पुणे- कोथरूड मधील महात्मा सोसायटी ते पावनखिंड अशा ६०० मीटर लांबीच्या नव्या रस्त्याचे लोकार्पण सोहळा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि आ. भीमराव तापकीर , नगरसेवक दिलीप वेडेपाटील , किरण दगडे ,अल्पना वर्पे आणि श्रद्धा प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा रस्ता अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित होता. मात्र, आता हा रस्ता सुरु झाल्याने,नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गामुळे कोथरूड मधील नागरिकांना चांदणी चौका ऐवजी थेट बेंगलोर महामार्गाला जवळून जोडणारा रस्ता निर्माण झाल्याबद्दल यावेळी कोथरूड च्या रहिवाश्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त करीत या प्रकल्पाचे स्वागत केले. कोरोनाच्या काळात कमी झालेल्या निधीमुळे हा रस्ता काहीसा अरुंद पद्पथाविना अद्याप असला तरी तो सध्या सुरु मात्र झाला आहे. रस्त्यावर विजेचे दिवे आणि झाडांची रोपे लावल्याने आता येथून सुरक्षित वाहतूक निर्माण होणार आहे . पूर्वी हा रस्ता नसल्याने कोथरूड हून थेट चांदणी चौकात येऊन कात्रज कडे किंवा बेंगलोर -मुंबईकडे जावे लागत आता त्यास हा पर्याय तयार झाला आहे. नगरसेवक दिलीप वेडेपाटील आणि त्यांच्या प्रभागातील नगरसेवकांनी मिळून हा रस्ता केला आहे. पहा या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याची एक झलक आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया ….
मुंबई-बेंगलोर महामार्गाला कोथरूड जोडणाऱ्या एका नव्या रस्त्याचे लोकार्पण (व्हिडीओ )
Next article
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी
मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...
लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा
महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.मुंबई...
इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर
नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...
मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला
मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

