पुणे-वानवडी भागाच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहण्याचे आश्वासन राज्याचेमंत्री दिलीप सामाजिक न्याय राज्य कांबळे यांनी दिले .
वानवडी मधील केदारी गार्डन मध्ये वानवडी ग्रामस्थ आणि केदारी गार्डन मित्र परिवारच्यावतीने आयोजित भव्य सत्कार सोहळ्या प्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे बोलत होते . नामदार कांबळे यांनी सांगितले कि , वानवडी भाग गेले अनेक वर्षापासून दुर्लक्षित आणि विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे . त्यामुळे येथील वानवडी च्या दोन्ही बाजूच्या सीमेवर वाहणारे दोन नाल्यामध्ये नाला गार्डन केद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निधीतून बांधू , तसेच सोलापूर महामार्गचे फातिमानगर येथील रुंदीकरण व भव्य उड्डाण पूल उभारण्याची मागणी पूर्ण करून तेथील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्नरू , वानवडी मधील जुन्या मंदिराचा जीर्नोद्वार लोकवर्गणीमधून करू . आपल्या मतदार संघातील दलित बांधवासाठी अडीच कोटी तर अल्पसंख्यांक बांधवासाठी पाच कोटी रुपये निधी आपण उपलब्ब्ध करणार आहोत .
नवनिर्वाचित पुण्यनगरीचे महापौर प्रशांत जगताप , पुणे कॅनटोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर यांचा जाहीर सत्कार वानवडी येथे केदारी गार्डन मित्र परिवार व वानवडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी वानवडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या सत्कारच्या वेळी उत्तम केदारी यांनी पुणे महानगरपालिका व पुणे कॅनटो न्मेट सीमेवरील नाले तसेच सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण व वानवडी गावातील जुन्या देवळांच्या जीर्नोद्वारबाबतच्या समस्या या सर्वा पुढे मांडल्या .
यावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे , महापौर प्रशांत जगताप , पुणे कॅनटोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर हे तिघेही वानवडी गावचे रहिवासी असून या तिघांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला . याप्रसंगी या तिघांना वानवडी गावातील समस्या माहिती असल्याने सदर समस्या लवकरात लवकर दूर करण्याबाबत या तिघांनी आपापल्या परीने व वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन देऊन याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले .
या सत्कार प्रसंगी महापौर प्रशांत जगताप यांनी आपला महापौर निधी वानवडीच्या विकासासाठी देऊ , आज झालेला आमचा घरचा सत्कार आहे , आणि घरचा सत्कार झाल्याने मी आज आनंदित झालो आहेत . हा खऱ्या अर्थाने वानवडीकरांचा सन्मान आहे .
यावेळी दिलीप गिरमकर यांनी देखील वानवडीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत , आपण लहानाचे मोठे वानवडी येथे झालो असून या वानवडी गावाशी जिव्हाळ्याचे संबध असल्याने आम्हाला या पदाच्या माध्यमातून विकासकामे करण्याची संधी आहे .
या कार्यक्रमामध्ये माजी महापौर विठ्ठलराव लडकत , अम्मानुला खान , नगरसेविका नंदा लोणकर , बाळासाहेब कचरे , अड. अर्जुन खुर्पे , माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप , सुदाम जगताप , मुरलीधर निंबाळकर , जयप्रकाश पुरोहित , माजी नगसेवक नवनाथ कांबळे , हनुमंत साठे , बाबासाहेब जाधव , महेंद्र कांबळे , गनी शेख , बाळासाहेब गव्हाणे , विठ्ठल जांभुळकर , शिवराम जांभुळकर , कैलास आबनावे , मकरंद केदारी , रवींद्र चौघुले , तुकाराम गवळी , चंद्रकांत तोंडारे , सुरेश होले , बाळासाहेब घोलप , उषा माळी , नूतन शिवरकर आदी मान्यवर व वानवडी ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत उत्तम केदारी यांनी केले , तर सूत्रसंचालन दिनेश होले यांनी केले तर आभार वसंत केदारी यांनी मानले . या कार्यक्रमाचे संयोजन विठ्ठल केदारी , केरुपंत केदारी , विक्रांत केदारी , अमित केदारी , चेतन केदारी , अभय गवळी , साहिल खोपकर , रोहित केदारी यांनी केले . या कार्यक्रमच्या शेवटी सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला