पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 958

Date:

पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 45 हजार 340 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.10 :- पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 45 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 958 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 232 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.83 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 49 हजार 644 रुग्णांपैकी 3 लाख 31 हजार 100 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 99 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.70 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 260 रुग्णांपैकी 49 हजार 983 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 533 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 90 रुग्णांपैकी 43 हजार 724 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 726 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 125 रुग्णांपैकी 45 हजार 34 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 221 रुग्णांपैकी 47 हजार 309 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 222 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 80 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 782 , सातारा जिल्ह्यात 133, सोलापूर जिल्ह्यात 118, सांगली जिल्ह्यात 26 तर कोल्हापूर जिल्ह्यात 21 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 366 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 28, सातारा जिल्हयामध्ये 62, सोलापूर जिल्हयामध्ये 222, सांगली जिल्हयामध्ये 21 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 33 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 5 हजार 833 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 45 हजार 340 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 9 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सिक्कीममधल्या सीमावर्ती भागात तैनात जवानांसोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी साजरी केली दिवाळी

अतिशय प्रतिकूल उंचावर भौगोलिक परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या...

३८ हजार २३३ दिव्यांनी उजळला शनिवार वाडा अन् ‘वन्दे मातरम्’चा होत राहिला जयघोष

पुणे, दि. ७ नोव्हेंबर : देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि भारतीय...

अयोध्येत ३० लाख दिव्यांचा महासागर! दीपोत्सव २०२६ ने उजळली रामनगरी; सरयूच्या ५६ घाटांवर नेत्रदीपक रोषणाई

रामजन्मभूमी मंदिरासह संपूर्ण अयोध्या प्रकाशमय; २१०० ड्रोनद्वारे रामायणातील प्रसंगांचे...