पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 231

Date:

पुणे विभागातील 5 लाख 45 हजार 378 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 68 हजार 346 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.7 :- पुणे विभागातील 5 लाख 45 हजार 378 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 68 हजार 346 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 231 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 66 हजार 751 रुग्णांपैकी 3 लाख 52 हजार 381 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 589 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 781 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.08 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 759 रुग्णांपैकी 52 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 572 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 527 रुग्णांपैकी 46 हजार 977 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 814 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 711 रुग्णांपैकी 45 हजार 764 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 212 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 598 रुग्णांपैकी 47 हजार 844 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 44 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 401 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 232, सातारा जिल्ह्यात 85, सोलापूर जिल्ह्यात 52, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 331 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 130, सातारा जिल्हयामध्ये 61, सोलापूर जिल्हयामध्ये 113, सांगली जिल्हयामध्ये 13 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 88 हजार 921 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 68 हजार 349 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 6 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विशेष मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘साहस फाउंडेशन’चे परिश्रम

पुणे | प्रतिनिधी विशेष गरजा असलेल्या मुलांकडे समाजात अनेकदा दयेच्या...

भूतानने नाकारले भारताचे इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल

नवी दिल्ली / थिंपू | प्रतिनिधी भारत सरकारने इथेनॉल मिश्रित...

मिसिंग लिंकवर पहिल्याच पावसात खड्डे; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

दोन महिन्यांतच उखडला रस्ता; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, एमएसआरडीसीचे...

शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष; कोथरूडमधील व्यक्तीची ₹१३.३१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

फुरसुंगीत कपड्यांच्या दुकानातून ₹४.५० लाखांची रोकड चोरी; आंबेगाव, कोथरूडमध्येही...