दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

Date:

मुंबई, दि. 7 : सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. या सेवांचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने खालील सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य करण्यात आले असून त्याचा वापर करुन दस्त नोंदणी बाबत शासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

1) नागरीकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत.

2) नागरीकांनी PDE डेटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईटवर eStep-in या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर) समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षित केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

3) नागरीकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत:चे पेन आणणे, एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरू नये. आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

4) विभागाच्या वेबसाईटवर लिव्ह अॅंड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अॅंड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे.

5) सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठ्या शहरात उदा. मुंबई, ठाणे, पुणे व इतर ठिकाणी सकाळ व दुपार दोन सत्रात कार्यालये सुरू आहेत. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू राहतील, याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी सुरु होते. त्याचे कामकाज शनिवार व रविवारी बंद करण्यात येत असून त्या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरु राहील, असे नोंदणी उपमहानिरीक्षक मुंबई विभाग, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...

पुणे महापालिकेत झेंडावंदन,परेड , पुष्पांजली वाहून महाराष्ट्र दिन संपन्न.

पुणे- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार दि....

महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?

पुणे- मराठी भाषा आणि हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...

एअर इंडिया आता दररोज 100 विमानांच्या फेऱ्या कमी करणार

इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) यांच्या...