पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा अहवाल हा पारंपारिक तसेच डिजिटल स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळ -जवळ संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ , आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माणमंत्रीजितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसनजी मुश्रीफ, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री .धनंजय मुंडे साहेब, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोरोनाच्या अडचणीच्या काळात केलेल्या आरोग्य विषयक कामाची दखल घेऊन कौतुक केले तसेच पुणे शहरात काम करत असताना ज्या काही अडचणी येतील त्यासाठी शासनाकडून नक्कीच सहकार्य लाभेल असे सांगितले. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील करोना काळामध्ये केलेल्या कामाचे कौतुक करून आरोग्य संदर्भामध्ये येणाऱ्या अडचणींवर नक्कीच शासनाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल व त्या संदर्भात मतदारसंघांमध्ये भेट देण्यात येईल असेही आश्वासित केले.
- अश्विनी नितीन कदम (नगरसेविका)
एक क्लीक वर अहवाल आपण आपल्या मोबाईल वर पाहू शकाल तसेच इतरांना सोशल मीडिया द्वारे आपण पाठवू शकाल .अहवाल वाचण्यासाठी दिलेली लिंक आपल्या इंटरनेट ब्राउजर वर टाईप करून पाहू शकाल. http://ashwininitinkadam.dreamdzire.in