मुंबई, : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या 14 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून स्पंदन नाट्यकला क्रीडा शैक्षणिक मंडळ, रोहा या संस्थेच्या `वाटाड्या आदिमानव` नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. ज्ञानदीप कलामंच, ठाणे या संस्थेच्या `न नवसाचा` या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि कोशिश स्कूल फॉर द डेक, मुंबई या संस्थेच्या `खेळणघर ते स्टेशनघर` या नाटकासाठी अपंग उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. या तीनही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे –
दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक संकेत कोर्लेकर (नाटक-वाटाड्या आदिमानव), द्वितीय पारितोषिक राजेश राणे (नाटक-न-नवसाचा), प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक शाम चव्हाण (नाटक-वाटाड्या आदिमानव), द्वितीय पारितोषिक तुषार घाडी (नाटक-बुद्धाची गोष्ट), नेपथ्य : प्रथम पारितोषिक अर्चना पवार (नाटक-न नवसाचा), द्वितीय पारितोषिक महेश म्हसकर (नाटक-का? का? कावळे), रंगभूषा : प्रथम पारितोषिक जयेश सोनवणे (नाटक-जादूचा शंख), द्वितीय पारितोषिक भाग्यश्री नाईक (नाटक-सरणार कधी तम), उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक अर्पिता जोशी (नाटक-न नवसाचा) व यश पानसरे (नाटक-वाटाड्या आदिमानव), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : तन्मयी परांजपे (नाटक-पितृपक्ष), साक्षी रानडे (नाटक-यंत्राची कमाल विज्ञानाची धमाल), गौमती दातार (नाटक-सरणार कधी तम), अस्मी जैन (नाटक-फुलपाखरु एक किटक), सखी दातार (नाटक-पळा पळा पुढे कोण पळे), हर्ष देवरुखकर (नाटक-बंध नात्यांचे), गौरांग सामंत (नाटक-पितृपक्ष), सोहम पळनीटकर (नाटक-वयम मोठम् खोटम्), श्रवण कणसे (नाटक-जिना इसीका नाम है), अभिजात रेखाटे (नाटक-जादूचा शंख).
दि.5 ते 12 डिसेंबर, 2016 या कालावधीत साहित्य मंदिर सभागृह, वाशी येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण 52 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गिरीश भूतकर, ज्योती रावेरकर आणि जुई बर्वे यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.विनोद तावडे यांनी अभिनंदन केले.