मुळा, मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नियोजन करा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुणे,दि.2: जिल्ह्यातील मुळा, मुठा, भीमा या नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.

मुळा-मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार राहुल कुल, आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील नद्यांमधील जलपर्णी काढणे आवश्यक आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल सादर करावा. पुणे महानगरपालिकेने पाषाण तलाव, कात्रज तलाव, जांभुळवाडी तलावातील जलपर्णी व गाळ काढून तलावाची स्वच्छता करुन घ्यावी. तसेच नद्यांच्या पात्रांमधील जलपर्णी काढण्यासाठी पुणे, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डाने नियोजन करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...