नगरसेवक उमेश गायकवाड यांच्याकडून प्रभागातील मुस्लीम बांधवांना ईद ची भेट
पुणे- कोरोनाच्या गेल्या १४ महिन्याच्या काळात प्रत्येक सण घरातचं साजरा करावा लागला, उत्पन्नाची मारामार झाली, रोजगार ,व्यवसाय सारे धोक्यात आले अशा वेळी विविध सणासुदीच्या निमित्ताने भाजपचे नगरसेवक आपल्या प्रभागातील गरजूंना मदतीसाठी पुढे होत गेले, त्यांच्यासारखे कार्य निश्चित नोंद घेणारे आहे असे वक्तव्य आज येथे भाजपचे नेते माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे ,महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर , आणि संघटक सचिव राजेश पांडे यांनी केले .
आज या तिघांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते ईद चे औचित्य साधून गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील सुमारे २००० मुस्लीम कुटुंबियांना किराणा साहित्य आणि शिरखुर्मा चे साहित्य असे कीट कार्यकर्त्यांच्या मदतीने घरो घरो पोहोच करण्याचा उपक्रम आज सुरु केला .कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दिनेश ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले या कार्यक्रमाची हि पहा लाइव्ह झलक …..