Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मेट्रोच्या कामामुळे दि. १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

Date:

ठाणे, दि. 28 :- ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम चालू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर ओवळा सिग्नल ते सी.एन.जी. पंप पर्यंत घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकतांना ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता ठाणे शहर वाहतूक विभागाने दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल केले असल्याचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे –

प्रवेश बंद – मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे

पर्यायी मार्ग – मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी  जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद –  मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग –  मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग– नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही पिलर क्रमांक 24 ते 26 चे गर्डर टाकण्याच्या वेळी ओवळा सिग्नल कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे विहंग हिल सोसायटी कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.

पिलर क्रमांक 44 ते 45 चे गर्डर टाकण्याच्या वेळी विहंग हिल सोसायटी कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे नागला बंदर सिग्नल कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.            पिलर क्रमांक 69 ते 70 व पिलर क्र. 100 ते 101 चे गर्डर टाकण्याच्या वेळी नागला बंदर सिग्नल कट येथून डावीकडे वळण घेवुन सेवा रस्त्याने पुढे सी.एन.जी. पंप कट जवळ उजवे बाजुस वळण घेवुन मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.

खालील दिनांक व वेळेत मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम सुरू राहणार आहे.

            (१) दि. २६/०७/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा ते दि. २७/०७/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.

            (२) दि. २८/०७/२०२२ रोजी रात्री २३.५५ वा. ते दि. २९/०७/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (३) दि. ३०/०७/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ३१/०७/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (४) दि. ०१/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०२/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (५) दि. ०३/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०४/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (६) दि. ०५/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०६/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (७) दि. ०७/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. ०८/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

            (८) दि. ०९/०८/२०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १०/०८/२०२२ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत

वाहतुकीतील बदल या कालावधीत दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होई पर्यंत अंमलात राहणार आहे, असे वाहतूक शाखेने कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...