बीडीपी वरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी

Date:

पुणे :
महानगरपालिकेच्या हद्दीतील जैव वैविध्य उद्यानांच्यासाठी राखीव जागांवर(बीडीपी )मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत ,त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ‘ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड ‘ने  पालिका आयुक्तांकडे  निवेदनाद्वारे केली आहे. 
‘ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड’चे प्रदेशाध्यक्ष सनी लक्ष्मण निम्हण यांनी सोमवारी हे निवेदन पालिका आयुक्त कार्यालयात दिले. 
पुण्यात नगरसेवक,लोकप्रतिनिधी देखील बीडीपी राखीव जागांवर प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामे करीत आहेत.सिंहगड आणि वारजे भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. हिंगणे,तुकाई नगर वडगाव,आंबेगाव,समर्थ नगर,टिळक नगर या सिंहगड रस्ता परिसरात तसेच बावधन,भूगाव मध्ये अनधिकृत  बांधकामातुन बीडीपी चे आरक्षण गिळंकृत केले जात आहे,ही गंभीर बाब आहे असे या निवेदनात म्हटले आहे. 
महापालिकेच्या बांधकाम विभागाला सांगून ,पाठपुरावा  कारवाई होत नसल्याने बांधकामे वाढून शहराचे विद्रुपीकरण होत आहे.बीडीपी प्रकरणी तातडीने कारवाई करावी ,अशी मागणी या निवेदनाद्वारे सनी लक्ष्मण निम्हण यांनी केली आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...