्थी, सामाजिक संस्थेतील स्वयंसेवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...