पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा तीन आठवड्यात निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

पुणे: पुण्यातील सध्याच्या विमानतळाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने संरक्षण विभाग सकारात्मक आहे. पुण्याला नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापन करण्यासाठी तीन ठिकाणच्या जागांची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट अथोरीटी ऑफ इंडियाचे संचालक येत्या आठवड्याभरात येणार आहेत. त्यांनतर तीन आठवड्यात यापैकी एक जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चाकण येथे अमेरिकन कंपन्यांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांची राऊंड टेबल मिटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, अमेरिकन दूतावासातील डेप्युटी प्रिन्सिपल ऑफिसर डीएना अॅबडीन, कमर्शियल ऑफिसर जॉफरी पॅरीश, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.

उद्योग स्थापनेसाठी महाराष्ट्र हे आदर्श  राज्य असून उद्योगांना पूरक वातावरण राज्यात निर्माण करण्यात आले आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विदेशातील कंपन्यांना राज्यात उद्योग स्थापण्यासाठी विविध परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. सर्वच परवानग्या एका छताखाली दिल्या जात असल्याने वेळेची बचत होत आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यास शासनाने प्राधान्य दिले असून, अमेरिकन कंपन्यांनी याचा लाभ घेऊन अधिकाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अमेरिका आणि भारताचे संबंध खूप दृढ असून अनेक अमेरिकन कंपन्या पूर्वीपासूनच येथील विकासात सहभागी आहेत. आता मेक इन महाराष्ट्र व मेक इन इंडिया मध्ये अनेक संधी निर्माण होत आहेत. भारताच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीसाठी व शाश्वत विकासासाठी तेथील कंपन्यांना गुंतवणुकीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले त्यावर अमेरिकन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करून मेक इन महाराष्ट्र बरोबरच मेक इन इंडिया मध्ये विदेशी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली असून मेक इन महाराष्ट्रात या कंपन्यांचा मोठा सहभाग असेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

भारतात औद्योगिक कंपन्या स्थापन करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगीची वेळखाऊ प्रक्रिया आता सुलभ करण्यात आली आहे.  राज्यात कुशल आणि मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळाची उपलब्धता ही जमेची बाजू आहे.पुण्यासारखे शहर वेगाने विकसित होत आहे. पुण्याच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये दळणवळणाच्या अत्याधुनिक डिजिटल सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा सोयी सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावे. कंपन्यांना आवश्यक भूसंपादन, रस्त्यांची सुविधा, वीज तात्काळ विहित मर्यादेत पुरविण्यात येतील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की विजेबाबत असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येत आहे. राज्य शासनाचे विजेबाबतचे धोरण पारदर्शक असून वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही अडचणी नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. एका प्रश्नाच्या अनुषंगाने ते म्हणाले, पाणी व्यवस्थापनाची समस्या सध्या भेडसावत आहे. मात्र, यावर उपाययोजना करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरु आहेत. पाण्याचे नेटवर्क स्थापन करण्यात येणार आहे. पाण्याचे पुनर्भरण आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सांडपाणी शुद्ध करून ते उद्योगांना तसेच विद्युत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना पुरविण्याचे धोरण अवलंबण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

काही अनधिकृत लोक गुंडगिरी करून येथील कंपन्यांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडे विशेषतः पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना कारवाईचे सर्व अधिकार दिले आहेत. कंपन्यांनी असा त्रास होत असल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधावा. तक्रारदारांचे तसेच याबाबत माहिती पुरवणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच घेण्यात आली असून या बैठकीत अधिकाऱ्यांना औद्योगिक क्षेत्रातील गुंडगिरी समूळ नष्ट करण्याचे आदेश दिले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

औद्योगिक क्षेत्रासंबंधी कोणत्याही अडचणी, समस्या असतील तर एकाच व्यक्तीशी संपर्क साधता यावा म्हणून सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट अंतर्गत एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्याशी संपर्क साधता येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...