विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन

Date:

विधानमंडळ सचिवालयाची माहिती

मुंबई,: नवीन मंत्री महोदयांचा परिचय आणि मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 02.00 वाजता विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभेच्या सर्व सदस्यांनी विधानभवन, मुंबई येथे विधानसभेच्या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता विधानसभा सभागृहात घेण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र शनिवार, दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत कक्ष क्र.021, तळ मजला, विधानभवन, मुंबई येथे सचिव (कार्यभार), महाराष्ट्र विधानसभा, विधान भवन, मुंबई यांच्याकडे पोहोचतील, अशा बेताने पाठविण्यात यावेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी त्याचदिवशी दुपारी 12.00 वाजता करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत रविवार, दिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत असेल. नामनिर्देशनपत्र आणि उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाच्या प्रती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या ‘अ‘ कक्ष, अकरावा मजला, विधानभवन, मुंबई येथे उपलब्ध असून या निवडणुकीचा कार्यक्रम, नोटीस, नामनिर्देशनपत्र, उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाचा नमूना इत्यादी सर्व कागदपत्रे विधानसभा सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर या प्रती महाराष्ट्र विधीमंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे श्री.भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे विमानतळावर 44 लाखांचा गांजा जप्त

पुणे-बँकॉकहून पुण्यात आलेल्या भारतीय प्रवाशाकडून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क...

विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ : मकरंद अनासपुरे

भरत-रोटरी करंडक स्पर्धेचे पारितोषिक आणि संस्था पुरस्कारांचे वितरण पुणे :...

सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवी

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; देवीला १६ किलो सोन्याची...

‘आपण लता युगात जन्मलो, हे आपले भाग्य!’ — आबा बागुल

३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘लता युग’ची सुरेल मैफल;...