जमिनीवरचा नेता चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे- सध्याच्या राजकारणात नेता म्हटलं की, गाड्यांचा ताफा, आजूबाजूला कार्यकर्त्यांचा गराडा अशे ठोकताळे तयार झालेत. जमिनीवर कुणी काम करायला जास्त धजत नाही. पण भारतीय जनता पक्ष हा त्याला नेहमीच अपवाद ठरतो आहे. कारण, कार्यकर्त्यांशी आणि मतदारांशी थेट संपर्क, अन् त्यासाठी पक्षाचा कोणत्याही स्तरावरील नेता पक्षासाठी झोकून देऊन काम करतो. मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असोत, अमितभाई शाह असोत, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असोत किंवा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील. पक्षासाठी झोकून देऊन काम करणं म्हणजे काय? हे त्यांच्या कृतीतून नेहमीच दिसून येतं.

आज कोथरूडकरांनाही त्याचा प्रत्यय आला. झालं असं की, पुण्यात भारतीय जनता पक्षाचे बूथ संपर्क अभियान सुरू आहे. पक्षाचे बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आपापल्या मतदारसंघात संपर्क अभियानाची जोरदार तयारी करत आहेत. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ही यात सक्रीय सहभाग घेतला.

त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघातील चतुःश्रृंगी परिसरातील पार्वती नंदन गणेश मंदिरमध्ये बूथ क्रमांक ९४ ची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी जमिनीवर भारतीय बैठकीत बसून बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद साधला. आणि भारतीय जनता पक्षासाठी बूथ यंत्रणा अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे बूथ वरील प्रत्येक कार्यकर्त्याने नागरीकांशी संपर्क ठेवला पाहिजे. आपण स्वत: देखील घरोघरी संपर्क करणार असल्याचे त्यांनी या बैठकीतील उपस्थितांना सांगितले.

प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचा माजी महसूलमंत्री असलेला व्यक्ती इतका डाऊन टू अर्थ आहे, हे पाहून या बैठकीत उपस्थित प्रत्येक कार्यकर्ता अचंबित झाला. भारतीय जनता पक्षाची हीच खरी ताकद आहे. पक्षाचा नाराच आहे आधी देश, मग पक्ष आणि मगनंतर स्वतः देशासाठी आणि पक्षासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला झोकून देऊन काम करत असतो. सभेच्या वेळी पावसात भिजून, किंवा आदिवासीच्या घरी जाऊन स्वतःचंच जेवण घेऊन जेवल्याचा करण्याच्या भपकेपणा करत नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...