पुणे, दि. 11 : भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.कंबाइन डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एन्ट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या व जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरून पाठवतील व जे उमेदवार रोजगार समाचार 9 ऑगस्ट 2017मध्ये दिलेल्या शैक्षणिक ,शारीरिक ,वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत अशाच उमेदवारांची निवड परीक्षापूर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कोर्स चा कालावधी दि.29 ऑगस्ट 2017 ते 11 नोव्हेंबर 2017 असा एकूण 75 दिवस आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची व भोजनाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दि 29 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,नवीन प्रशासकीय इमारत,पुणे येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींसह मुलाखतीस उपस्थित राहावे व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन, पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद तुंगार यांनी दिली आहे.