पुणे विभागातील 18 लाख 75 हजार 680 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 19 लाख 40 हजार 891 रुग्ण–विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 30 :- पुणे विभागातील 18 लाख 75 हजार 680 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 40 हजार 891 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 114 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 40 हजार 97 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.64 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 13 हजार 781 रुग्णांपैकी 10 लाख 85 हजार 708 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 516 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 557 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.48 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 38 हजार 613 रुग्णांपैकी 2 लाख 26 हजार 7 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 600 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 95 रुग्णांपैकी 1 लाख 84 हजार 563 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 723 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 809 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 91 हजार 631 रुग्णांपैकी 1 लाख 82 हजार 859 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 738 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 3 हजार 771 रुग्णांपैकी 1 लाख 96 हजार 543 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 537 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 691 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 438 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 965, सातारा जिल्ह्यात 424, सोलापूर जिल्ह्यात 511, सांगली जिल्ह्यात 320 तर कोल्हापूर जिल्ह्यात 218 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 190 आहे. पुणे जिल्हयामध्ये 976, सातारा जिल्हयामध्ये 279, सोलापूर जिल्हयामध्ये 353, सांगली जिल्हयामध्ये 409 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 173 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 51 लाख 99 हजार 337 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 40 हजार 891 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )