मुंबई -बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा दफनविधी संपन्न झाला आहे.
शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राज्य पोलिसांची बटालियन दुपारी 1.30 च्या सुमारास दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचली होती. दिलीप कुमार यांच्या घरुन त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.घरून त्यांचे पार्थिव थेट स्मशानभूमीत नेण्यात आले.
दफनविधीवेळी सायरा बानोदेखील उपस्थित होत्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही होते. यासोबतच शासकीय सन्मानात दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले होते.