पुणे- मार्च मध्ये पुण्यात आलेला कोरोना अजूनही पुण्यातील नागरिकांना जेरीस आणतो आहे अशा अवस्थेत बावधणचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी देखील न थांबतां अविरतपणे कोरोनाशी लढा -युद्ध सुरूच ठेवले आहे . गेय २/ अडीच महिन्यापूर्वी सुरु केलेल्या कोरोना विरोधातील लढ्याला त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणखी वेग देण्याचा प्रयत्न केला . दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करत त्यांनी काही सोसायट्या आणि वस्त्यांना हाथ धुण्याचे यंत्रे दिली, तर डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविला आणि अर्सोनिक अल्बम या रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप करत सफाई कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप केले . भाजपचे संघटन सचिव राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर , वेडे पाटील यांचे सहकारी नगरसेवक किरण दगडे , अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून वेडे पाटील यांना शुभेछ्या दिल्या .