Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मांजरी नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांच्याहस्ते भूमिपूजन

Date:

पुणे, दि. 29–मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मांजरी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार योगेश टिळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुमारे 42 कोटी रुपये खर्च करुन ही पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे परिसरातील नागरिकांची 14.65 द.ल.लि.पाण्याची दैनंदिन गरज भागणार असून यामुळे मांजरी व परीसरातील गावांना या योजनेमुळे शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार
आहे. या पाणी पुरवठा योजनेला खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मांजरी गावठाण, महादेव नगर व स्टडफार्म येथे पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत.

या योजनेच्या भूमिपूजनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, पाणी पुरवठा योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच दोन वर्षात ही योजना पूर्ण होईल असे सांगितले. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे तसेच घनकचऱ्यावर प्रक्रिया करुन तो नष्ट करणे, मलनिस्सारण योजना राबविणे यावर लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

आमदार योगेश टिळेकर यांनी या पाणी पुरवठा योजनेमुळे मांजरी परिसरातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल असे सांगितले. मांजरी परिसराच्या विकासाच्या विविध योजनांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास परिसरातील ग्राम पंचायत व पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...