विभागीय अधिकाऱ्यांनी देशातील प्रत्येक घर संपर्क व्यवस्थेशी जोडले जाईल याची खातरजमा करत सेवेची गुणवत्ता सुधारली पाहिजे – अश्विनी वैष्णव

Date:

मुंबई-विभागीय अधिकाऱ्यांनी देशातील प्रत्येक घर, संपर्क व्यवस्थेशी जोडले जाईल याची खातरजमा करत सेवेची गुणवत्ता सुधारली पाहिजे. या समान उद्दिष्टांबाबत नियामक ते विभागीय अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत जाणीवपूर्वक बदल करण्याची गरज आहे असे दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ते ल  क्षेत्रीय अधिकारी, विभागीय मुख्यालय अधिकारी आणि उद्योग प्रतिनिधींच्या दोन दिवसीय परिषदेला संबोधित करत होते.  

सकाळच्या सत्रात दळणवळण राज्यमंत्री देविसिंह चौहान यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. दुपारच्या सत्रात दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर संबंधित कार्यगटाचे निष्कर्ष आणि शिफारसी दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव तसेच दळणवळण राज्यमंत्री यांच्यासमोर मांडण्यात आल्या.  

जागतिक डिजिटल परिप्रेक्ष्यात, विशेषत: डिजिटल अर्थव्यवस्थेचा विचार करता, दर्जेदार टेलिकॉम संपर्क व्यवस्थेचे महत्व अश्विनी वैष्णव यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले. क्षेत्रीय, मुख्यालयातील विभागीय अधिकारी, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्यच दूरसंवाद क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपासह पुढे नेऊ शकेल, असे ते म्हणाले. विद्यमान जुन्या दूरसंवाद कायद्यांची जागा घेण्यासाठी सक्षम तसेच भविष्यवेधी दूरसंवाद कायद्याची गरज आहे. या संबंधातील मसुदा, जनतेचा सल्ला/मते जाणून घेण्यासाठी लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असेही ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीरा’ला पुण्यात आज प्रारंभ

आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती पुणे : आरोग्य सेवांच्या डिजिटल...

राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा: नसीम खान

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणी केली नाही तर...